January 22, 2025 7:41 PM

views 15

नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गासाठी मराठवाड्यात भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात

नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गासाठी मराठवाड्यात भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पर्यावरणीय परवानग्या मागितल्या आहेत. शक्तिपीठ महामार्ग वर्धा जिल्ह्यातल्या पवनार इथून सुरू होणार असून महाराष्ट्र-गोव्याच्या सीमेवरील पत्रादेवी इथं संपणार आहे.

January 22, 2025 7:39 PM

views 16

राज्यपालांच्या हस्ते राज्यस्तरीय डाक तिकीट प्रदर्शनाचं उद्घाटन

भारतीय टपाल विभागानं आपल्या दीडशे वर्षांहून अधिक काळाच्या वाटचालीत संवेदनशील सेवा देऊन लोकांशी भावनिक नाते जोपासले असल्याचं राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. ते आज भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र परिमंडळातर्फे आयोजित राज्यस्तरीय डाक तिकीट प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. मुंबईच्य...

January 22, 2025 7:34 PM

views 19

पुण्यात ‘गुलियन बॅरी सिंड्रोम’ या आजाराचे २४ रुग्ण, प्रशासन ॲक्शन मोडवर

पुणे आणि पिंपरी- चिंचवड महापालिका क्षेत्रात गेल्या दोन आठवड्यांपासून अचानक जीबीएस, अर्थात 'गुलियन बॅरी सिंड्रोम' या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. जीबीएस हा चेतासंस्थेशी संबंधित दुर्मिळ आजार आहे. पुण्यातला सिंहगड रस्ता, धायरी, नऱ्हे, विश्रांतवाडी, पर्वती, कसबा, कोथरूडसह उपनगर आणि ग्रा...

January 22, 2025 7:30 PM

views 30

संत्रा पिकाच्या फळगळतीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर

अमरावती, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यात, तसंच वर्धा जिल्ह्याच्या आर्वी उपविभागात यंदाच्या पावसाळ्यात संत्रा पिकाच्या फळगळतीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी विशेष बाब म्हणून १६५ कोटी ८३ लाख ८ हजार रुपयांची मदत राज्य शासनानं मंजूर केली आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी ही माहिती दिली.

January 22, 2025 9:10 PM

views 40

राष्ट्रीय आरोग्य अभियानाला आणखी ५ वर्ष मुदतवाढ

राष्ट्रीय आरोग्य अभियानाला आणखी पाच वर्ष मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. यावेळी देशातल्या आरोग्य सोयीसुविधांचा आढावा त्यांनी घेतला. गेल्या तीन वर्षांत, राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत...

January 22, 2025 6:55 PM

views 18

रिलायन्सचा राज्य सरकारसोबत सामंजस्य करार

दावोसमध्ये सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या गुंतवणूक परिषदेच्या दुसऱ्या दिवशी राज्यात आणखी ३ लाख ५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार झाला. रिलायन्स सोबत झालेल्या या करारातून ३ लाख रोजगार निर्माण होणार आहेत. यामुळं राज्यानं केलेल्या सामंजस्य करारांचं मूल्य ९ लाख ३० हजार कोटी रुपयां...

January 22, 2025 8:11 PM

views 41

कर्नाटकातल्या अरबाईल घाटात झालेल्या रस्ता अपघातात १४ जणांचा मृत्यू

कर्नाटकातल्या उत्तर कन्नड जिल्ह्यात येल्लापूरजवळ झालेल्या रस्ता अपघातातल्या मृतांची संख्या १४ झाली आहे. आठवडी बाजाराकरता फळं आणि भाज्या वाहून नेणारा ट्रक सावनूरहून कुमठ्याला जात असताना दरीत कोसळून हा अपघात झाला. त्यात ९ जणांचा जागीच मृत्यू झाला तर जखमींपैकी ५जण रुग्णालयात उपचारादरम्यान मरण पावले. आण...

January 22, 2025 8:32 PM

views 17

जळगावमध्ये पाचोऱ्याजवळ रेल्वे अपघातात ११ जणांचा मृत्यू, १४ जखमी

जळगाव-पाचोरा दरम्यान परधाडे गावाजवळ आज झालेल्या रेल्वे अपघातात ११ प्रवाशांचा मृत्यू झाला असून १४ जण जखमी झाल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारनं ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींच्या उपचारांचा खर्च सरकार करणार आहे.    या मार्गावरुन मुंबईकडे...

January 22, 2025 3:31 PM

views 9

ईपीएफओ ने नोव्हेंबर महिन्यात जोडले १४ लाख ६३ हजार नवीन सदस्य

ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेशी गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात १४ लाख ६३ हजार सदस्य जोडले गेले आहेत. ऑक्टोबर २०२४ च्या तुलनेत यात ९ टक्क्यापेक्षा जास्त वाढ झाली आहे. रोजगारात वाढ आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाढती जागरुकता यामुळेच सदस्य संख्या वाढल्याचं कामगार आणि रोजगार मंत्रालयानं म्हट...

January 22, 2025 3:54 PM

views 7

केईएम रुग्णालयामध्ये आयुष्मान शताब्दी टॉवर उभे करावेत – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

केईएम रुग्णालय मुंबईकरांचा खऱ्या अर्थाने आधारवड असून त्यांना जागा कमी पडू नये यासाठी केईएम मध्ये आयुष्मान शताब्दी टॉवर उभे करावेत असे असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. ते केईएम रुग्णालयाच्या शतक महोत्सवी समारंभात बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, मुंबई महापालिका आयुक्त...