November 30, 2025 6:55 PM

views 33

संसदेचं हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर  केंद्र सरकारची सर्वपक्षीय बैठक

संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. त्या पार्श्वभूमीवर  केंद्र सरकारनं आज सकाळी सर्वपक्षीय बैठक घेतली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. राज्यसभेतले सभागृह नेते जे पी नड्डा, संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू आणि राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल आणि डॉ. एल मुरुगन बैठकीला...

November 30, 2025 6:48 PM

views 17

बेंजामिन नेत्यन्याहू यांनीआपल्यावर सुरु असलेल्या भ्रष्टाचारांच्या संदर्भात राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झोग यांच्याकडे केली विनंती

इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यन्याहू यांनी आपल्यावर सुरु असलेल्या भ्रष्टाचारांच्याा खटल्यांबाबत क्षमाशीलता दाखवण्याची विनंती राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झोग यांच्याकडे केली आहे. अध्यक्षांच्या कार्यालयाने या विनंतीची दखल घेत याबाबत जबाबदारीने निर्णय घेण्यात येईन असं म्हटलं आहे. नेत्यनाहू यांच्यावर...

November 30, 2025 6:35 PM

views 10

मुंबईत बोरिवली इथं दिव्यांग बालकांसाठी आयोजित खासदार क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन

मुंबईच्या बोरिवली इथं आज केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते दिव्यांग बालकांसाठी आयोजित खासदार क्रीडा महोत्सवाचं  उद्घाटन केलं.  या स्पर्धेमध्ये एकूण ४५० पेक्षा अधिक स्पर्धक, ९०० पालक आणि २०० स्वयंसेवकांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पीयूष गोयल यांनी ...

November 30, 2025 6:30 PM

views 28

सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत किदंबी श्रीकांतचा सामना हाँगकाँगच्या जेसन गुनावन बरोबर

सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय सुपर 300 बॅडमिंटनचा अंतिम फेरीचा सामना आज लखनौ इथं बाबू बनारसीदास इनडोअर स्टेडियम इथे होईल. अंतिम फेरीत भारताचा  बॅडमिंटनपटू किदंबी श्रीकांत आणि हाँगकाँगचा जेसन गुनावन यांच्यामध्ये सामना रंगेल. महिला दुहेरीत गायत्री गोपीचंद आणि ट्रीसा जॉली यांची लढत जपानच्या  कोहो ओसावा आणि ...

November 30, 2025 7:40 PM

views 315

राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी स्वीकारला पदभार

राज्याचे मुख्यसचिव म्हणून आज राजेश अग्रवाल यांनी आज कार्यभार स्वीकारला. ते १९८९च्या आयएस सेवेतले महाराष्ट्र केडरचे अधिकारी आहेत. 

November 30, 2025 3:14 PM

views 30

चीनमध्ये चेंगडू इथं आयटीटीएफ मिश्र सांघिक विश्व चषक स्पर्धेला सुरुवात

चीनमध्ये चेंगडू इथं आजपासून आयटीटीएफ मिश्र सांघिक विश्व चषक स्पर्धेला सुरुवात होत आहे. या सामन्यांसाठी भारताच्या आठ टेबलटेनिस खेळाडूंच्या संघाचं नेतृत्व मनिका बत्रा आणि मानव ठक्कर करणार आहेत. मनिका आणि मानव राष्ट्रकुल स्पर्धेचे विजेते आहेत. भारतीय संघात  ऑलिंपियन साथिया ज्ञानसेकरनचासुद्धा समावेश आहे...

November 30, 2025 3:13 PM

views 15

एअर बस कंपनीच्या ३३८ विमानांपैकी ३२३ विमानांच्या सॉफ्टवेअरचं अद्ययावतीकरण पूर्ण

एअर बस कंपनीच्या ३३८ विमानांपैकी ३२३ विमानांच्या सॉफ्टवेअरचं अद्ययावतीकरण पूर्ण झालं असल्याची  माहिती नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयानं दिली आहे. अद्ययावतीकरण झालेली विमानं इंडिगो, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या विमान कंपन्यांची असल्याचं त्यांनी कळवलं आहे. एअरबस थ्री ट्वेंटी प्रकारातल्या विम...

November 30, 2025 3:11 PM

views 23

भारतीय हॉकी संघाचीसुलतान अजलनशाह चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक

भारतीय हॉकी संघानं सुलतान अजलनशाह चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. आज होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची लढत बेल्जियमशी  होणार आहे. दरम्यान ,चेन्नईमध्ये सुरू असलेल्या पुरुषांच्या हॉकी कनिष्ठ गट  विश्वचषक स्पर्धेत भारताने काल ओमानवर १७-० असा दणदणीत विजय मिळवला. भारताने दोन सामन्यांत एकंदर २४ ग...

November 30, 2025 3:09 PM

views 24

दितवा चक्रीवादळ उत्तर तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेश किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता

दितवा चक्रीवादळ आता उत्तर तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेश किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे तामिळनाडू आणि पुदुच्चेरी किनाऱ्यावर सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. किनारी भागात मध्यम पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आंध्र प्रदेश किनारपट्टी, यानम आणि रायलसीमा या भागांमध्ये क...

November 30, 2025 2:21 PM

views 28

मतदारयाद्या पुनर्रिक्षणाची मुदत वाढली

मतदारयाद्या  पुनर्रिक्षणाची मुदत केंद्रीय आयोगाने आठवडाभराने वाढवली आहे. ९ राज्य आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमधे सध्या ही प्रक्रीया सुरु आहे. सुधारित अधिसूचनेनुसार मतदारयादीत नाव नोंदणीसाठी ११ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येईल. प्रारूप मतदार याद्या १६ डिसेंबरला प्रसिद्ध होतील. पुढच्या वर्षी १४ फेब्रुवारीला...