September 19, 2025 1:46 PM

views 37

शेती उपकरणांशी संबधित वस्तू आणि सेवा करामधल्या सुधारणांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं-कृषी मंत्री

कृषीवापरासाठीच्या उपकरणांशी संबधित वस्तू आणि सेवा करामधल्या सुधारणांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे असं केंद्रीय कृषीमंत्री शिवराज चौहान यांनी म्हटलं आहे.   यामुळे  शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठा फरक पडेल, असं ते म्हणाले. शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रांवरचा कर १२ ते १८ टक्क्यांवरुन ५ टक्...

September 19, 2025 1:42 PM

views 19

जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम पंघलला कांस्यपदक

भारताची कुस्तीपटू अंतिम पंघल हिनं जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक पटकावून भारताचं पदकांचं खातं उघडलं. महिलांच्या ५३ किलो वजनी गटात तिनं स्विडनच्या प्रतिस्पर्ध्याचा ९-१ असा पराभव केला. या स्पर्धेतलं तिचं हे दुसरं पदक आहे आणि ही कामगिरी करणारी ती दुसरी भारतीय महिला कुस्तीपटू आहे.

September 19, 2025 1:39 PM

views 24

मणिपूरमध्ये ६ अतिरेक्यांना अटक, मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रं, दारूगोळा जप्त केला

मणिपूरमध्ये पोलीस आणि सुरक्षा दलांनी गेल्या २४ तासांत चुडाचांदपूर, तेंगनौपाल आणि चंदेल या जिल्ह्यांमध्ये मोठी शोधमोहीम राबवून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रं, दारूगोळा जप्त केला, तसंच ६ कट्टरपंथीयांना अटक केली. त्यांच्याकडून २ एसएलआर रायफली, १ इन्सास रायफल, १ संशोधित पॉइंट ३०३ रायफल, १ इन्सास एलएमजी म...

September 19, 2025 10:16 AM

views 31

अफगाणिस्तानमधील बागराम हवाई तळ ताब्यात घेण्यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न सुरू

अफगाणिस्तानमधील बागराम हवाई तळ ताब्यात घेण्यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न सुरू असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी काल सांगितलं. अमेरिकेनं या तळावरचं नियंत्रण सोडल्यानंतर तालिबाननं अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवलं होतं. हा विमानतळ चीनच्या अण्वस्त्र केंद्रांच्या जवऱळ असल्यामुळं अमेरिकेला त्याच्या...

September 19, 2025 10:16 AM

views 27

जागतिक दर्जाचं ब्लू पोर्टस् बांधण्यासाठी भारत आणि संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेची भागीदारी

भारत आणि संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेनं जागतिक दर्जाचे ब्लू पोर्टस् म्हणजे तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक बंदरं बांधण्यासाठी भागीदारी केली आहे. मत्स्यव्यवसाय विभागानं देशातील ब्लू पोर्ट पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी  या संघटनेशी तांत्रिक सहकार्याबाबतच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. प्राय...

September 19, 2025 10:14 AM

views 26

डीजीसीएची चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवेला मंजुरी

विमानवाहतूक महासंचालनालय म्हणजे डीजीसीएनं चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवेला मंजुरी दिली आहे. मॉन्सून संपल्यानंतर ही सेवा सुरू करायला परवानगी देण्यात आली आहे. सुरक्षाविषयक अनेक तपासण्यांनंतर ही परवानगी देण्यात आल्याचं विमानवाहतूक मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. विमानवाहतूक मंत्री राममोहन नायडू...

September 18, 2025 8:32 PM

views 22

राज्य सरकार आणि केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट इंडिया यांच्यात सामंजस्य करार

राज्य सरकारनं केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट इंडिया सोबत आज मुंबईत सामंजस्य करार केला. महाराष्ट्रात विद्यार्थी आणि शिक्षकांची संख्या मोठी असून केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट इंडिया कडे कौशल्य आहे. दोघांमधील सामंजस्य करार हा राज्यातील शालेय शिक्षणाला जागतिक दर्जा प्राप्त होण्यास...

September 18, 2025 8:27 PM

views 48

GST: व्यावसायिक वस्तुंची वाहतूक करणाऱ्या वाहनांवरचे कर कमी

जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर परिषदेनं नुकत्याच जीएसटी करांमध्ये सुधारणा केल्या. अनेक क्षेत्रांमध्ये दर कमी केल्यामुळे याचा फायदा सर्वसामान्यांना होणार आहे. व्यावसायिक वस्तुंची वाहतूक करणाऱ्या वाहनांवरचे करही कमी करण्यात आले आहेत. देशातली ६५ ते ७० टक्के मालवाहतूक करणाऱ्या ट्रकसारख्या वाहनांवरचा २८...

September 18, 2025 8:16 PM

views 44

EPFOच्या सदस्यांना एकाच लॉगिनच्या माध्यमातून सेवांचा लाभ मिळणार

ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे सदस्य आता एकाच लॉगिनच्या माध्यमातून सर्व सेवांचा लाभ घेऊ शकणार आहे. कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी ही माहिती दिली आहे. या बदलामुळे वापरकर्त्यांच्या तक्रारी कमी होतील, पारदर्शकता वाढेल आणि सदस्यांना सुविधांचा लाभही सुलभतेने मिळू शकेल. ...

September 18, 2025 8:12 PM

views 27

डिजिटल व्यक्तिगत डेटा संरक्षण नियमांचं काम अंतिम टप्प्यात – मंत्री अश्विनी वैष्णव

डिजिटल व्यक्तिगत डेटा संरक्षण नियमांचं काम अंतिम टप्प्यात आलं असून येत्या काही दिवसांतच ते प्रसिद्ध केले जातील, अशी माहिती केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज दिली. एआय इम्पॅक्ट समिट २०२६चं बोधचिन्ह आणि महत्त्वाच्या उपकरणांच्या प्रकाशनाच्या वेळी ते बोलत होते....