December 4, 2025 7:50 PM

views 651

६४व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे निकाल जाहीर

६४व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे विविध विभागांमधले निकाल जाहीर झाले आहेत. या स्पर्धेत मुंबई केंद्रातून ‘ती, ती आणि ती’ या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झालं आहे. नाशिक केंद्रातून ‘काळाच्या पंजातून’ या नाटकाला, सांगली केंद्रातून ‘तिचे संदर्भ नसलेली गोष्ट’ या नाटकाला तर लातूर विभागात...

December 4, 2025 7:16 PM

views 34

नागरिकांची पत्र, पार्सल जलद पोहोचणार…

भारतीय डाक विभागानं नागरिकांची पत्रं आणि पार्सल जलद गतीने पोहोचवण्यासाठी आपल्या ताफ्यात २११ इलेक्ट्रिक दुचाकींचा समावेश केला आहे. आज मुंबईच्या चकाला इथल्या पोस्ट ऑफिसमध्ये या सेवेचा आरंभ करण्यात आला.  या इलेक्ट्रिक दुचाकींंच्या माध्यमातून जीपीओ, चकाला, शीव, दादर आणि काळबादेवी इथल्या पोस्ट ऑफिसमधून य...

December 4, 2025 7:05 PM

views 104

संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोर शोध घेण्याचे राज्य निवडणूक आयुक्तांचे आदेश

महानगरपालिका निवडणुकांच्या मतदार याद्यांमधल्या संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोर शोध घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत. राज्यातल्या सर्व महानगरपालिका आयुक्तांची आज दूरस्थ पद्धतीने बैठक घेण्यात आली. या बैठकीत वाघमारे यांनी हे आदेश दिले आहेत. प्रारुप मतदार याद्यांवरच्या हर...

December 4, 2025 7:02 PM

views 78

आता मिळणार ‘डिजिटल सातबारा’

महसूल विभागाच्या bhulekh.mahabhumi.gov.in या वेबसाइटवरुन डिजिटल स्वरुपात सातबारा काढता येणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. डिजिटल स्वाक्षरीने मिळणारा गावनमुना सातबारा, आठ अ आणि फेरफार उतारे हे सर्व शासकीय, निमशास...

December 4, 2025 6:56 PM

views 67

तंबाखू आणि तत्सम वस्तूंवर अतिरीक्त उत्पादन शुल्क लादणाऱ्या विधेयकाला संसदेची मंजुरी

केंद्रीय उत्पादन शुल्क सुधारणा विधेयकाला आज संसदेची मंजुरी मिळाली. यामुळं तंबाखू आणि तंबाखू जन्य पदार्थांवर जीएसटी अधिभार रद्द झाल्यावर अतिरीक्त उत्पादन शुल्क लादण्याचा मार्ग मोकळा होईल.    सिगारेटवर अतिरीक्त शुल्क लादल्यानंतर मिळणारा अतिरीक्त महसूल वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार राज्यांनाही दिल...

December 4, 2025 6:14 PM

views 52

State Bar Council Election: सर्वोच्च न्यायालयाच्या बार कौन्सिल ऑफ इंडियाला सूचना

राज्य बार कौन्सिलच्या आगामी निवडणुकांमधे महिलांसाठी ३० टक्के आरक्षण राहील याची खातरजमा करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयानं बार कौन्सिल ऑफ इंडियाला दिल्या आहेत. यासंदर्भात दाखल झालेल्या याचिकेवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती सुर्यकांत, आणि न्यायामूर्ती जोयमाला बागची यांच्या पीठापुढं आज सुनावणी झाली. त्या...

December 4, 2025 8:11 PM

views 24

इंडिगो कंपनीची ३०० विमान उड्डाणं रद्द

इंडिगो कंपनीची सुमारे ३०० विमान उ़ड्डाणं आज रद्द झाली आणि इतर अनेक विलंबानं उड्डाण करत होत्या. काल कंपनीची २० टक्क्यांहून कमी विमान वेळेवर उडाली होती. परिस्थिती नियमित करण्यासाठी आणि उड्डाण वेळेत करण्याचं कठीण उद्दिष्ठ गाठण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर यांनी ...

December 4, 2025 3:32 PM

views 96

महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष रेल्वे गाड्या धावणार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत येणाऱ्या अनुयायांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेनं ४ डिसेंबर ते १२ डिसेंबर या काळात १५ अनारक्षित विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर ते मुंबई, कलबुर्गी ते मुंबई, अमरावती ते मुंबई आणि कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर या विशेष गाड्या ध...

December 4, 2025 3:10 PM

views 232

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार!

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे. महाडीबीटी पोर्टल शेतकऱ्यांना ही मदत तत्काळ मिळणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. पूर्वी ऑफलाइन स्वीकारल्या जाणाऱ्या अर्जांची प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल करण्यात आली असल्याचे...

December 4, 2025 2:55 PM

views 38

नंदुरबार जिल्ह्यात सारंगखेडा यात्रेला सुरुवात

दत्तजयंतीच्या निमित्तानं नंदुरबार जिल्ह्यातल्या प्रसिद्ध सारंगखेडा इथल्या एकमुखी दत्तमंदिरात आज भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे. सारंगखेड्यातलं हे दत्तमंदिर महाराष्ट्र, गुजरातसह मध्यप्रदेशातील भाविकांचं श्रद्धास्थान आहे.    दत्तजयंतीचं औचित्य साधत सारंगखेडा इथं दरवर्षी मोठ्या यात्रोत्स...