December 7, 2025 8:21 PM

views 36

‘राज्याची आर्थिक स्थिती ओढाताणीची, मात्र दिवाळखोरीकडे वाटचाल नाही’

राज्याची आर्थिक स्थिती ओढाताणीची असली, तरी राज्य दिवाळखोरीकडे चाललेलं नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपूरच्या रामगिरी बंगल्यावर झालेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. विरोधकांनी परंपरा पाळत चहापानावर बहिष्कार टाकला. त्यांची पत्रकार प...

December 7, 2025 8:18 PM

views 45

इंडिगोच्या सेवेत सातत्यानं सुधारणा होत असल्याची नागरी विमानवाहतूक मंत्रालयाची ग्वाही

देशातल्या विमानसेवा व्यवस्थितपणे आणि पूर्ण क्षमतेनं कार्यरत असून इंडिगोच्या सेवेत सातत्यानं सुधारणा होत आहे, अशी ग्वाही नागरी विमानवाहतूक मंत्रालयानं आज दिली. विमानांची वेळापत्रकं पूर्वपदावर येत असल्याचंही मंत्रालयानं निवेदनाद्वारे सांगितलं. आज दिवसअखेरपर्यंत इंडिगोची उड्डाणं १ हजार ६५० पर्यंत पोहोच...

December 7, 2025 7:34 PM

views 39

गोव्यात नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू

गोव्यात आरपोरा इथल्या एका नाईट क्लबमध्ये काल रात्री लागलेल्या आगीमुळे मरण पावलेल्यांची संख्या २५ वर पोहोचली आहे. मृतांमध्ये चार पर्यटकांसह बहुतांश क्लबच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ही आग गॅस सिलिंडर स्फोटामुळे लागल्याचा अंदाज स्थानिक अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या क्लबमध्ये अग्निसुरक्षा नियमांचं ...

December 7, 2025 6:49 PM

views 38

Pune Marathon: महिला गटात भारताची साक्षी जडिया, तर पुरुष गटात इथियोपियाचा टेरेफे हैमानोत विजयी

पुणे मॅरेथॉनमध्ये पूर्ण मॅरेथॉन महिला गटात भारताची साक्षी जडिया हिनं विजेतेपद पटकावलं. आज झालेल्या या स्पर्धेत तिनं २ तास, ३९ मिनिटं आणि ३७ सेकंद इतक्या वेळेत ही शर्यत पूर्ण केली. दुसरा आणि तिसरा क्रमांक इथियोपियाच्या धावपटूंनी पटकावला.    पूर्ण मॅरेथॉनच्या पुरुष गटात इथियोपियाचा टेरेफे हैमानोत...

December 7, 2025 7:23 PM

views 23

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रीय गीतावर चर्चा होणार

वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला दीडशे वर्षं झाल्यानिमित्त उद्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेत या गीतावर चर्चा होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या चर्चेला सुरुवात करणार आहेत. दुपारी बारा वाजता चर्चेला सुरुवात होणार आहे. त्याचप्रमाणे निवडणूक सुधारणा या विषयावर ९ डिसेंबरला चर्चा होणार असल्याचं ...

December 7, 2025 2:59 PM

views 56

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीचा विधानपरिषदेच्या सभापतींकडून आढावा

राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपूर इथं सुरूवात होत आहे. विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेतला. अत्यावश्यक सुविधा, निवारा,पार्किंग, सुरक्षा व्यवस्था वायफाय, टपाल तसंच आहार याबाबत प्रशासनानं उत्तम पद्धतीनं नियोजन केलं असल्याचं त्यांनी नागपूर इथं वार्ताहर...

December 7, 2025 1:44 PM

views 43

पुढच्या दोन दिवसांसाठी ८९ विशेष रेल्वे गाड्या धावणार

गेल्या काही दिवसांपासून विमान उड्डाणांवर झालेल्या परिणामामुळे भारतीय रेल्वे सेवेने आपल्या विविध विभागांमध्ये पुढच्या दोन दिवसांसाठी ८९ विशेष रेल्वे गाड्या सोडण्याची घोषणा केली आहे. मध्य रेल्वे विभागात पुणे ते बेंगळुरू, पुणे ते दिल्ली आणि मुंबई ते दिल्ली यासह विविध मार्गांवर १४ विशेष गाड्या, पश्चिम र...

December 7, 2025 1:26 PM

views 22

१२५ पायाभूत सुविधा प्रकल्पांचं संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज सीमा रस्ते संघटनेच्या वतीनं उभारल्या जात असलेल्या, धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या १२५ पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन केलं. हे प्रकल्प ७ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांमध्ये उभारले जात आहेत.   हे पायाभूत सुविधा प्रकल्प देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलेल्या भ...

December 7, 2025 1:22 PM

views 45

मुंबई आणि दिल्ली विमानतळावरून इंडिगोची २२० पेक्षा जास्त उड्डाणं रद्द

इंडिगो विमानांच्या उड्डाणांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या  अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई आणि दिल्ली विमानतळावरून २२० पेक्षा जास्त उड्डाणं रद्द केली आहेत. मात्र,  लवकरच आपली सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू असून पंधराशेहून जास्त उड्डाणं चालवण्याचं आश्वासन इंडिगोने आपल्या निवेदना...

December 7, 2025 1:13 PM

views 36

आज ‘सशस्त्र सेना ध्वज दिन’

आज सशस्त्र सेना ध्वज दिन आहे. देशाचं संरक्षण करणाऱ्या जवानांचा आणि शहीदांचा सन्मान करण्यासाठी १९४९ पासून, ७ डिसेंबर हा दिवस सशस्त्र सेना ध्वज दिन म्हणून पाळला जातो. या दिनानिमित्त उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज सशस्त्र सेना ध्वज दिन निधीसाठी त्यांचं एका महिन्याचं वेतन दान केलं. सर्व नागरिक...