July 16, 2025 7:29 PM

views 30

भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदासाठीच्या निवडणुकीत ४६ उमेदवार रिंगणात

भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदासाठीच्या निवडणुकीत ४६ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीकरिता १५३उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र १०७ उमेदवारांनी या निवडणुकीसाठी माघार घेतली असूनतब्बल नऊ वर्षानंतर ही निवडणूक होत असल्याने राजकीय नेत्यांमध्ये अधिकच चुरस पाहायला मिळत असून...

July 16, 2025 7:26 PM

views 51

‘वाढवण बंदर’ केवळ बंदर नव्हे तर एक आर्थिक क्रांती घडवून आणणारा केंद्रबिंदू ठरेल – मुख्यमंत्री

वाढवण बंदराच्या उभारणीमुळे महाराष्ट्र आणि भारत सागरी महासत्ता होण्याच्या दिशेनं  वेगानं  वाटचाल करत असून, हा प्रकल्प केवळ बंदर नव्हे तर एक आर्थिक क्रांती घडवून आणणारा केंद्रबिंदू ठरेल, असं  प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केलं आहे.   राज्य शासनाच्या मत्स्य व्यवसाय, बंदरे विभाग, आणि ...

July 16, 2025 7:04 PM

views 59

विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंना सभागृहाचा निरोप

विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ पुढच्या महिन्यात संपणार असल्यानं सभागृहानं आज त्यांना निरोप दिला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दानवे यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा आढावा घेतला. जनतेचे प्रश्न ठळकपणे मांडता यावेत यासाठी अभिनव आंदोलनं करण्यात दानवे यांनी हातोटी असू...

July 16, 2025 6:51 PM

views 18

प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेच्या अंमलबजावणीला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली.  पुढची ६ वर्षं देशातल्या १०० आकांक्षित जिल्ह्यांमधे ही योजना राबवली जाईल. कृषी उत्पादकता वाढवण...

July 16, 2025 3:48 PM

views 15

प्रादा ब्रँडवर कारवाई करण्याची मागणी आज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली

प्रादा या जागतिक फॅशन ब्रँडनं कोल्हापुरी चपलेशी साधर्म्य असलेल्या आरेखनाचा अनधिकृतपणे वापर केल्याबद्दल या ब्रँडवर कारवाई करण्याची मागणी करणारी जनहित याचिका आज मुंबई उच्च न्यायालयानं  फेटाळली. मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या पीठाने हा निर्णय दिला.   २२ जून रोजी मिल...

July 16, 2025 3:28 PM

views 34

ऑपरेशन मुस्कानअंतर्गत आत्तापर्यंत ४१ हजार १९३ लहान मुलांचा शोध

हरवलेल्या लहान मुलांचा शोध घेण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या ऑपरेशन मुस्कानअंतर्गत आत्तापर्यंत ४१ हजार १९३ लहान मुलांचा, तर ऑपरेशन शोधअंतर्गत गेल्या वर्षी १७ एप्रिल ते १५ मार्च या कालावधीत ४ हजार ९६० महिला सापडल्या असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं.   आमदार सुनील श...

July 16, 2025 3:28 PM

views 28

शेतकऱ्यांना सौर वीज घेण्याची सक्ती नाही- देवेंद्र फडणवीस

शेजारी राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात वीज दर कमी असून शेतकऱ्यांना सौर वीज घेण्याची सक्ती नाही मात्र, त्यांच्या सौर ऊर्जेशी संबंधित अडचणी समजून घेऊन त्यावर प्राधान्याने उपाय शोधले जात आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.   वीज दरवाढीचा प्रश्न...

July 16, 2025 3:20 PM

views 28

मुंबईत उपनगरी रेल्वे गाडीतून प्रवास करताना गेल्या 3 वर्षांत साडेसातहजारांहून अधिक नागरीकांचा मृत्यू  

मुंबईत उपनगरी रेल्वे गाडीतून प्रवास करताना गेल्या तीन वर्षांत साडेसातहजार पेक्षा जास्त जणांचा जीव गेला असून सुमारे ७ हजार३०० जण जखमी झाले असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधानसभेत दिली. गेल्या महिन्यात मुंब्रा-कळवा स्थानकांदरम्यान दोन लोकलमधले प्रवासी एकमेकांना धडकून झालेल्या अप...

July 16, 2025 3:10 PM

views 54

शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेची युती जाहीर

शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेची युती झाल्याची घोषणा शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी आज केली.   मुंबई इथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत या युतीची घोषणा करण्यात आली. गेल्या अडीच वर्षांत सामान्य माणसासाठी तसंच गोरगरीब, शोषित आणि वंचितां...

July 16, 2025 3:07 PM

views 34

तेलंगण सीमा भागातली वादग्रस्त १४ गावं लवकरच चंद्रपूर जिल्ह्यात समाविष्ट होणार

महाराष्ट्र-तेलंगणा सीमावादात अडकलेली  जिवती तालुक्यातील १४ मराठी गावं  लवकरच महाराष्ट्रात समाविष्ट होणार आहेत. ही  १४ गावं चंद्रपूर जिल्ह्यात येणार असून  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत , यावर अंतिम निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकु...