October 13, 2025 7:22 PM

views 40

एसटी महामंडळाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळी भेट !

एसटी महामंडळाच्या ८५,००० कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून ६,००० रुपये सानुग्रह अनुदान तसंच सणाची उचल म्हणून १२,५०० रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. एसटी कर्मचारी संघटनांची आणि कृती समितीची बैठक मुंबईत आज झाली, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत ...

October 13, 2025 7:18 PM

views 89

नैऋत्य मौसमी पावसाची राज्यातून पूर्णपणे माघार

नैऋत्य मौसमी पावसानं राज्यातून पूर्णपणे माघार घेतली असल्याचं हवामान विभागानं जाहीर केलंय. राज्यातला मान्सूनचा माघारीचा प्रवास आज पूर्ण झाला. आता केवळ दक्षिण भारत आणि ओडिशातून मान्सूनची माघार शिल्लक आहे.    येत्या दोन दिवसात राज्याच्या चारही विभागांमधे तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागान...

October 13, 2025 6:42 PM

views 69

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इस्रायलचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर

युद्धबंधीसाठी महत्त्वाची भूमिका निभावल्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इस्रायलचा सर्वोच्च नागरी सन्मान इस्रायली प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ ऑनरनं जाहीर झाला आहे. इस्रायलचे राष्ट्रपती आयझॅक हर्जोग ट्रम्प याना हा पुरस्कार प्रदान करतील. या आधी हा सन्मान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओब...

October 13, 2025 6:34 PM

views 31

सामाजिक विमा सुरक्षा कवच प्रदान करण्यासाठी केंद्रसरकारची कामगार नावनोंदणी मोहीम

कामगारांना सामाजिक विमा सुरक्षा कवच प्रदान करण्याच्या हेतूनं केंद्रसरकारने कामगार नावनोंदणी मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार उद्योगमालकांनी/अभियोक्त्यांनी आपणहून आपल्याकडच्या पात्र कामगारांची नावं नोंदवायची आहेत. येत्या १ नोव्हेंबरपासून पुढच्या वर्षीच्या ३० एप्रिल पर्यंत ही मोहीम सुरु राहील. १ जुलै २...

October 13, 2025 6:30 PM

views 37

मोंगोलियाचे अध्यक्ष खुलेरसुख उखना नवी दिल्लीत पोहचले

मोंगोलियाचे अध्यक्ष खुलेरसुख उखना यांचं ४ दिवसांच्या भारतभेटीसाठी आज नवी दिल्लीत आगमन झालं. केंद्रीय हवाई वाहतूक राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्याचं विमानतळावर स्वागत केलं. त्यानंतर त्यांना परंपरिक मानवंदना देण्यात आली. या दौऱ्यात उखना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार असून उद्या ते प्रध...

October 13, 2025 8:18 PM

views 24

कॅनडाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी घेतली प्रधानंमत्री मोदींची भेट

कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद यांनी आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भारत-कॅनडा द्विपक्षीय भागीदारीला नवीन गती देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांसाठी ही भेट महत्त्वाची असल्याची भावना प्रधानमंत्र्यांनी त्यांचं स्वागत करताना व्यक्त केली. व्यापार, ऊर्जा, तंत्रज्ञान, शेत...

October 13, 2025 5:38 PM

views 21

केरळमध्ये मेंदुच्या प्राणघातक संसर्गामुळे आणखी एकाचा मृत्यू

केरळमध्ये अमिबिक एन्सेफलायटिस या मेंदुच्या प्राणघातक संसर्गामुळे आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. हा रुग्ण तिरुवनंतपुरम वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार घेत होता. याच रुग्णालयात संबंधित संसर्गग्रस्त असलेल्या १७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दूषित पाण्यामध्ये आढळणाऱ्या जिवंत अमिबामुळे हा संसर्ग होत...

October 13, 2025 8:11 PM

views 184

२०२५साठीचा अर्थशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर

२०२५साठीचा अर्थशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार जुएल मोकीर, फिलिप आगियों आणि पीटर हॉविट यांना जाहीर झाला आहे. तंत्रज्ञान किंवा नवोन्मेषामुळं कशारितीनं आर्थिक प्रगती होऊ शकते याबद्दल मोकीर यांनी संशोधन केलं. त्यांना या पुरस्कारातली अर्धी रक्कम दिली जाईल. उर्वरित अर्धी रक्कम इतर दोघांमध्ये वाटली जाईल. नव...

October 13, 2025 3:44 PM

views 18

  देशाच्या ईशान्य भागातली आठही राज्यांनी एकतेचा संदेश दिल्याचं नितीन गडकरी यांचं प्रतिपादन

देशाच्या ईशान्य भागातली आठही राज्यं महत्त्वाची असून भाषा आणि संस्कृती वेगळी असूनही या राज्यांनी एकतेचा संदेश दिल्याचं प्रतिपादन रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. ते काल नागपूर इथे आयोजित नॉर्थ इस्ट ऑक्टेव्ह महोत्सवाच्या समारोपावेळी बोलत होते.   आपल्या कार्यकाळात ईशान्य भा...

October 13, 2025 3:38 PM

views 23

पीएम गतिशक्ती योजनेमुळे नियोजन आणि सूक्ष्म स्तरावर अंमलबजावणी शक्य झाली- पियुष गोयल

पीएम गतिशक्ती योजनेमुळे मोठ्या प्रमाणावर नियोजन आणि सूक्ष्म स्तरावर अंमलबजावणी शक्य झाल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. या योजनेला  ४ वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.   या योजनेमधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी दिसून ये...