October 15, 2025 8:27 PM

views 31

पाकिस्ताननं केलेली शस्रसंधीची विनंती अफगाणिस्तानकडून मान्य

पाकिस्तानच्या विनंतीवरून अफगाणिस्ताननं शस्त्रसंधी करायला संमती दिली आहे. तालिबानचे प्रवक्ते झबिनुल्ला मुजाहिद यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.    पाकिस्ताननं आज सकाळी पुन्हा एकदा अफगाणिस्तानच्या स्पिन बोलडक भागात हल्ला केला. त्यात १२ अफगाणी नागरिक ठार, तर १०० पेक्षा जास्त जखमी झाले. प्रत्युत्तराद...

October 15, 2025 8:03 PM

views 39

ज्येष्ठ तेलगु अभिनेत्री-गायिका रावु बालसरस्वती देवी यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेत्री आणि तेलुगु चित्रपटसृष्टीतल्या पहिल्या पार्श्वगायिका रावु बालसरस्वती देवी यांचं हैदराबाद इथं निधन झालं त्या ९७ वर्षांच्या होत्या. बालकलाकार म्हणून त्यांनी काम सुरु केलं. १९४३ मधे भाग्यलक्ष्मी या चित्रपटात अभिनेत्री कमला कोटणीस यांच्यासाठी त्यांनी पहिल्यांदा पार्श्वगायन केलं. अभिनेत्...

October 15, 2025 8:08 PM

views 40

अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमाभागातल्या अशांततेबद्दल संयुक्त राष्ट्रांची चिंता

संयुक्त राष्ट्रांनी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमाभागातल्या अशांततेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. दोन्ही देशांनी हिंसाचारावर नियंत्रण आणावं आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन करावं असं आवाहन संयुक्त राष्ट्रांचे विशेष प्रतिनिधी रिचर्ड बेनेट यांनी केलं आहे. अफगाणिस्तानच्या कंदाहार प्रांतातल्या स्पिन ब...

October 15, 2025 7:56 PM

views 26

ब्राझीलचे उपाध्यक्ष जेराल्ड अलक्मीन तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर

ब्राझीलचे उपाध्यक्ष आणि विकास, व्यापार आणि सेवा मंत्री जेराल्ड अलक्मीन आजपासून तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याबरोबर ते उद्या व्यापार मंत्रीस्तरीय आढावा बैठकीत सहभागी होतील. येत्या तीन दिवसांत ते उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन , संरक्षणमंत्री राजनाथ सिंह , पररा...

October 15, 2025 7:46 PM

views 51

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या विकासकामांना मंजुरी

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीने जिल्ह्यातल्या विकासकामांना मंजुरी दिली असून निधी वितरण करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला २०२५-२६ साठी २८२ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. यातील तीस टक्के म्हणजे ८४ कोटी ६० लाख रुपये जिल्हा नियोजन समितीला प्राप्त झाले आहेत. या निधी...

October 15, 2025 7:39 PM

views 146

Bihar Elections : प्रधानमंत्र्यांचा कार्यकर्त्यांशी नमो ऍपच्या माध्यमातून संवाद

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज बुथस्तरावरच्या कार्यकर्त्यांशी नमो ऍपच्या माध्यमातून संवाद साधला. रालोआसाठी एकत्रित काम करण्याचं आवाहन यावेळी मोदी यांनी केलं. संयुक्त जनता दल, लोकजनशक्ती पार्टी रामविलास, राष्ट्रीय लोकमोर्चा आणि हिंदुुस्तानी आवाम मोर्चा हे...

October 15, 2025 7:24 PM

views 72

वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल पवार यांची तत्काळ सुटका करण्याचे आदेश

वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल पवार यांना सक्तवसुली संचालनालयानं केलेली अटक ही बेकायदा असल्याचा निर्वाळा देऊन त्यांची तत्काळ सुटका करायचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं आज दिले. पवार यांना अटक करताना ईडीकडे ठोस पुरावे नव्हते आणि अशी अटक पीएमएलए कायद्याला धरून नाही, असा निर्वाळा मुख्य न्यायाधीश ...

October 15, 2025 7:18 PM

views 42

दिल्ली आणि मुंबईच्या हवेत प्रदूषणकारी वायूंच्या पातळीत वाढ

दिल्ली आणि मुंबईच्या हवेतली कार्बन डायॉक्साईड आणि मिथेन या प्रदूषणकारी वायूंची पातळी गेले अनेक वर्षं वाढत असल्याचं आयआयटी मुंबईच्या संशोधकांच्या अहवालात दिसून आलं आहे.    दिल्लीच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक काल २११ पर्यंत अर्थात ‘वाईट’ या श्रेणीत पोचला असून येत्या शुक्रवारपर्यंत तो ३४६ पर्यंत ...

October 15, 2025 7:06 PM

views 38

सोलापूर-मुंबई विमानसेवेला सुरुवात

सोलापूर-मुंबई या नव्या विमानसेवेमुळे सोलापूर परिसरातल्या औद्योगिक विकासाला गती आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केलं आहे. सोलापूर-मुंबई विमान सेवेला सुरुवात केल्यानंतर ते बोलत होते. लवकरच सोलापूरला आयटी पार्क उभारला जाईल. त्यामुळे स्थानिकांना रोजगाराच...