October 18, 2025 1:41 PM

views 31

तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या कंपाऊंड प्रकारात भारताच्या ज्योती सुरेखा वेण्णम हिला कांस्यपदक

चीन इथं सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या कंपाऊंड प्रकारात भारताच्या ज्योती सुरेखा वेण्णम हिनं कांस्यपदक पटकावून इतिहास रचला. या स्पर्धेत पदक मिळवणारी ती पहिली भारतीय कंपाऊंड तिरंदाज आहे. कांस्यपदकासाठीच्या सामन्यात तिनं ग्रेट ब्रिटनच्या एला गिबसन हिच्यावर १५० विरुद्ध १४५ गुण मिळवून मात के...

October 18, 2025 1:29 PM

views 49

देशातला नक्षलवाद लवकरच संपुष्टात आणण्याची प्रधानमंत्र्यांची ग्वाही

देशातला नक्षलवाद लवकरच संपुष्टात आणणार असल्याची ग्वाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. ते काल नवी दिल्ली इथं एका खासगी वृत्तसंस्थेनं आयोजित केलेल्या जागतिक शिखर परिषदेत बोलत होते. आपल्या सरकारनं सुरुवातीपासूनच दिशाभूल झालेल्या तरुणांना मुख्य प्रवाहात परत आणण्यासाठी पूर्ण संवेदनशीलतेनं काम ...

October 18, 2025 5:41 PM

views 65

लखनौ इथं संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत ब्राह्मोस क्षेपणास्त्राचं लोकार्पण

उत्तरप्रदेशातल्या लखनौ इथल्या ब्राह्मोस एअरोस्पेस युनिटमधे तयार  झालेल्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राचं लोकार्पण आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत झालं. या युनिटमधे क्षेपणास्त्र निर्मिती ते चाचणीपर्यंतच्या सर्व प्रक्रिया पार पडतात. ब्राह्मोस हे ...

October 18, 2025 1:04 PM

views 26

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस इथं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेंस्की यांची भेट

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी युक्रेनला लांब पल्ल्याच्या टोमाहॉक क्रूझ क्षेपणास्त्रांचा पुरवठा करण्याबाबत संकोच व्यक्त केला आहे. युक्रेन आणि रशिया मधल्या संघर्षामुळे वाढत असलेल्या जागतिक दबावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी काल व्हाईट हाऊस इथं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेंस्की यां...

October 18, 2025 12:54 PM

views 19

मोझाम्बिक इथं लॉन्च बोट उलटल्याने तीन भारतीय नागरिकांचा मृत्यू

मोझाम्बिक इथं लॉन्च बोट उलटल्याने तीन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून पाच जण बेपत्ता आहेत. बोट समुद्रकिनाजवळ आल्यानंतर ही दुर्घटना घडल्याचं भारताच्या मोझम्बिकमधल्या उच्चायुक्तालयानं सांगितलं. या बोटीत १४ कामगार प्रवास करत होते.   

October 18, 2025 12:50 PM

views 18

गाझापट्टीत मदत साहित्य घेऊन जाणारं संयुक्त अरब अमिरातीचं जहाज रवाना

गाझापट्टीत मदत साहित्य घेऊन जाणारं संयुक्त अरब अमिरातीचं जहाज आज रवाना झालं. यात ७ हजार दोनशे टन मदत साहित्य तसंच जीवनावश्यक वस्तू आहेत. त्याचप्रमाणे यात ६८० टन खाद्यपदार्थ, १६० टन निवाऱ्यासाठी उपयोगी पडणारं साहित्य, ३६० टन औषधं आणि पाणी याचाही समावेश आहे.  

October 18, 2025 11:25 AM

views 45

डिजिटल अटकेचा बहाणा करून व्यावसायिकाचे ५८ कोटी रुपये लुटणाऱ्या 3 आरोपींना अटक

डिजिटल अटकेचा बहाणा करून मुंबईतल्या एका व्यावसायिकाचे ५८कोटी रुपये लुटणाऱ्या 3 आरोपींना महाराष्ट्र सायबर पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं 'डिजिटल अटक' या सायबर गुन्ह्याबाबत गंभीर दखल घेत केंद्रीय अन्वेषण संस्थेकडून उत्तर मागितलं आहे. हरयाणातल्या अंबाला इथल्या एका ज्येष्ठ नागरिक म...

October 18, 2025 1:38 PM

views 194

भारताच्या सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा उपांत्य फेरीचा सामना जपानच्या ताकुरो होकी आणि युगो कोबायाशी या जोडीशी होणार

डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत आज दुपारी भारताच्या सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा उपांत्य फेरीचा सामना जपानच्या ताकुरो होकी आणि युगो कोबायाशी या जोडीशी होणार आहे. काल रात्री झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सात्त्विक-चिराग जोडीनं इंडोनेशियाच्या जोड...

October 18, 2025 10:40 AM

views 26

अफगाणिस्तानच्या पक्तिका भागात पाकिस्ताननं केलेल्या हवाई हल्ल्यात दोन लहान मुलांसह सहा जणांचा मृत्यू

अफगाणिस्तानच्या पक्तिका भागात पाकिस्ताननं केलेल्या हवाई हल्ल्यात काल दोन लहान मुलांसह किमान सहा जणांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही देशांनी दोन दिवसांचा युद्धबंदी करार केला असतानाही हा हल्ला झाला असं टोलो या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. अर्गन आणि बारमल जिल्ह्यातल्या रहिवासी भागातहे हवाई हल्ले करण्यात आले.

October 18, 2025 9:44 AM

views 96

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत समाप्त; निवडणूक प्रचाराला तेजी

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काल संपली. पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांमधील 121 विधानसभा मतदारसंघांसाठी 6 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्जांची छाननी आज होणार असून, 20 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भर...