July 20, 2025 6:49 PM

views 79

पालघरमध्ये युवकांसाठी रोजगार मेळाव्याचं आयोजन

राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाकडून पालघर जिल्ह्यात यंदा अंदाजे २० रोजगार मेळावे घेण्यात येणार असून पहिला मेळावा येत्या २२ जुलै रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर खासगी कंपन्यांनी त्यांच्याकडच्या रिक्त पदांची नोंदणी https://rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर करावी, असं...

July 20, 2025 7:58 PM

views 15

सौदी अरेबियाचे राजपुत्र अल वालिद यांचं निधन

सौदी अरेबियाचे राजपुत्र अल वालिद यांचं आज निधन झालं. ते ३६ वर्षांचे होते. निद्रिस्त राजपुत्र म्हणून ते ओळखले जात होते. २००५ साली लंडनमधे एका मोटार अपघातात गंभीररीत्या जखमी होऊन गेली २१ वर्षं कोमात होते. रियाधच्या इमाम तुर्की बिन अब्दुल्ला मशिदीच्या आवारत त्यांचा दफनविधी होणार आहे.

July 20, 2025 6:50 PM

views 46

मंत्री पीयूष गोयल यांच्या मुंबईतल्या कार्यालयात जनता दरबाराचं आयोजन

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या मुंबईतल्या कार्यालयात आज जनता दरबाराचं आयोजन केलं गेलं. यावेळी गोयल यांनी नागरिकांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी नागरिकांनी महानगरपालिका, गृहनिर्माण संस्था, पोलीस विभागांशी संबंधित आपल्या तक्रारी मांडल्या. तातडीनं या समस्या सोडवाव्य...

July 20, 2025 6:50 PM

views 25

राज्य महोत्सव म्हणून यंदाचा गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा होणार – मंत्री आशिष शेलार

राज्य महोत्सव म्हणून यंदाचा गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा केला जाईल, असं राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. पेणमध्ये हमरापूर, जोहे, कळवे या गावातील मुर्तीकारांच्या विविध संघटनांच्या वतीनं आज शेलार यांचा तांबडशेत इथं सत्कार केला गेला त्यावेळी ते बोलत होते. पीओपीच्या मूर्तींवरच्या ब...

July 20, 2025 3:26 PM

views 13

जगातले सर्वात वयस्कर मॅरेथॉनपटू फौजा सिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

जगातले सर्वात वयस्कर मॅरेथॉनपटू फौजा सिंग यांच्या पार्थिवावर आज पंजाबमधल्या त्यांच्या गावी बियास इथं शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया आणि मुख्यमंत्री भगवंतसिंह मान यांनी यावेळी उपस्थित राहून फौजा सिंग यांना आदरांजली वाहिली. फौजा सिंग यांचं गेल्या मंगळवारी व...

July 20, 2025 3:23 PM

views 68

पंढरपूर कॉरिडॉरसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी घेतली आढावा बैठक

पंढरपूर कॉरिडॉरसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच मुंबईत आढावा बैठक घेतली. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, भूसंपादन अधिकारी संतोष देशमुख यांच्या उपस्थितीत यातील भूसंपादनासंदर्भात माहिती घेण्यात आली.   काशी-उज्जैनच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर कॉरिडॉर निर्माण करण्याचं नियोजन आह...

July 20, 2025 3:38 PM

views 31

नळदुर्ग किल्ल्याच्या सौंदर्यवर्धनासह पर्यटनाच्या दृष्टीने विकास प्रकल्प हाती घेणार – प्रताप सरनाईक

धाराशिव जिल्ह्यातल्या नळदुर्ग किल्ल्याच्या सौंदर्यवर्धनासह पर्यटन वाढीच्या दृष्टीने भव्य विकास प्रकल्प हाती घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिली. पालकमंत्री सरनाईक यांनी आज २० जुलै रोजी नळदुर्ग किल्ल्याची सविस्तर पाहणी केली, आणि  सध्याच्या परिस्थितीचा आढावा...

July 20, 2025 3:14 PM

views 41

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार जाहीर

श्री संत नामदेव महाराज फड संस्थान आणि संत वंशज, पंढरपूर यांच्या वतीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार जाहीर झाला आहे. संत नामदेव महाराज यांच्या ६७५व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त येत्या गुरुवारी २४ जुलै रोजी पंढरपुरात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे....

July 20, 2025 3:31 PM

views 19

इंधन तेल खाणींचा शोध घेण्यासाठी १० लाख चौरस किमी समुद्री क्षेत्र खुलं !

सद्यस्थितीत दहा लाख चौरस किलोमीटर इतका सागरी प्रदेश तेल इंधनाच्या खाणींच्या शोधासाठी खुला केला असल्याची माहिती केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी समाजमाध्यमांवरून दिली आहे. याबरोबरीनंच ९९ टक्के नो-गो क्षेत्र देखील अशा शोधासाठी खुलं केलं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. ...

July 20, 2025 3:31 PM

views 17

मलेरिया प्रतिबंधक लस संशोधन प्रगतीपथावर

भारतीय औषध संशोधन परिषद आणि राष्ट्रीय प्रतिकारशक्तीशास्त्र संस्थेचे शास्त्रज्ञ संयुक्तपणे मलेरिया प्रतिबंधक लस विकसित करत आहेत. या लशीचे नाव ऍडफॅल्सीवॅक्स असं असून सध्या तिच्या चाचणीदरम्यानचे निकाल आशादायक असून लवकरच ती सार्वत्रिक वापरासाठी उपलब्ध होऊ शकेल. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत संपूर्ण स्वदेशी सं...