October 14, 2025 7:34 PM

views 55

जहाल नक्षलवादी भूपती गडचिरोलीत आत्मसमर्पण करणार

नक्षलवाद्यांच्या पॉलिट ब्युरोचा सदस्य असलेल्या भूपती उर्फ मल्लोजुला वेणुगोपाल उद्या गडचिरोली इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण करणार असल्याचं वृत्त आहे. त्याच्यावर विविध राज्यात १० कोटी रुपयांचं बक्षीस आहे. त्याच्यासोबत ६० नक्षलवादी सुद्धा आत्मसमर्पण करतील. यामुळं नक्षल चळ...

October 14, 2025 7:29 PM

views 90

इंडिया मेरीटाइम विक २०२५ या कार्यक्रमासाठी मुंबईत कायमचं केंद्र उभारावं – मुख्यमंत्री फडणवीस

भारतीय सागरी क्षेत्राच्या विकासासाठी इंडिया मेरीटाइम विक २०२५ या कार्यक्रमासाठी केंद्र सरकारनं मुंबईत कायमचं केंद्र उभारावं, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. मंत्रालयात आज झालेल्या बैठकीत त्यांनी इंडिया मेरीटाईम विकच्या आयोजनाचा आढावा घेतला. केंद्रीय बंदरे, जहाज आणि जलमार्ग मंत्री स...

October 14, 2025 7:24 PM

views 42

भारतातून अमेरिकेला जाणारी टपाल सेवा पुन्हा सुरु

भारतातून अमेरिकेला जाणारी टपाल सेवा उद्यापासून पुन्हा सुरु होणार आहे. अमेरिकेच्या आयात शुल्क धोरणांच्या अंमलबजावणीनंतर २२ ऑगस्ट २०२५ पासून ही सेवा स्थगित करण्यात आली होती. नवीन रचनेनुसार भारतातून टपालाने अमेरिकेत पाठवण्याच्या पार्सलवर भारतातच शुल्क वसुली होईल. अमेरिकेत प्रवेश करताना त्यावर पुन्हा उत...

October 14, 2025 7:13 PM

views 34

पात्र गावांना वनहक्क देण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश

पात्र गावांना वनहक्क देण्यासंदर्भात आदिवासी विकास आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. मुंबई इथं मंत्रालयात वनहक्क कायदा २००६ च्या अंमलबजावणीसंदर्भात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.   आदिवासी वनपट्टेधारका...

October 14, 2025 7:09 PM

views 36

माता रमाबाई नगर आणि कामराज नगर झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाचं भूमिपूजन

मुंबईत माता रमाबाई नगर आणि कामराज नगर झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते झालं. गेल्या ४० वर्षांपासून इथले लोक कठीण परिस्थितीत जगत आहेत, त्यांचा खडतर प्रवास आज संपला असून, या १७ हजार कुटुंबांचं घरांचं स्वप्न महायुती सरकार पूर्णत्वाला नेईल, असं उपमुख्...

October 14, 2025 3:57 PM

views 37

देशात कमावत्या महिलांची गेल्या दहा वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढ

देशातल्या एकूण कमावत्या लोकसंख्येमधे महिलांचं प्रमाण गेल्या दहा वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढलं असून २०२३-२४ मधे ते ४२ टक्के झाल्याची माहिती,  कामगार आणि रोजगार मंत्रालयानं दिली आहे. कमावत्या महिलांचं प्रमाण वाढण्यात भारत ‘ब्रिक्स’ देशात आघाडीवर असल्याचं जागतिक बँकेच्या आकडेवारीत म्हटलं आहे.   कौ...

October 14, 2025 3:49 PM

views 23

नोव्हेंबर दरम्यान देशभरात चौथी डीएलसी मोहीम राबवणार

निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभाग येत्या १ ते ३० नोव्हेंबर दरम्यान देशभरात चौथी डीएलसी, अर्थात संगणकीकृत हयातीच्या दाखल्यांची मोहीम राबवणार आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी मोहीम असून, देशातले  एकूण २ हजार जिल्हे आणि उप-विभागीय मुख्यालयांमध्ये ती राबवली जाईल.   या टप्प्यात देशभरात...

October 14, 2025 3:38 PM

views 100

इंधनाच्या दर कपातीमुळं चलनवाढीत घट

घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढीचा दर सप्टेंबर महिन्यात १३ शतांश टक्के होता. यंदाच्या ऑगस्टमध्ये हा दर ५२ शतांश टक्के आणि गेल्यावर्षीच्या सप्टेंबरमध्ये १ पूर्णांक ९१ शतांश टक्के होता. खाद्यपदार्थ आणि इंधनाच्या दरात झालेल्या कपातीमुळं चलनवाढीत घट झाली.

October 14, 2025 3:35 PM

views 33

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणातील आरोपींना जामीन मंजूर

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणातले मुख्य आरोपी, वीरेंद्र तावडे, शरद कळसकर आणि अमोल काळे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं आज जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती शिवकुमार दिगे यांच्या एकल पीठानं ते तोंडी आदेश दिले. आदेशाची प्रत अद्याप उपलब्ध झालेली नाही.

October 14, 2025 3:30 PM

views 11

कचऱ्याचा वापर महामार्गांच्या बांधकामासाठी केला जाणार

देशातल्या सर्व महानगरपालिकांमधे जमा होणाऱ्या कचऱ्याचा वापर महामार्गांच्या बांधकामासाठी केला जाईल, असं  केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते काल चेन्नई मध्ये एका कार्यक्रमात बोलत  होते. रस्ते बांधणीसाठी कचऱ्याचा वापर करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण योजना ...