November 24, 2025 7:32 PM

views 22

डीफॉलिंपिक क्रीडा स्पर्धेत वेगवेगळ्या प्रकारात भारताला दोन सुवर्ण, एक रौप्य पदक

जपानमध्ये टोकिओ इथं सुरू असलेल्या, डीफॉलिंपिक क्रीडा स्पर्धेत भारताच्या प्रांजली प्रशांत धुमाळनं महिलांच्या २५ मीटर पिस्टल नेमबाजीत सुवर्ण पदक पटकावलं. या स्पर्धेतलं तिचं हे तिसरं पदक आहे. याआधी तिनं मिश्र पिस्टल नेमबाजीत अभिनव देश्वाल सोबत सुवर्ण पदक, तर महिलांच्या एअर पिस्टल प्रकारात रौप्य पदक पटक...

November 24, 2025 7:04 PM

views 51

माहे युद्धनौका मुंबईत नौदलाच्या ताफ्यात दाखल

माहे ही युद्धनौका आज मुंबई इथं नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. माहे श्रेणीतली ही पहिली पाणबुडीविरोधी उथळ पाण्यातली युद्धनौका कोचीच्या जहाजबांधणी गोदीत तयार झाली असून यात ८० टक्क्यापेक्षा जास्त सामग्री स्वदेशी बनावटीची आहे. मलबार किनारपट्टीवरच्या माहे या ऐतिहासिक गावावरून हिचं नाव ठेवण्यात आलं आहे. या य...

November 24, 2025 2:45 PM

views 38

IFFI 2025: बालपणाच्या विविध छटा आणि संघर्षाविषयीचे चित्रपट दाखवण्यासाठी युनिसेफबरोबर भागीदारी

गोव्यात सुरू असलेल्या ५६व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज बालपणाच्या विविध छटा आणि संघर्षाविषयीचे विविध चित्रपट दाखवण्यासाठी युनिसेफ अर्थात संयुक्त राष्ट्र बालनिधीबरोबर भागीदारी केली आहे. मुलांचे प्रश्न, आव्हानं आणि संधी यांची मांडणी करण्यासाठी इफ्फीत पाच चित्रपट दाखवले जात...

November 24, 2025 1:41 PM

views 29

शीखांचे नववे गुरू, गुरू तेग बहादूर यांचा ३५०वा हुतात्मा दिन

शीखांचे नववे गुरू, गुरू तेग बहादूर यांचा ३५०वा हुतात्मा दिन आज आहे. गुरू नानक देव यांच्या शिकवणीच्या प्रसारासाठी गुरू तेग बहादूर यांनी देशभर प्रवास केला होता. त्यांनी ११६ शाबद आणि १५ राग यांची रचना केली त्याचा समावेश आदि ग्रंथांमध्ये केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरू तेग बहादूर यांना आद...

November 24, 2025 7:17 PM

views 63

मुंबई पालिका निवडणुकीत भाजपचे ४० टक्के उमेदवार तरुण असतील – मुख्यमंत्री

तरुणाईच्या माध्यमातून समाजात आणि राजकारणात परिवर्तन शक्य असल्याचं सांगत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचे ४० टक्के उमेदवार हे तरुण असतील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईत आयोजित I I M U N मुंबई-२०२५ या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी युवावर्गाशी संवाद साधला. या...

November 24, 2025 1:18 PM

views 16

६वी आंतरराष्ट्रीय कृषीशास्त्र काँग्रेस आजपासून सुरू

६वी आंतरराष्ट्रीय कृषीशास्त्र काँग्रेस आजपासून नवी दिल्ली इथं सुरू झाली. कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. तीन दिवसांच्या या कार्यक्रमात चर्चासत्रं, व्याख्यान, युवा शास्त्रज्ञ आणि विद्यार्थी परिषद तसंच प्रदर्शनाचा समावेश आहे. या कार्यक्रमात जगभरातून प्रतिनिधीं...

November 24, 2025 1:04 PM

views 524

देशाचे ५३ वे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्य कांत यांचा शपथविधी

देशाचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून आज न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी शपथ घेतली.नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं आयोजित समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना पदाची शपथ दिली. उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभेचे सभापती ओम बिरला, तसंच केंद्रीय मंत्रिमंडळाचे  सदस्य यावेळी उप...

November 24, 2025 11:47 AM

views 45

‘माहे’ युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात दाखल

मुंबई इथं माहे ही युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. माहे श्रेणीतली ही पहिली पाणबुडीविरोधी उथळ पाण्यातली युद्धनौका कोचीच्या जहाजबांधणी गोदीत तयार झाली असून यात ८० टक्क्यापेक्षा जास्त सामग्री स्वदेशी बनावटीची आहे. मलबार किनारपट्टीवरच्या माहे या ऐतिहासिक गावावरून हिचं नाव ठेवण्यात आलं आहे. या युद्...

November 24, 2025 10:59 AM

views 55

IFFI 2025: इफ्फी सोहळ्यात आज AI हॅकेथॉनचं आयोजन

गोव्यात सुरू असलेल्या 56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फी सोहळ्यात आज एआय हॅकेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे. इफ्फीच्या इतिहासात प्रथमच अशा उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून, चित्रपट क्षेत्रातील तज्ज्ञ आणि तंत्रज्ञान तज्ज्ञ एकत्र येऊन नावीन्यपूर्ण एआय-आधारित प्रणाली तयार करणार आहेत...

November 24, 2025 1:05 PM

views 49

G20 शिखर परिषदेनंतर प्रधानमंत्री मोदी मायदेशी परतले

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेचा दौरा यशस्वीपणे आटोपून आज मायदेशी परतले. जोहान्सबर्ग जी-20 शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनाचं मोदी यांनी कौतुक केलं असून, राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांचे आणि दक्षिण आफ्रिकेच्या सरकारचे आभार मानले आहेत. इथं विविध जागतिक नेत्यांशी झालेल्या बैठका आणि संवाद यशस...