December 18, 2025 6:56 PM

views 25

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या स्थापनेला आव्हान देणारी याचिका फेटाळली

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या स्थापनेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली. या सर्किट बेंचमुळे सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळणं सुलभ होईल, असं न्यायालयानं म्हटलं आहे. न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठासमोर या याच...

December 18, 2025 6:54 PM

views 16

राज्यसभेत ‘अणुऊर्जेचा शाश्वत वापर आणि प्रगती विधेयक, २०२५’ वर चर्चा

राज्यसभेत आज ‘अणुऊर्जेचा शाश्वत वापर आणि प्रगती विधेयक, २०२५’ वर चर्चा सुरु झाली. लोकसभेत काल हे विधेयक मंजूर झालं होतं. अणु ऊर्जेचा विकास आणि नागरिकांच्या कल्याणासाठी अणुऊर्जा निर्मितीमध्ये किरणोत्साराचं आयनीकरण, तसंच अणुऊर्जेच्या सुरक्षित वापरासाठी मजबूत नियामक चौकट निर्माण करणं, हे या विधेयकाचं उ...

December 18, 2025 3:05 PM

views 653

VB GRAMG Bill: व्ही बी जी-राम जी विधेयक! नेमकं काय?

विकसित भारत- रोजगार आणि आजीविका हमी अभियान अर्थात व्ही बी जी-राम जी विधेयक २०२५ आज लोकसभेत आवाजी मतदानाने मंजूर झालं. हे विधेयक २० वर्षांपासून चालत आलेल्या, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा, २००५ अर्थात 'मनरेगा'ची जागा घेईल. मनरेगात १०० दिवसांच्या रोजगाराची हमी दिली आहे. या विधेयकात ...

December 18, 2025 3:35 PM

views 135

काँग्रेसला धक्का! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश

काँग्रेस नेत्या आणि विधान परिषद सदस्य प्रज्ञा सातव यांनी आज भाजपात प्रवेश केला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महसूल मंत्री चंंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित होते. भाजपा प्रवेश करण्यापूर्वी प्रज्ञा सातव यांनी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्याकडे सदस्यत्वाचा राजीनामा सुपूर्द केला. लोक...

December 18, 2025 3:33 PM

views 41

तपोवनातल्या वृक्षतोडीला मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती

नाशिक इथं भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात साधुग्राम उभारण्यासाठी तपोवनातल्या वृक्षतोडीला मुंबई उच्च न्यायालयाने १४ जानेवारीपर्यंत स्थगिती दिली आहे. नाशिक इथे राहणाऱ्या एका नागरिकाने या संदर्भात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर आज उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी झाली. तपोवनातली ही झाडं ३० ते ४० वर्षं जुनी अ...

December 18, 2025 2:51 PM

views 19

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांच्या कारवाईत ३ नक्षली ठार

छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांच्या कारवाईत आज तीन नक्षली मारले गेले. गोलापल्ली पोलीस ठाणे परिसरात आज सकाळी सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलींमधे चकमक सुरू झाली, यात तीन नक्षलींचा मृत्यू झाला. छत्तीसगड राज्यात या वर्षभरात २८४ नक्षली चमकमीकत मारले गेल्याचं सुरक्षा दलानं म्हटलं आहे.  

December 18, 2025 1:33 PM

views 26

‘सिक्युरिटीज मार्केट्स कोड बिल २०२५’ लोकसभेत सादर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत ‘सिक्युरिटीज मार्केट्स कोड बिल २०२५’ सादर केलं. भारतीय शेअर बाजाराशी संबंधित सर्व कायद्यांचं एकत्रीकरण करून त्यामध्ये सुधारणा करणं, हे या विधेयकाचं  उद्दिष्ट आहे. हे विधेयक पुढल्या छाननीसाठी आर्थिक विषयावरच्या संसदीय स्थायी समितीकडे पाठवण्याचा प्...

December 18, 2025 5:49 PM

views 15

व्हीबी – जीरामजी विधेयक मागे घेण्यासाठी विरोधकांचं निदर्शन

व्हीबी- जी राम जी हे विधेयक मागे घ्यावं, या मागणीसाठी आज विरोधी पक्ष सदस्यांनी संसद भवन परिसरात निदर्शनं केली. मनरेगाचे फलक हातात घेऊन विरोधकांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यापासून ते मकरद्वारापर्यंत घोषणाबाजी करत मोर्चाही काढला. केंद्र सरकारने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अपमान केला असून भारताच्या ...

December 18, 2025 1:18 PM

views 33

भारत-ओमान व्यापार शिखर परिषद दोन्ही देशांच्या भागीदारीला नवी दिशा आणि गती देईल – प्रधानमंत्री

भारत - ओमान व्यापार शिखर परिषद दोन्ही देशांच्या भागीदारीला एक नवी दिशा आणि गती देईल, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज ओमानची राजधानी मस्कत इथं शिखर परिषदेला संबोधित करत होते. ओमान आणि भारत प्राचीन काळापासून एकमेकांसोबत व्यापार करत आहेत, अरबी समुद्र दोन्ही देशांना जोडणारा...

December 18, 2025 7:01 PM

views 92

शिल्पकार राम सुतार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार

ख्यातनाम  शिल्पकार महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्या पार्थिवावर आज  नोएडा इथल्या वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले तसंच राज्य शासनाच्या वतीनं  राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.अंत्यसं...