December 28, 2025 7:15 PM

views 31

  पालघर जिल्हा परिषदेनं  वाडा खडकोना इथं  एका वनराई बंधाऱ्याची यशस्वी उभारणी

  मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत पालघर जिल्हा परिषदेनं  वाडा खडकोना इथं  एका वनराई बंधाऱ्याची यशस्वी उभारणी केली आहे. सामूहिक श्रमदानाच्या माध्यमातून  उभारण्यात आलेल्या या  बंधाऱ्यामुळं पावसाचं पाणी अडवलं जाणार आहे.   त्यामुळं  भूजल पातळी वाढून स्थानिक शेतीसाठी  पुरेसा जलसाठा निर्माण हो...

December 28, 2025 7:37 PM

views 72

अरावली पर्वत रांगांच्या नव्या व्याख्येवर पर्यावरण तज्ञांच्या आक्षेपाची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल

अरावली पर्वत रांगांच्या नव्या व्याख्येवरून पर्यावरण तज्ज्ञ आणि सामाजिक संघटनांनी व्यक्त केलेल्या चिंतेची सर्वोच्च न्यायालयानं दखल घेतली असून,  सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जे.के. माहेश्वरी आणि ए.जी. मसीह यांचा समावेश असलेल्या सुट्टी-कालीन पिठासमोर उद्या या प्रकरणाची सुनावणी होणार आ...

December 28, 2025 7:52 PM

views 29

डब्ल्यु ३५ सोलापूर टेनिस स्पर्धेत वैदेही चौधरीला एकेरी गटाचं विजेतेपद

डब्ल्यु ३५ सोलापूर टेनिस स्पर्धेत आज वैदेही चौधरी हिनं महिला एकेरी गटाचं विजेतेपद पटकावलं. अंतिम सामन्यात वैदेहीनं जपानच्या मिचिका ओझेकी हिचा ३-६, ६-३, ६-४ असा पराभव केला. तत्पूर्वी उपांत्य फेरीत वैदेहीनं वैष्णवी अडकरचा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती.

December 28, 2025 7:08 PM

views 14

तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्रौत्सवाला सुरुवात

देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी पूर्ण पीठ असलेल्या तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्रौत्सवाची सुरुवात आज घटस्थापनेने झाली. तत्पूर्वी आज पहाटे देवीची मंचकी निद्रा संपून तिची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. या महोत्सवासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणातले ल...

December 28, 2025 8:13 PM

views 14

गेल्या २४ तासात विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय घट

गेल्या २४ तासात विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय घट झाली. कोकण, मध्यमहाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी किंचित घट झाली. येत्या दोन दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब, हरयाणा, चंदिगड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये येत्या...

December 28, 2025 6:53 PM

views 45

पुण्यात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमधे एकत्र येण्याचे प्रयत्न सुरू

पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेसशी युतीची बोलणी फिसकटल्यानंतर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमधे आघाडीचे प्रयत्न सुरू असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शऱदचंद्र पवार पक्षाचे नेते अंकुश काकडे यांनी सांगितलं. या आघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आ...

December 28, 2025 6:16 PM

views 45

भीमा कोरेगाव इथं होणाऱ्या शौर्य दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची  बैठक

पुणे जिल्ह्यातल्या भीमा कोरेगाव इथं एक जानेवारीला होणाऱ्या शौर्य दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज सामाजिक न्याय विभागाच्या प्रधान सचिवांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशासनाची  बैठक झाली. या सोहळ्यानिमित्त भीमा कोरेगाव इथं येणाऱ्या अनुयायांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी तसंच हा सोहळा निर्वि...

December 28, 2025 4:52 PM

views 18

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची कारवारमधल्या कदंब नौदलतळाला भेट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी आज कर्नाटकातल्या कारवारमधल्या कदंब नौदलतळाला भेट दिली. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांचं स्वागत केलं. नौदलतळाला भेट दिल्यानंतर राष्ट्रपतींनी आएनएस वाघशील पाणबुडीतून प्रवास केला. नौदलप्रमुख ऍडमिरल दिनेश त्रिपाठी त्यांच्यासोबत होते. पाणबुडीतून प्रवास करणाऱ...

December 28, 2025 2:34 PM

views 47

देशाला आज काँग्रेस विचाराची गरज – हर्षवर्धन सपकाळ

देशाला आज काँग्रेस विचाराची गरज असल्याचं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या १४० व्या स्थापना दिनानिमित्त आज मुंबईत टिळक भवन इथल्या पक्ष कार्यालयात झालेल्या कार्यक्रर्मात ते बोलत होते.   देशात आज जात, धर्म, भाषा आणि पं...

December 28, 2025 2:29 PM

views 13

मध्यप्रदेशातल्या जबलपूर इथल्या महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या शताब्दी समारंभात मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

मध्य प्रदेशातल्या जबलपूर इथल्या महाराष्ट्र शिक्षण मंडळ या संस्थेच्या शताब्दी सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आज सहभागी झाले. शिक्षण आणि संस्कृती हे दोन विषय मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत असं ते यावेळी म्हणाले. ज्ञानेश्वरांनी पसायदानातून विश्वासाठी प्रार्थना केली, या संस्थेच्या स्थापनेत...