December 12, 2025 3:32 PM

views 28

    वाशीम जिल्ह्यात रात्री झालेल्या गाडी अपघातात दोन जणांचा मृत्यु

    वाशीम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर काल रात्री झालेल्या अपघातात दोन जण मृत्युमुखी पडले तर दोन जण जखमी झाले. यवतमाळ इथून शिर्डीकडे जाणाऱ्या एका गाडीने पुढल्या गाडीला धडक दिल्यानं हा अपघात झाला. धनज बुद्रुक पोलिस स्थानकाच्या हद्दीत हा अपघात झाला. जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्याचं संबंधित स...

December 12, 2025 3:29 PM

views 18

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पातील अहवाल दोन महिन्यात सादर करण्याचे निर्देश

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पातील गौण खनिज ईटीएस मोजणी अहवाल दोन महिन्यात सादर करण्याचे निर्देश विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी आज दिले. या प्रकल्पात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून सरकारचा ६०० कोटींचा महसूल बुडाल्याची तक्रार अमोल कोमावर यांनी केली होती.   या प्रकरणी विधानसभ...

December 12, 2025 3:24 PM

views 8

बृहन्मुंबई महानगर क्षेत्रातील २० हजार इमारतींना भोगवटा

बृहन्मुंबई महानगर क्षेत्रातील तब्बल २० हजार इमारतींना भोगवटा देण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली. राज्यात शिक्षकाच्या ३७ हजार रिक्त जागा भरण्याची मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यां...

December 12, 2025 3:18 PM

views 25

कुपोषणमुळं होणारे बालमृत्यू टाळण्यासाठी प्रयत्नशील असल्याची राज्य सरकारची ग्वाही

राज्यातल्या तीव्र कुपोषित बालकांची संख्या २०१९-२० मध्ये २४६ होती. ती २०२५-२६ मध्ये ९७ पर्यंत कमी झाल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधान परिषदेत चर्चेच्या उत्तरात दिली. एकाही बालकाचा कुपोषणामुळे मृत्यू होऊ नये यासाठी शासन प्रयत्नशील आहे.   त्यासाठी महिला आणि बालविकास, ...

December 12, 2025 3:09 PM

views 40

महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक एकत्र लढवण्याचा महायुतीचा निर्धार

आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीचे घटक पक्ष एकत्र लढणार असल्याचं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं. ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते.   आगामी निवडणुकीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आपली बैठक झाली, यात एकत्र लढण्याविषयी...

December 12, 2025 3:01 PM

views 74

देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज विश्वनाथ पाटील चाकूरकर यांचं आज पहाटे लातूर इथल्या निवासस्थानी निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते.         गेल्या काही महिन्यांपासून त्यांची तब्येत ढासळली होती. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. पाटील यांनी लोकसभेच्या अध्यक्षपदासह केंद्...

December 12, 2025 2:56 PM

views 25

भारतात ठीक ठिकाणी आज थंडीची लाट

महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर कर्नाटक, ओदिशा, तेलंगणा आणि मध्य प्रदेशात आज थंडीची लाट राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, चंदीगड, दिल्ली आणि हिमाचल प्रदेशात काही ठिकाणी वातावरणात दाट धुकं राहील. ईशान्य भारतात आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम, आणि त्रिपुरा मध्येही अश...

December 12, 2025 2:54 PM

views 44

युरोप मधल्या शाळेत हिजाब किंवा बुरखा घालण्यावर बंदी

 युरोप मधल्या ऑस्ट्रिया या देशानं १४ वर्षांखालच्या मुलींनी शाळेत हिजाब किंवा बुरखा घालण्यावर बंदी घालणारा कायदा मंजूर केला आहे. हा नियम सर्व सरकारी आणि खासगी शाळांमध्ये लागू होणार आहे. तरुण मुलींना सक्षम बनवून त्यांना अत्याचारांपासून मुक्त ठेवण्यासाठी हा नियम अमलात आणल्याचं ऑस्ट्रिया सरकारनं म्हटलं ...

December 12, 2025 2:50 PM

views 24

पाकिस्तानच्या रात्री झालेल्या स्फोटात शाळा पूर्णपणे उद्ध्वस्त

पाकिस्तानच्या उत्तर वझिरिस्तानमधल्या मीर अली इथल्या एका सरकारी शाळेत काल रात्री झालेल्या स्फोटात शाळा पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. अयाज कोट इथल्या शाळेत अज्ञात हल्लेखोरांनी स्फोटके पेरली होती. या स्फोटामुळे शाळेतले सर्व शैक्षणिक उपक्रम ठप्प झाले आहेत.

December 12, 2025 2:46 PM

views 17

जपानमध्ये ६. ७ दशांश रिक्टर स्केल क्षमतेचा भूकंपाचा धक्का

जपानमध्ये, आओमोरी प्रांताच्या पूर्व किनाऱ्यावर आज सकाळी ६ पूर्णांक ७ दशांश रिक्टर स्केल क्षमतेचा भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाचा केंद्रबिंदू केप एरिमो प्रांताच्या  नैऋत्येला सुमारे १२० किलोमीटर अंतरावर भूगर्भात २० किलोमीटर खोलीवर होता.   जपानच्या हवामान संस्थेनं  भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा दि...