July 21, 2025 8:13 PM

views 21

संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब, लॅडिंग विधेयक २०२५ ला मंजुरी

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी चर्चा करावी या मागणीसाठी विरोधी पक्षांनी दोन्ही सभागृहात  सरकारला घेरत घोषणाबाजी केली. त्यामुळे दोन्ही  सभागृहाचं कामकाज तीनवेळा काही काळासाठी आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.     पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्र...

July 21, 2025 8:08 PM

views 18

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते व्ही एस अच्युतानंदन यांचं निधन

केरळचे माजी मुख्यमंत्री आणि  मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते व्ही एस अच्युतानंदन यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. ते १०१ वर्षांचे होते. गेल्या महिनाभरापासून  त्यांना जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आलं होतं.    देशाच्या स्वातंत्र्य चळवळीपासून अच्युतानंदन यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरु...

July 21, 2025 8:04 PM

views 9

मुंबईत २००६ मध्ये झालेल्या रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरणातल्या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

मुंबईत लोकल रेल्वेगाड्यांमध्ये २००६मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातल्या सर्व १२ आरोपींना सबळ पुराव्याअभावी आज मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केलं.      या १२ पैकी पाच आरोपींना फाशीची शिक्षा, तर उर्वरित आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. न्यायालयाने या सर्व आरोपींबाबतचा सत्र...

July 21, 2025 7:58 PM

views 23

समाज माध्यमांवर बेकायदा सट्टेबाजी करणाऱ्या ॲपची जाहिरातप्रकरणी ईडीचे समन्स

विविध समाज माध्यमांवर बेकायदा सट्टेबाजी करणाऱ्या ॲपची जाहिरात केल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं आज अभिनेता प्रकाश राज, राणा दुग्गुबाती, विजय देवरकोंडा यांच्यासह अनेकजणांना  चौकशीसाठी समन्स पाठवलं.     राणा दुग्गुबाती याला २३ जुलैला.प्रकाश राज यांना ३० जुलैला, विजय देवरकोंडाला  ६ ऑगस्टला तर ल...

July 21, 2025 7:52 PM

views 20

येत्या २४ तासांत पालघर वगळता कोकणात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे.     पावसाला अनुकूल वातावरण निर्माण झाल्यामुळे येत्या २४ तासांत पालघर वगळता कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून या भागाला ऑरेंज अलर्ट दिला आहे.  या काळात वाऱ्यांचा वेग वाढण्याची शक्यता असून मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याचा सल्ला हव...

July 21, 2025 7:49 PM

views 53

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेला संघर्ष सुरुच

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेला संघर्ष शांततेच्या मार्गानं त्यावर लवकरात लवकर संपवण्याची काढण्याची रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची इच्छा असल्याचं क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी एका मुलाखतीत  सांगितलं.    युक्रेनबरोबरच्या शांतता करारात चार ठिकाणांहून युक्रेन सैन्यानं म...

July 21, 2025 7:40 PM

views 24

नागालँडमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत भूस्खलन

गेल्या काही दिवसांपासून नागालँडमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत भूस्खलन आणि  दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. कोहीमाम इथं काल फेसेमा ते किसामा -कीगवेमा या मार्गावर भूस्खलन झालं. यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला असून याठिकाणच्या पायाभूत सुविधांचं मोठं नुकसान झालं आहे.  या मार्गाच्य...

July 20, 2025 7:59 PM

views 32

अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावरून निष्कर्ष काढणं योग्य नाही – मंत्री के. राम मोहन नायडू

अहमदाबाद विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर विमान अपघात तपास विभागाच्या प्राथमिक अहवालावरून कोणताही निष्कर्ष काढणं योग्य नाही असं मत केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री के. राम मोहन नायडू यांनी व्यक्त केलं. गाझियाबाद इथल्या हिंडन विमानतळावरून देशातल्या १० प्रमुख शहरांसाठी थेट विमान सेवा आजपासून सुरू झाली. या क...

July 20, 2025 7:58 PM

views 20

रशियाच्या कामचातका द्वीपकल्पाच्या आसपासच्या समुद्रात भूकंपाचे धक्के

रशियाच्या कामचातका द्वीपकल्पाच्या आसपासच्या समुद्रात आज पाच वेळा भूकंपाचे धक्के बसल्याचं अमेरिकेच्या खगोलशास्त्रीय सर्वेक्षण केंद्राने म्हटलं आहे. सगळ्यात मोठ्या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर ७ पूर्णांक ४ दशांश इतकी होती. या भूकंपानंतर त्सुनामीचा कोणताही धोका नसल्याचं प्रशांत त्सुनामी सूचना केंद्र...

July 20, 2025 7:47 PM

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात

संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार असून ते २१ ऑगस्टपर्यंत चालेल.  अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने नवी दिल्लीत संसद भवन इथं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.    ऑपरेशन सिंदूरबाबत संसदेत बोलण्यासाठी सरकार तयार असून भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी केल्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्य...