January 23, 2025 2:31 PM

views 22

जळगाव रेल्वे अपघातात १३ प्रवाशांचा मृत्यु

  महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात परधाडे स्थानकाजवळ काल संध्याकाळी झालेल्या रेल्वे अपघातात मृतांची संख्या १३ झाली आहे. त्यातल्या १० जणांची ओळख पटली असून त्यात एक लहान मूल आणि तीन महिलांचा समावेश आहे. शेजारच्या डब्यात आग लागल्याची अफवा पसरल्यामुळं अपघातग्रस्त डब्यातल्या अनेकांनी गाडीतून बाहेर उड्या मारल...

January 23, 2025 1:49 PM

views 16

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरी उपांत्य फेरीत भारत विरुद्ध स्पेन

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीचा महिला एकेरीचा पहिल्या सामन्यात आज अग्रमानांकित अरीना साबालेंका हिच्यासमोर स्पेनच्या पॉला बाडुसा हिचं आव्हान असेल.   तर दुसरा सामना जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेली पोलंडची इगा श्वियांतेक आणि अमेरिकेची मॅडिसन कीज यांच्यात होईल. महिला ...

January 23, 2025 1:41 PM

views 3

मास्टर्स सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीतले सामने आज होणार

  जकार्ता इथं सुरू असलेल्या इंडोनेशिया मास्टर्स सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत भारताच्या तनिषा क्रॅस्टो आणि ध्रुव कपिला यांचा मलेशियाच्या पँग रॉन हू आणि सू यीन चेंग या जोडीने २१-१८,१५-२१,१९-२१ असा पराभव केला.   भारताच्या लक्ष्य सेनचा सामना आज दुपारी जपानच्या केंता निशिमोटो याच्याशी...

January 23, 2025 6:55 PM

views 10

नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांना देशभरातून आदरांजली

  नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२८व्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली अर्पण केली. नेताजींचा जन्मदिवस पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जात आहे. नेताजी, स्वातंत्र्यलढ्यातल्या सर्वात प्रेरणादायी नेत्यांपैकी  एक होते, असं राष्ट...

January 23, 2025 1:30 PM

views 31

दावोस परिषदेत महाराष्ट्राचे आतापर्यंत 15 लाख 70 हजार कोटींचे सामंजस्य करार

  स्वित्झर्लंडमध्ये दावोस इथं सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक परिषदेत महाराष्ट्रानं दोन दिवसांत १५ लाख ७० हजार कोटी रुपयांच्या ५४ सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विविध उद्योगसमूहांशी बैठकीचं सत्र सुरू ठेवलं होतं. या करारांमुळं अंदाजे १६ लाख रो...

January 23, 2025 3:08 PM

views 10

अमेरिकेत जन्मसिद्ध नागरिकत्व रद्द करण्याच्या घोषणेविरोधात डेमोक्रॅटिक पक्षाची न्यायालयात धाव

अमेरिकेत जन्मसिद्ध नागरिकत्व रद्द करण्याच्या योजनेबद्दल डेमोक्रॅटिक पक्षाची सत्ता असलेली राज्यं आणि नागरी हक्क गटांच्या युतीनं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर खटला दाखल केला आहे. कोलंबिया आणि सॅन फ्रान्सिस्को शहरासह २२ डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेतृत्वाखालील राज्यांनी बोस्टन आणि सिएटल इथल्या ...

January 23, 2025 3:06 PM

views 17

कुख्यात गुंड छोटा राजन याचा हस्तक डी. के. राव मुंबई पोलिसांच्या ताब्यात

कुख्यात गुंड छोटा राजन याचा हस्तक डी. के. राव याच्यासह सहा जणांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं खंडणी प्रकरणी अटक केली आहे. एका हॉटेल मालकाला जीवे मारण्याची धमकी देऊन अडीच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकानं त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे...

January 23, 2025 11:25 AM

views 26

आजपासून लडाखमध्ये हिवाळी क्रीडा स्पर्धांची सुरूवात

खेलो इंडियाच्या या वर्षाच्या हंगामातल्या, हिवाळी क्रीडा स्पर्धांची सुरूवात आज लडाखमध्ये होत आहे. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे.   लडाख मध्ये दुसऱ्यांदा खेलो इंडियाचं आयोजन केलं जात असून, या हंगामाचा दुसरा टप्पा फेब्रुवारीत जम्मू ...

January 23, 2025 11:20 AM

views 29

2030 पर्यंत भारताचं जीआय टॅग्ज मिळवण्याचं लक्ष्य- पियुष गोयल

2030 पर्यंत देशात 10 हजार भौगोलिक मानांकन म्हणजेच जीआय टॅग्ज मिळवण्याचं लक्ष्य ठेवलं असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल नवी दिल्लीत सांगितलं.   GI संमेलनाला संबोधित करताना, हे लक्ष्य संपूर्ण सरकारी दृष्टिकोनातून साध्य केले जाईल आणि सरकार यावर देखरेख करण्यासाठी एक स...

January 23, 2025 11:08 AM

views 38

बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानांच उद्दीष्ट मुलींना समाजाच्या मुख्य धारेत सामावून घेणे आहे- जे.पी. नड्डा

बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानांच उद्दीष्ट केवळ मुलींना शिक्षित करणं नसून त्यांना समाजाच्या मुख्य धारेत सामावून घेणे आणि त्यांचे सक्षमीकरण करण्याचा असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी म्हटलं आहे. योजनेच्या दशकपूर्तीनिमित्त दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. सुदृढ बाळासाठी, गर्भव...