November 25, 2025 2:59 PM

views 37

सुलतान अझलान शाह चषक हॉकी सामन्यात भारताचा पराभव

मलेशियात इपोह मध्ये सुरु असलेल्या सुलतान अझलान शाह चषक हॉकी सामन्यात बेल्जीयमच्या संघाने भारताचा २ -३ असा पराभव केला. भारताने गेल्या रविवारी तिबार विजेत्या दक्षिण कोरियाचा पराभव केल्यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. भारताचा पुढला सामना उद्या मलेशियाच्या संघाबरोबर होईल.

November 25, 2025 3:03 PM

views 19

प्रधानमंत्री कुरुक्षेत्र इथं गुरू तेग बहादूर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी कुरुक्षेत्र इथं गुरू तेग बहादूर यांच्या साडेतीनशेव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी ते विशेष नाणं आणि टपाल तिकीटाचं अनावरण करणार आहेत. प्रधानमंत्री भगवान कृष्णाच्या शंखाच्या सन्मानार्थ पांचजन्य इमारतीचं उद्घाटन करणार आहेत. &nbs...

November 25, 2025 1:40 PM

views 58

इथिओपियातल्या हायली गुब्बी ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे विमानसेवांवर परिणाम

इथिओपियातल्या हायली गुब्बी ज्वालामुखीच्या राखेमुळे मस्कत आणि आसपासचे विमान वाहतूक क्षेत्र प्रभावित झालं असून सर्व भारतीय विमान वाहतूक कंपन्यांनी हे क्षेत्र टाळावं तसंच अशा परिस्थितीत सर्व प्रकारे काटेकोरपणे बाळगावी असा इशारा नागरी हवाई वाहतूक  महासंचालनालयानं दिला आहे. ज्वालामुखीचा उद्रेक किंवा राखे...

November 25, 2025 1:31 PM

views 26

यंदाच्या रब्बी हंगामात या महिन्याच्या २१ तारखेपर्यंत ३ कोटी ६ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी

यंदाच्या रब्बी हंगामात या महिन्याच्या २१ तारखेपर्यंत ३ कोटी ६ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी देशभरात  झाली आहे. सरकारनं प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे की सुमारे ७३ लाख हेक्टर क्षेत्रावर कडधान्यांची लागवड करण्यात आली आहे, १९ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात भरड धान्याची तर ७६ लाख हेक्ट...

November 25, 2025 10:30 AM

views 24

डोनाल्ड ट्रंप यांनी मुस्लिम ब्रदरहूडच्या काही शाखांना जागतिक दहशतवादी घोषित करण्याची प्रक्रिया केली सुरू

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी मुस्लिम ब्रदरहूडच्या काही शाखांना परदेशी किंवा जागतिक दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.   व्हाईट हाऊसच्या एका अहवालानुसार राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्यासमोर मुस्लिम ब्रदरहूडच्या विविध संघटनांचचं मोठं आव्हान असून मध्य पूर्वेतील अमे...

November 25, 2025 9:26 AM

views 36

छत्तीसगडमध्ये 15 नक्षलवाद्यांची पोलिसांसमोर शरणागती

छत्तीसगडमध्ये सुकुमा जिल्ह्यात काल 15 नक्षलवाद्यांनी पोलिस अधीक्षक किरण चव्हाण यांच्या समोर आत्मसमर्पण केलं. यामध्ये 10 पुरुष आणि 5 महिलांचा समावेश आहे. यापैकी काही नक्षलवाद्यांवर 8 लाखांच बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. माडवी हिडमा या नक्षलवाद्याच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या भीतीमुळं या नक्षलवाद्य...

November 25, 2025 9:17 AM

views 48

भारताच्या महिला कबड्डी संघाची सलग दुसऱ्यांदा विश्वचषकाला गवसणी

भारताच्या महिला कबड्डी संघानं सलग दुसऱ्यांदा कबड्डी विश्वचषकाला गवसणी घातली आहे. ढाका इथं झालेल्या सामन्यात त्यांनी काल चायनीज तैपेईच्या संघावर 35- 28 अशी मात केली. या स्पर्धेतल्या सर्व सामन्यात भारतीय संघ अजिंक्य राहिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कामगिरीबद्दल भारतीय संघाचं अभिनंदन केलं आह...

November 24, 2025 8:38 PM

views 213

सुप्रसिद्ध अभिनेता धर्मेंद्र यांचं निधन

सुप्रसिद्ध अभिनेता धर्मेंद्र यांचं आज निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते.  काही दिवसांपूर्वी त्यांना प्रकृतीअस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र, उपचारांनंतर त्यांना घरी सोडण्यात आलं होतं. आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर मुंबईत पवनहंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

November 24, 2025 8:37 PM

views 42

कबड्डीच्या विश्वचषकाला सलग दुसऱ्यांदा भारतीय महिला संघाची गवसणी

भारताच्या महिला कबड्डी संघानं सलग दुसऱ्यांदा कबड्डी विश्वचषकाला गवसणी घातली आहे. ढाका इथं झालेल्या सामन्यात त्यांनी आज चायनीज तैपेईच्या संघावर ३५-२८ अशी मात केली. या स्पर्धेतल्या सर्व सामन्यात भारतीय संघ अजिंक्य राहिला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या कामगिरीबद्दल या संघाचं अभिनंदन केलं आहे.

November 24, 2025 8:35 PM

views 38

भटक्या कुत्र्यांचं सक्तीचं लसीकरण आणि तक्रारींचं निवारणासाठी हेल्पलाइनचे आदेश

भटक्या कुत्र्यांचं सक्तीचं लसीकरण करण्याचं आणि नागरिकांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी स्वतंत्र हेल्पलाइन करण्याचे आदेश राज्य सरकारनं सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारनं हा शासन आदेश आज जारी केला. निर्धारित नसलेल्या ठिकाणी भटक्या कुत्र्यांना खाऊ घाल...