December 8, 2025 1:25 PM

views 31

एक कोटीचं बक्षीस असलेल्या नक्षली नेत्यासह बारा नक्षलवाद्यांचं छत्तीसगडमधे आत्मसमर्पण

नक्षली संघटनेच्या केंद्रीय कमिटीचा सदस्य रामाधर माज्जी याच्यासह बारा नक्षलवाद्यांनी छत्तीसगड पोलिसांसमोर आज आत्मसमर्पण केलं. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड विभागातल्या नक्षली चळवळीला यामुळे मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. रामाधर माज्जी याच्यावर एक कोटीचं इनाम होतं. एके ४७ रायफलसह रामाधरने पोलिस...

December 8, 2025 10:48 AM

views 34

नाशिक जिल्ह्यात सप्तशृंगी देवी गडाजवळ मोटार दरीत कोसळून सहा जण ठार

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात वणी इथल्या सप्तशृंगी देवी गडाजवळ मोटार दरीत कोसळून सहा जण ठार झाले आहेत. काल संध्याकाळी हा अपघात घडला. गडाच्या संरक्षक कठड्याची भिंत तोडून ही मोटार सुमारे हजार फूट खाली खोल दरीत कोसळली. अपघातातील सर्व मृत व्यक्ती नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत गावातील रहिवासी आहेत. प...

December 8, 2025 9:50 AM

views 15

भारत आणि युरोपियन संघांदरम्यान आज नवी दिल्लीत मुक्त व्यापार करारावर पुन्हा चर्चा सुरू होणार

भारत आणि युरोपियन संघांदरम्यान आज नवी दिल्लीत मुक्त व्यापार करार अर्थआत एफटीए वर चर्चा पुन्हा सुरू होणार आहे. दोन दिवसांच्या या संयुक्त सत्रादरम्यान युरोपिअन संघटना आणि भारत यांच्यातील मजबूत आर्थिक संबंध दृढ करण्याच्या दीर्घकालीन प्रयत्नात आणखी एक पाऊल असेल. भारतातील युरोपिअन संघटनेचे राजदूत हर्वे ड...

December 8, 2025 9:43 AM

views 32

छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओडिशा आणि विदर्भाच्या काही भागात थंडीची लाट

छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओडिशा आणि विदर्भाच्या काही भागात थंडीची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. अंदमान आणि निकोबार बेटे, तामिळनाडू पुडुचेरी आणि कराईकल इथं काही ठिकाणी वादळ आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.     पुढील चार दिवस आसाम, मेघालय, हिमाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझ...

December 8, 2025 9:36 AM

views 34

आजपासून नवी दिल्लीत युनेस्कोच्या आंतरसरकारी समितीचे २० वे अधिवेशन

  भारताचे 'विकास भी, विरासत भी' हे ब्रीदवाक्य म्हणजे आधुनिकीकरण आणि शहरीकरण करतानाच देशाची सांस्कृतिक वारसा जपण्याची वचनबद्धता आहे अशी खात्री प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केली. संयुक्त राष्ट्रांच्या वारसास्थळांच्या संवर्धनासाठी असलेल्या आंतरसरकारी समितीच्या 20 व्या सत्राच्या उद्घाटन सम...

December 8, 2025 9:25 AM

views 34

लोकसभेत आजपासून राष्ट्रीय गीत वंदे मातरमच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष चर्चा

लोकसभेत आजपासून वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष चर्चा सुरू होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लोकसभेत चर्चेला सुरुवात करतील. चर्चेसाठी दहा तासांचा वेळ देण्यात आला आहे.   लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत आज वंदे मातर...

December 7, 2025 8:25 PM

views 26

रशियाचे युक्रेनवर हवाई हल्ले

रशियानं काल रात्री युक्रेनवर संयुक्त क्षेपणास्त्र आणि ड्रोन हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये एक जण ठार झाल्याचं वृत्त आहे. युक्रेनचे ७७ ड्रोन पाडल्याचं रशियानं म्हटलं आहे. युक्रेनमधल्या क्रेमेन्चुक शहरातल्या पायाभूत सुविधांवर झालेल्या या हल्ल्यांमुळे वीज आणि पाणीपुरवठा खंडित झाला. क्रेमेन्चुक हे यु...

December 7, 2025 8:13 PM

views 32

अहमदाबादमध्ये गृहमंत्र्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज गुजरातमधल्या अहमदाबाद इथं विविध विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन केलं. अहमदाबादच्या थलतेज परिसरातल्या ८६१ घरांचं त्यांनी उद्घाटन केलं. दक्षिण बोपलमध्ये इलेक्ट्रोथर्म कंपनीनं अहमदाबाद महानगरपालिकेच्या सहकार्यानं विकसीत केलेल्या इलेक्ट्रोथर्म बागेचं, श...

December 7, 2025 8:10 PM

views 26

मध्य प्रदेशात १० नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण

मध्य प्रदेशात बालाघाट जिल्ह्यात १० नक्षलवाद्यांनी आज मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केलं. त्यात ७७ लाख रुपयांच बक्षीस असलेल्या सुरेंदर उर्फ कबीर या नक्षलवादी नेत्याचा समावेश आहे. नक्षलवादाचं संपूर्ण निरमूलन करुन मध्य प्रदेशाला नक्षलमुक्त करमं हे राज्य सरकारचं उद्दिष्ट आहे, असं मु...

December 7, 2025 7:22 PM

views 179

नागपुरात उद्यापासून विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन

राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपूर इथं सुरूवात होत आहे. विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेतला. अत्यावश्यक सुविधा, निवारा, पार्किंग, सुरक्षा व्यवस्था वायफाय, टपाल तसंच आहार याबाबत प्रशासनानं उत्तम पद्धतीनं नियोजन केलं असल्याचं त्यांनी नागपूर इथं वार्ताह...