July 24, 2025 12:31 PM

views 23

अमरनाथ यात्रेसाठी ३५०० भाविकांची नवी तुकडी रवाना

अमरनाथ यात्रेसाठी आज जम्मू इथल्या शिबीरांतून साडेतीन हजार भाविकांची नवी तुकडी रवाना झाली. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, यात्रा सुरू झाल्यापासून गेल्या २१ दिवसांत ३ लाख ४२ हजारापेक्षा जास्त भाविकांनी अमरनाथ यात्रा पूर्ण केली असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. ...

July 24, 2025 9:41 AM

views 114

केंद्रीय गृहमंत्री राष्ट्रीय सहकार धोरण २०२५ ची घोषणा करणार

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज नवी दिल्लीतील अटल अक्षय ऊर्जा भवन येथे राष्ट्रीय सहकार धोरण २०२५ ची घोषणा करणार आहेत. हे धोरण हा एक प्रमुख सुधारणा उपक्रम असून पुढील दोन दशकांसाठी भारताच्या सहकारी चळवळीला ते मार्गदर्शक ठरेल अशी अपेक्षा आहे. भारताचं पहिलं राष्ट्रीय सहकार धोरण २००२ मध्ये सादर...

July 24, 2025 9:47 AM

views 39

भारत आणि इस्रायलची द्विपक्षीय संरक्षण सहकार्य भक्कम करण्यास सहमती

भारत आणि इस्रायल यांनी दीर्घकालीन दृष्टिकोनातून द्विपक्षीय संरक्षण सहकार्य आणखी भक्कम करण्यास सहमती दर्शविली आहे. संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी काल नवी दिल्ली इथं इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाचे महासंचालक मेजर जनरल अमीर बाराम यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेतली. संरक्षण मंत्रालयानं एका निवेदनात म्...

July 24, 2025 1:05 PM

views 51

दिव्या देशमुख FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल

जॉर्जियात बटुमी इथं सुरु असलेल्या फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक २०२५ च्या उपांत्य फेरीत   काल भारताच्या दिव्या देशमुखनं चीनच्या टॅन झोंगी हिला हरवून अंतिम फेरीत स्थान मिळवलं.पहिला सामना अनिर्णित राहिल्यानंतर दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून, दिव्यानं २०२६ मध्ये होणाऱ्या कँडिडेट्स स्पर्धेतही स्थान मिळवलं ...

July 23, 2025 7:06 PM

views 21

बिहारमधे मतदारयाद्यांच्या सखोल पुनरिक्षणाचं काम ९८ टक्के पूर्ण

बिहारमधे मतदारयाद्यांच्या सखोल पुनरिक्षणाचं काम ९८ टक्के पूर्ण झालं असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. आतापर्यंत गोळा झालेल्या माहितीनुसार  सुमारे २० लाख मतदारांचं आधीच निधन झालं आहे, तर सुमारे २८ लाख मतदार कायमचे स्थलांतरित झाले आहेत. सुमारे ७ लाख मतदारांची नावं एकापेक्षा अधिक ठिकाणी नोंदवली गेली...

July 23, 2025 3:38 PM

views 28

पर्यावरणाच्या दृष्टीनं मोठ्या मूर्तींंचं विसर्जन समुद्रातच करण्याचं राज्य शासनाचं उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरणाचा समतोल राखत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मोठ्या मूर्ती समुद्रात विसर्जित करण्यात येतील, असं प्रतिज्ञापत्र आज राज्य शासनाने मुंबई उच्च न्यायालयात सादर केलं. तसंच, विशिष्ट उंचीच्या घरगुती गणेश मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात येईल, असंही या प्रतिज्ञापत्रात नमूद...

July 23, 2025 3:39 PM

views 191

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर

यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर झाला आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ रोहित टिळक यांनी आज पुण्यात वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली.    हा सन्मान गडकरी यांच्या राष्ट्रनिर्माणातल्या भरीव योगदानासाठी दिला जाणार आहे. येत्या १ ऑगस्टला...

July 23, 2025 2:45 PM

views 29

ज्येष्ठ रंगकर्मी, आणि राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे माजी संचालक रतन थिय्याम यांचं निधन

ज्येष्ठ रंगकर्मी रतन थिय्याम यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं. ते ७७ वर्षांचे होते. मणिपूरमधे राहणारे थिय्याम इम्फाळ मधल्या रुग्णालयात गेले काही दिवस उपचार घेत होते. उपचारांदरम्यान आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.   नाटककार, दिग्दर्शक आणि  रंगमंचाला दिवाणखान्यातून बाहेर काढून मोकळ्यावर नेणाऱ...

July 23, 2025 2:42 PM

views 30

आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज जयंती आहे. यानिमित्त विविध ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात येत असून विविध उपक्रमांच आयोजन करण्यात आल आहे   लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. लोकमान्य टिळकानी देशवासियांच्या मनात स्वातंत्र्य...

July 23, 2025 2:38 PM

views 14

सीमापार दहशतवादाला मदत पुरवणाऱ्या देशांना दंड ठोठावण्याची भारताची मागणी

सीमापार दहशतवादाला मदत पुरवणाऱ्या देशांना दंड टोठावण्याची मागणी भारतानं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत केली आहे. भारताचे स्थायी प्रतिनिधी पी हरिश यांनी सुरक्षापरिषदेतर्फे आयोजित चर्चेत ही मागणी मांडली. ऑपरेशन सिंदूर थांबवण्याची विनंती  पाकिस्तानच्या लष्कर परिचालन विभागप्रमुखांनी केल्यानंतर ते...