October 5, 2025 6:31 PM

views 139

विदर्भानं तिसऱ्यांदा पटकावलं ‘इराणी चषक’

प्रथम वर्ग क्रिकेट मध्ये नागपूर इथं झालेल्या स्पर्धेत, विदर्भानं आज शेष भारत संघाचा ९३ धावांनी पराभव करत तिसऱ्यांदा इराणी चषकावर नाव कोरलं. विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या या पाच दिवसांच्या सामन्यात विदर्भानं पहिल्या डावात, अथर्व तायडेच्या १४३ आणि यश राठोडच्या ९१ धावांच्या जोरावर ३४२ धाव...

October 5, 2025 3:40 PM

views 53

पालघर जिल्ह्यातल्या ८ गावांची सुंदर गाव पुरस्कारासाठी निवड

ग्राम विकास विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेअंतर्गत २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी पालघर जिल्ह्यातल्या आठ गावांची ‘सुंदर गाव पुरस्कार’साठी निवड झाली आहे. यामध्ये पालघर तालुक्यातलं कुरगाव हे गाव जिल्हास्तरीय सुंदर गाव ठरलं आहे.   कुरगाव ग्रामपंचायतीला जिल्हास्त...

October 5, 2025 3:39 PM

views 50

सोलापूर जिल्ह्यातल्या पुरग्रस्त गावात आरोग्य आणि स्वच्छता मोहीम

सोलापूर जिल्ह्यातल्या पुरग्रस्त 82 गावात आरोग्य आणि स्वच्छतेची व्यापक मोहीम, जिल्हा परिषद यंत्रणेनं हाती घेतली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी ही माहिती दिली आहे.   पहिल्या टप्यात 53 गावात ही मोहिम राबवण्यात आली आहे. या सर्व गावांमध्ये आरोग्य शिबिरं घेऊन नागरिकांच...

October 5, 2025 3:10 PM

views 33

धाराशिवमध्ये पुन्हा जोरदार पाऊस

धाराशिव जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसानं जिल्ह्यात पुन्हा जोरदार हजेरी लावली असून काल रात्री अकरा वाजल्यापासून रात्रभर भूम, वाशी आणि कळंब तालुका परिसरात जोरदार पाऊस बरसला. नद्यांचं पाणी वाढल्यानं अनेक गावांकडे जाणारे रस्ते बंद आहेत. सध्या पावसाचा जोर ओसरला असून वातावरण ढगाळ...

October 5, 2025 3:08 PM

views 2K

मराठवाडा विभाग पदवीधर मतदार संघ मतदार नोंदणीला प्रारंभ

मराठवाडा विभाग पदवीधर मतदार संघ मतदार नोंदणीला प्रारंभ झाला आहे. मतदारांनी येत्या ६ नोव्हेंबरपर्यंत नाव नोंदवण्याचं सांगण्यात आलं आहे. पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची मतदार यादी दर वेळी नव्यानं तयार करण्यात येते. त्यामुळं यापूर्वीच्या निवडणुकीतील मतदार यादीत आपलं नाव असलं तरी ते रद्द होत असल्यानं  ...

October 5, 2025 3:27 PM

views 89

कफ सिरपच्या सेवनानं मुलांचे मृत्यू, आरोग्य मंत्रालयाने बोलावली बैठक

राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये कफ सिरपच्या सेवनानं काही मुलांचे मृत्यू झाल्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांच्या आरोग्य सचिवांची बैठक बोलावली आहे. आज संध्याकाळी  चार वाजता आरोग्य मंत्रालयाच्या सचिवाच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून सर्व राज्यं आणि केंद्रशासित...

October 5, 2025 2:32 PM

views 41

बिहारमधल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा

बिहारमधल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा  आढावा घेण्यासाठी  निवडणूक आयोगानं आज तिथल्या विविध प्रशासकीय यंत्रणा, पोलीस अधिकारी, केंद्रीय पोलीस दल आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत बैठका घेतल्या. निवडणुकीच्या काळात, काळा पैसा, मद्य आणि अंमली पदार्थांचा धोका ओळखून करायच्या  उपाययोजनांबाबत  मु...

October 5, 2025 3:30 PM

views 158

शक्ती चक्रीवादळाच्या प्रभावामुळे देशात मुसळधार पाऊस

ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शक्ती या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून पुढच्या काही दिवसात ते अधिक शक्तिशाली होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. ७ ऑक्टोबरपर्यंत उत्तर कोकण किनारपट्टी...

October 5, 2025 6:49 PM

views 53

Shakhti Cyclone : राज्यात जोरदार पावसाची शक्यता

ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शक्ती या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून पुढच्या काही दिवसात ते अधिक शक्तिशाली होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या मंगळवारपर्यंत उत्तर कोकण किनार...

October 5, 2025 2:43 PM

views 118

देशभरात १७ कोटीहून जास्त रोजगार निर्मिती

देशात गेल्या सहा वर्षात सुमारे १७ कोटी नवीन रोजगारांची निर्मिती झाली आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयानं यासंदर्भात जारी केलेल्या आकडेवारीनुसार वर्ष २०२३-२४ मध्ये ६४ कोटी ३३ लाख रोजगार निर्माण झाले असून सहा वर्षांपूर्वी २०१७-१८ मध्ये ही संख्या ४७ कोटी ५० लाख इतकी होती. याशिवाय बेरोजगारीच्या दरात देखी...