August 28, 2025 7:02 PM

views 28

राज्यभरात ठिकठिकाणी दीड दिवसांच्या गणपतीच्या विसर्जन

दीड दिवसांच्या मंगलमूर्तींचं आज विसर्जन होत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेनं यंदा २७५ हून अधिक कृत्रिम तलाव उभारले आहेत. यंदा ५०० हून अधिक निर्माल्य कलश विसर्जन स्थळांवर उपलब्ध करण्यात आले आहेत. आज दुपारी तीन वाजेपर्यंत मुंबईत ५७५ घरगुती तर ३ सार्वजनिक गणेशमूर्तींचं विसर्जन झालं. नवी मुंबईत नैसर्गिक 2...

August 29, 2025 11:23 AM

views 18

शक्तीपीठ महामार्गाचा कोल्हापूर जिल्ह्यातला नियोजित आराखडा राज्य सरकारकडून रद्द

कोल्हापूर जिल्ह्यातला शक्तीपीठ महामार्गाचा नियोजित आराखडा राज्य सरकारनं रद्द केला आहे. यासंदर्भातला शासन आदेश आज सार्वजनिक बांधकाम विभागानं जारी केला.   पवनार ते सांगली दरम्यानच्या आराखड्याला मान्यता देतानाच, शिरोळ, करवीर, हातकणंगले, कागल, भुदरगड आणि आजरा तालुक्यात या महामार्गाच्या आखणीचे सर्व ...

August 29, 2025 11:22 AM

views 43

मराठा किंवा ओबीसी समाजावर अन्याय न करता दोन्ही समाजाचे प्रश्न सोडवण्याचा मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार

मराठा किंवा ओबीसी दोन्ही समाजावर अन्याय होणार नाही, दोन्ही समाजाचे प्रश्न शासन सोडवेल, या पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केला. कोणत्याही समाजाचे हक्क काढून दुसऱ्या समाजाला दिले जाणार नाहीत, दोघांना न्याय देण्याची सरकारची भूमिका आहे, असं फडनवीस म्हणाले.    दहा टक्के आरक्षण दिल्यावर...

August 28, 2025 6:46 PM

views 20

विरारमध्ये इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू, सरकारकडून मदत जाहीर

विरारमध्ये एक इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झालेला आहे. विरार मधल्या रमाबाई अपार्टमेंट या चार मजली इमारतीचा मागील भाग मंगळवारी रात्री चाळीवर कोसळला होता. इमारतीमधल्या ५० पैकी १२ सदनिका यात कोसळल्या असून ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे.   मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस या...

August 29, 2025 11:23 AM

views 12

जेष्ठ अभिनेते दिग्दर्शक बाळ कर्वे यांचं आज सकाळी मुंबईत वार्धक्यानं निधन

जेष्ठ अभिनेते दिग्दर्शक बाळ कर्वे यांचं आज सकाळी मुंबईत वार्धक्यानं निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. चिमणराव मालिकेत त्यांनी वठवलेली गुंड्याभाऊंची भूमिका अद्याप रसिकांच्या स्मरणात आहे.   बन्या बापू, लपंडाव, सुंदरा  सातारकर, चटक चांदणी अशा चित्रपटांमधून तर रथचक्र, तांदूळ निवडता निवडता, आई रिटायर ...

August 28, 2025 4:49 PM

views 30

राज्यातल्या काही भागात अतिवृष्टी, पुणे-सातार-कोल्हापूरला हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट

जोरदार पावसामुळे राज्यातल्या काही भागात पूर परिस्थिती आणि पडझडीच्या घटना घडल्या आहेत. पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट परिसराला हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसंच प्रशासनातर्फे NDRF आणि SDRF यांना आपत्कालीन परिस्थितीकरता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.   नांदेड जिल्ह्यात ...

August 28, 2025 4:47 PM

views 7

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज जपान दौऱ्यावर जाणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी जपानला रवाना होणार आहे. १५ व्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत ते सहभागी होणार आहेत. जपानचे प्रधानमंत्री शिगेरू इशिबा यांच्यासोबतची ही त्यांची शिखर परिषद आहे. संरक्षण आणि सुरक्षा, व्यापार, तंत्रज्ञान, आणि नवोन्मेष यावर या बैठकीत चर्चा होईल, असं परराष्ट्र मंत्र...

August 28, 2025 4:45 PM

views 9

कच्च्या कापसावरच्या आयातशुल्कातल्या सवलतीला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

केंद्र सरकारनं कापसाच्या गाठीवरील आयातशुल्कातल्या सवलतीला   येत्या ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. देशातल्या वस्त्रोद्योग क्षेत्राला पुरेशा प्रमाणात कापूस उपलब्ध व्हावा, यादृष्टीनं हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी ही मुदत ३० सप्टेंबरपर्यंत होती.

August 28, 2025 3:29 PM

views 34

पॅरिसमध्ये सुरु बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खेळाडूंचं अंतिम १६ मध्ये स्थान

पॅरिसमध्ये सुरु बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी आणि ऑलिंपिक पदक विजेती पीव्ही सिंधू यांनी काल अंतिम १६ मध्ये स्थान मिळवलं. सात्विक आणि चिराग या भारतीय जोडीने चिनी तैपेईच्या लिऊ कुआंग हेंग आणि यांग पो हान यांचा पराभव केला.   म...

August 28, 2025 3:24 PM

views 11

इस्रायल गाजा शहर आणि उत्तर गाजा पट्टीवर हल्ले करणार

इस्रायल गाजा शहर आणि उत्तर गाजा पट्टीवर  लष्करी हल्ले  करणार असून त्यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांनी दक्षिणेकडे स्थलांतर करावं, असं इस्रायलच्या  संरक्षण दलांनी म्हटलं आहे.   दक्षिणेकडच्या पट्ट्यात मोठी मोकळी जागा शिल्लक असून इथं मानवतावादी दृष्टिकोनातून मदतसाहित्यही पुरवलं जात असल्याचं इस्र...