August 15, 2025 1:45 PM

views 21

एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिनाचा देशभरात उत्साह

राजधानी दिल्लीतल्या मुख्य कार्यक्रमासह देशभरात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा होत आहे. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, डॉ. एस. जयशंकर, नितीन गडकरी, डॉ. जितेंद्र सिंह, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी शासकीय निवासस्थानी तिरंगा फडकावला. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी छत्रसाल ...

August 15, 2025 1:47 PM

views 24

उत्तम शिक्षण आणि मनुष्यबळ विकासाच्या जोरावर महाराष्ट्र देशाच्या विकासाचे नेतृत्व करेल, असा मुख्यमंत्र्यांना विश्वास

देशाच्या ७९व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्यात मंत्रालय इथं मुख्य शासकीय सोहळा झाला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना तसंच शहीद जवानांनाही आदरांजली वाहिली. जगातली सर्वोत्तम उत...

August 16, 2025 11:34 AM

views 59

पुतीन आणि ट्रम्प यांच्यातील महत्त्वाची शिखर परिषद कोणत्याही कराराविना संपन्न

रशियाचे राष्ट्रपती ब्लादीमीर पुतीन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अलास्कामध्ये महत्त्वाची शिखर परिषद कोणत्याही कराराविना संपली. अलास्कातील लष्करी तळावर जवळपास तीन तास झालेल्या चर्चेला मोठी प्रगती असं संबोधलं गेलं असलं तरीही या बैठकीत, युक्रेन रशिया संघर्षासंदर्भात तोडगा निघण्याच...

August 15, 2025 9:29 AM

views 9

गृह मंत्रालयाच्या विविध सुरक्षा दलांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार जाहीर

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं गृह मंत्रालयाच्या अखत्यारीतल्या विविध सुरक्षा दलांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना काल उत्कृष्ट सेवेसाठी शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आले. पोलीस, अग्निशमन, गृहरक्षक दल या विभागातील एक हजार नव्वद कर्मचाऱ्यांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. महाराष्ट्रातल्या ७ पोलिसांना शौर्य पद...

August 14, 2025 8:25 PM

views 12

पाकिस्ताननं केलेल्या कोणत्याही आगळिकीला सडेतोड उत्तर दिलं जाईल – परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

भारताविरुद्ध युद्धखोर, द्वेषपूर्ण आणि निष्काळजी वक्तव्यं करणं ही पाकिस्तानच्या नेत्यांची सवय असून पाकिस्ताननं केलेल्या कोणत्याही आगळिकीला सडेतोड उत्तर दिलं जाईल, अशी ग्वाही परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली. अशी आगळीक केल्यास त्याचे काय परिणाम होऊ शक...

August 14, 2025 8:22 PM

views 17

खेलो इंडिया जलक्रीडा महोत्सवाचा लोगो आणि शुभंकर चिन्हाचं अनावरण

पहिल्यावहिल्या खेलो इंडिया जलक्रीडा महोत्सवाचा लोगो आणि शुभंकरचिन्हाचं अनावरण आज श्रीनगर इथं झालं. हिमालयीन खंड्या हे या कार्यक्रमाचं शुभंकरचिन्ह असून याच्या लोगोमध्ये काश्मीरचं निसर्गसौंदर्य रेखाटण्यात आलं आहे. ही स्पर्धा श्रीनगरच्या दल लेक इथं २१ ते २३ ऑगस्टदरम्यान होणार आहे. यात ३६ राज्यं आणि कें...

August 14, 2025 8:17 PM

views 27

जम्मू काश्मीरमध्ये ढगफुटीसदृश्य पावसामुळे २३ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जखमी

जम्मू काश्मीरमध्ये किश्तवाड जिल्ह्यातल्या चसोटी इथं झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसात २३ जणांचा मृत्यू झाल्याची भीती असून १०० पेक्षा जास्त लोक जखमी झाल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात मालमत्तेचंही नुकसान झाल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर इथली मच्छेल माता यात्रा स्...

August 14, 2025 8:13 PM

views 13

बिहारमध्ये मतदारयाद्यांमधून वगळलेल्यांची नावं प्रसिद्ध करायचे निवडणूक आयोगाला आदेश

बिहारमध्ये मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणानंतर मसुदा मतदारयाद्यांमधून वगळलेल्या ६५ लाख लोकांची नावं संकेतस्थळावर जिल्हानिहाय प्रसिद्ध करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज निवडणूक आयोगाला दिले. ही नावं का वगळली, हेसुद्धा यात नमूद करावं, ओळखपत्र क्रमांकानुसार ही कागदपत्रं शोधता यायला हवीत, ...

August 14, 2025 8:10 PM

views 22

स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात ‘हर घर तिरंगा’ मोहीम

भारताच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात विविध राज्यांमध्ये हर घर तिरंगा मोहीम राबवण्यात येत आहे. चेन्नईजवळ आवडी इथं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर. एल. मुरुगन यांनी तिरंगा रॅलीला संबोधित केलं. केरळमध्ये तिरुवनंतपुरम इथे रेल्वे पोलीस दलानं मोटारसायकल रॅलीचं आयोजन केलं. छत्तीसगडच...

August 15, 2025 9:49 AM

views 18

राष्ट्रपतींचं देशवासीयांना संबोधन

युवा, महिला आणि मुख्य प्रवाहाच्या बाहेर राहिलेल्या व्यक्ती देशाला अमृत काळात आघाडीवर ठेवतील, असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल व्यक्त केला. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी देशवासीयांना संबोधित केलं. सामाजिक क्षेत्रातले विविध उपक्रम तसंच समग्र आर्थिक विकासामुळं २०४७ पर्य...