December 13, 2025 3:45 PM

views 102

डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर

अमरावती इथल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार’ यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर झाला आहे. राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. संस्थेच...

December 13, 2025 3:43 PM

views 24

राज्यात प्रक्रिया उद्योग उभे राहण्याची गरज – मुख्यमंत्री फडणवीस

राज्यात प्रक्रिया उद्योग उभे राहण्याची गरज असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नागपूर इथं सीआयआय अन्न प्रक्रिया परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते आज बोलत होते. या परिषदेमधे विविध विषयांवर चर्चा होईल, तसंच प्रक्रिया उद्योग क्षेत्रात प्रगती करण्यासाठी धोरणं आखली जातील, असं मुख्यम...

December 13, 2025 3:09 PM

views 30

ठाण्यात पाणीटंंचाई, ५० टक्के पाणीकपात

ठाणे शहरात आणखी चार दिवस ५० टक्के पाणीकपात केली जाणार असून शहरामध्ये पाणी वितरणाचा समतोल ठेवण्यासाठी १५ डिसेंबर पर्यंत प्रत्येक भागास दिवसातून १२ तास झोनिंग पद्धतीने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम अद्याप पूर्ण न झाल्यानं याकाळात नागरिकांना ...

December 13, 2025 3:07 PM

views 33

पुण्यात अनधिकृत गौण खनिज उत्खननप्रकरणी कारवाई

अनधिकृत गौण खनिज उत्खननप्रकरणी राज्य सरकारनं ४ तहसिलदार, ४ मंडळ अधिकारी आणि २ तलाठ्यांना निलंबित केलं आहे. पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यात वनीकरणासाठी राखीव असलेल्या क्षेत्रातून ९० हजार ब्रास अनधिकृत गौण खनिजाच्या उत्खनन प्रकरणी ही कारवाई झाली आहे. आमदार सुनील शेळके यांनी काल ही लक्षवेधी विधानसभेत...

December 13, 2025 3:04 PM

views 79

आगामी निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज ऑफलाईन दाखल करता येणार

आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी ऑफलाईन उमेदवारी अर्ज दाखल करता येईल, असं महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज सांगितलं. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत राज्य निवडणूक आयोगाची आज मुंबईत बै...

December 13, 2025 3:01 PM

views 19

स्वायत्त संस्थांच्या योजनांसाठी मार्गदर्शक तत्वं निश्चित करण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आश्वासन

बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत यासारख्या स्वायत्त संस्थांद्वारे अंमलबजावणी होणाऱ्या योजनांच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता आणली जाईल तसंच योग्य निकषांसह मार्गदर्शक तत्वे निश्चित केली जातील, असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिलं. या संस्थांची शिष्यवृत्ती ३ वर्षांपासून रखडली असल्याचा...

December 13, 2025 1:37 PM

views 31

पश्चिम बंगालमध्ये SIR दरम्यान २००२ च्या मतदार यादीत त्रुटी

पश्चिम बंगालमध्ये विशेष सखोल पुनरिक्षण अर्थात एसआयआर प्रक्रियेदरम्यान आई-वडील, नातेवाईकांच्या नावांच्या आधारे मतदारांची ओळख पटवताना २००२ च्या मतदार यादीत अनेक त्रुटी आढळून आल्या. विशेष सखोल पुनरिक्षणाचा पहिला टप्पा संपला असला तरी निवडणूक आयोग सातत्यानं याद्यांची पडताळणी करत आहे.    ८५ लाख १ हजा...

December 13, 2025 8:45 PM

views 29

माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लातूर शहराजवळच्या वरवंटी इथं त्यांच्या शेतात लिंगायत समाजाच्या परंपरेनुसार त्यांचा दफनविधी करण्यात आला. यावेळी पोलीस दलानं हवेत फैरी झाडून चाकुरकर यांना मानवंदना दिली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय संरक्ष...

December 13, 2025 1:28 PM

views 63

महाराष्ट्रात रस्ते विकासाकरता दीड लाख कोटी रुपये मंजूर

महाराष्ट्रातील रस्त्यांच्या कामासाठी दीड लाख कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. हे काम पुढल्या तीन महिन्यात सुरू होईल, असं ते म्हणाले. विधानपरिषदेच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते आज नागपुरात विधानभवन परिसरात गे...

December 13, 2025 1:23 PM

views 34

कोळसा खाणींच्या लिलावासाठी ‘कोलसेतू’ धोरणाला मंजुरी

कोळसा खाणींच्या लिलावासाठी तयार केलेल्या  कोलसेतू धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळानं  मंजुरी दिली आहे. विविध प्रकारचे उद्योग आणि निर्यातीसाठी कोळसाचा वापर करताना पारदर्शक यंत्रणा असावी आणि उपलब्ध साधनसुविधांना पुरेपूर वापर व्हावा असा या धोरणाचा उद्देश असल्याचं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नव...