July 10, 2025 9:14 AM

views 32

पूर्व विभागीय परिषदेची गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रांची इथं 27 व्या पूर्व विभागीय परिषदेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतील. या बैठकीत झारखंड, बिहार, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या चार पूर्वेकडील राज्यांतील 70 प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. बिहार, ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील प्रलंबित आंतरराज्यीय मुद्द्यांवर चर्चा आणि मागील पर...

July 10, 2025 9:20 AM

views 23

आठ देशांवर नवीन कर लागू करण्याची अमेरिकेची घोषणा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्राझील, श्रीलंका, अल्जेरिया, इराक, लिबिया, फिलीपिन्स, मोल्दोव्हा आणि ब्रुनेई या आठ देशांमधून येणाऱ्या वस्तूंच्या आयातींवर नवीन आयातशुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. हे शुल्क 1 ऑगस्टपासून लागू होतील. ब्राझीलला सर्वाधिक 50 टक्के शुल्क आकारण्यात आले आहे. रा...

July 10, 2025 9:32 AM

views 25

महिला T20 पाच सामन्यांच्या मालिकेत भारताची विजयी आघाडी

भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघांदरम्यान ब्रिटनमध्ये काल झालेल्या मर्यादित 20 षटकांच्या चौथ्या सामन्यात, भारतीय संघाने यजमान इंग्लंडचा सहा गडी राखून पराभव केला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडनं 20 षटकांत 7 बाद 126 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, भ...

July 9, 2025 9:03 PM

views 30

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना नामिबियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान, दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करार

नामिबिया आणि भारत या दोन्ही राष्ट्रामधले संबंध अधिक दृढ केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना नामिबियाचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान देऊन आज गौरवण्यात आलं. प्रधानमंत्रांनी याबद्दल नामिबिया सरकारचे आणि तिथल्या नागरिकांचे आभार मानले आहेत.    या पुरस्कारामुळे प्रधानमंत्री मोदी यांना मिळालेल्या पुरस...

July 9, 2025 9:08 PM

views 184

वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर तुकडेबंदी कायदा शिथिल करण्याची घोषणा

राज्यातील वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर तुकडेबंदी कायदा शिथिल करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज  विधानसभेत केली. याबाबतच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना त्यांनी सांगितलं, की सध्या ५० लाखाहून अधिक कुटुंबांना तुकडेबंदी कायद्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याचा विचार क...

July 9, 2025 9:10 PM

views 35

गुजरातमधे अपघातातल्या मृतांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर

गुजरातमध्ये बडोदा जिल्ह्यात पदर इथं आज पहाटे पुलाचा काही भाग महिसागर नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. आणंद आणि बडोदा जिल्ह्यांना जोडणारा हा पूल होता.   अपघात झाल्यानंतर बडोदा जिल्हा प्रशासनानं तातडीनं बचा...

July 9, 2025 3:37 PM

views 20

विम्बल्डन टेनिस स्पर्धेत आज उपांत्यपूर्व सामने रंगणार

विम्बल्डन टेनिस स्पर्धेत आज संध्याकाळी ऑल इंग्लंड क्लबवर उपांत्यपूर्व सामने होणार आहेत. पुरुषांच्या एकेरीत इटलीचा यानिक सिनर आणि अमेरिकेचा बेन शिल्डन यांच्यात लढत होणार आहे. तर दुसऱ्या उपांत्य पूर्व फेरीत इटलीचा फ्लेव्हियो कोबोली याची लढत २४ वेळा ग्रँड स्लॅम विजेत्या नोवाक जोकोविच याच्याशी होईल. &nb...

July 9, 2025 3:14 PM

views 17

राज्यभरातल्या हजारो शिक्षकांचं मुंबईत आंदोलन

राज्यभरातील सुमारे सहा हजार अंशत: अनुदानित शाळांना अनुदान मिळावे, यासाठी गेल्या चार दिवसांपासून विनाअनुदानित शिक्षक आक्रमक झाले आहेत. मुंबईच्या आझाद मैदानात हजारो शिक्षक एकत्र आले असून त्यांनी आंदोलन सुरू केले. अनुदान मिळेपर्यंत मैदान सोडणार नाही, असा त्यांचा निर्धार आहे. राज्य सरकारने या शाळांना टप...

July 9, 2025 1:40 PM

views 22

छत्रपती संभाजीनगरमध्ये अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अत्याचाराप्रकरणी जिल्हा बालविकास अधिकाऱ्याचं निलंबन होणार

छत्रपती संभाजीनगर इथं विद्यादीप बालसुधारगृहमधे अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अत्याचाराची घटना, अतिशय गंभीर असून, याप्रकरणी जिल्हा बालविकास अधिकाऱ्याविरोधात कारवाई करत तत्काळ त्याचं निलंबन केलं जाईल, तसेच संबंधित संस्थेची मान्यता देखील रद्द करण्याचे निर्देश मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ...

July 9, 2025 1:34 PM

views 18

मुंबईतल्या डोंगराळ भागात दरड कोसळणे याप्रकरणी नव्याने सर्वेक्षण होणार

मुंबईतल्या डोंगराळ भागात दरड कोसळण्याचं प्रमाण लक्षात घेऊन याबाबत नव्याने सर्वेक्षण करण्यात येईल आणि आयआयटी मुंबईने यावर सुचवलेल्या उपाययोजनांनुसार कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज विधानसभेत दिली. याबाबतचा मूळ प्रश्न सुनील राऊत यांनी उपस्थित केला होता,...