October 18, 2025 8:07 PM

views 71

नंदूरबार इथं रस्ते अपघातात ८ जणांचा मृत्यू

नंदुरबार जिल्ह्यात अस्तंभा यात्रेवरून परतत असलेल्या भाविकांची गाडी चांदशैली घाटात दरीत कोसळून झालेल्या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला, तर २७ जण जखमी झाले आहेत. आज सकाळी साडेदहाच्या सुमाराला घाटातल्या वळणावर चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं गाडी दरीत कोसळली. तळोदा उपजिल्हा रुग्णालयातल्या डॉक्टरांनी ...

October 18, 2025 3:10 PM

views 61

बीडमध्ये जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी उपोषण

आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी या जमातींना जात प्रमाणपत्र मिळावं, या मागणीसाठी बीड जिल्ह्यात माजलगाव इथं सहा दिवसांपासून उपोषण सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मोहन जगताप यांनी आज उपोषणस्थळी जाऊन आंदोलकांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माजलगाव आणि बीडचे जिल्हाधिकारी...

October 18, 2025 3:13 PM

views 104

पत्रकाराला मारहाण केल्याप्रकरणी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांना दंड

पत्रकाराला मारहाण केल्याप्रकरणी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांना अलिबाग जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवून पाच हजार रुपये दंड ठोठावला आहे. तसंच एक वर्षाचं चांगल्या वर्तणुकीचं हमीपत्र लिहून देण्याचा आदेश दिला आहे. २०१९ च्या निवडणुकीत वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या हर्षद कशाळकर या पत्रकाराला ...

October 18, 2025 7:46 PM

views 180

जीएसटी कपातीमुळे बाजारपेठेतली उलाढाल २० लाख कोटी रुपयांनी वाढण्याचा सरकारचा अंदाज

वस्तू आणि सेवा कराच्या दरांमध्ये केलेल्या कपातीमुळं यंदाच्या वर्षी देशात ग्राहकांकडून होणारी खरेदी १० टक्के म्हणजे २० लाख कोटी रुपयांनी वाढेल असा अंदाज सरकारनं व्यक्त केला आहे. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, पीयूष गोयल आणि अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेला संबोधित केलं.  ...

October 18, 2025 3:12 PM

views 82

अहिल्यानगर जिल्ह्यात नुकसानग्रस्तांना मदत जाहीर

अहिल्यानगर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नूकसानीपोटी ८ लाख २७ हजार ११८ शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाख रूपयांची मदत महायुती सरकारनं जाहीर केल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. दिवाळीपुर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत वर्ग करण्याच्या सूचना प्रशासन...

October 18, 2025 3:23 PM

views 68

यवतमाळमध्ये विद्यार्थ्यांची पर्यावरण पूरक दीपोत्सव साजरा करण्याची शपथ

यवतमाळ जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील परसोडी खुर्द इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक दीपोत्सव साजरा करण्याची शपथ घेतली. मोठ्या आवाजाच्या फटाक्यामुळे पर्यावरण संतुलन बिघडतं तसंच मानवासह पशुपक्ष्यांवर त्याचे विपरीत परिणाम होतात, याबाबत शिक्षकांनी माहिती देऊन विद्यार्थ्य...

October 18, 2025 2:48 PM

views 46

धुळे पोलिसांची दिवाळी सणानिमित्त विशेष मोहिम

धुळे शहरात दिवाळी सणामुळे वाढलेली गर्दी, वाहतुकीची कोंडी तसंच विविध गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी धुळे पोलीस दलानं विशेष मोहीम हाती घेतली आहे. शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी गस्त वाढवली आहे. शहरात शांतता आणि आनंदी वातावरण राखण्यासाठी नागरिकांनी जबाबदार वर्तन करावं असं आवाहन पोलिसांनी ...

October 18, 2025 3:12 PM

views 34

फरार हिरे व्यापारी मेहुुल चोकसी याची अटक योग्य असल्याचा बेल्जियमच्या न्यायालयाचा निर्वाळा

फरार हिरे व्यापारी मेहुल चोकसी याला भारताच्या विनंतीवरून बेल्जियम पोलिसांनी चोकसीला केलेली अटक योग्य असल्याचा निर्वाळा बेल्जियमच्या एका न्यायालयानं काल दिला. त्याच्या भारतात प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेतलं हे एक मोठं पाऊल मानलं जात आहे. १३ हजार कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणात मेहुल चोक...

October 18, 2025 2:25 PM

views 41

अभिनेता अक्षय कुमारला हंगामी व्यक्तिमत्व संरक्षण प्रदान

मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेता अक्षय कुमार याला तात्काळ प्रभावाने हंगामी व्यक्तिमत्व संरक्षण प्रदान केलं आहे. याद्वारे न्यायालयाने समाज माध्यम मंच, ई-कॉमर्स संकेतस्थळं आणि ए आय निर्मित चित्रफीत निर्मात्यांना त्याचं नाव, प्रतिमा, साम्यस्थळं आणि आवाज वापरण्यावर प्रतिबंध घातले आहेत. डिजिटल मंचाच्या माध...

October 18, 2025 2:27 PM

views 50

महाराष्ट्र नौदल क्षेत्राचा पदभार रिअर अ‍ॅडमिरल शंतनू झा यांनी स्वीकारला

महाराष्ट्र नौदल क्षेत्राचा पदभार रिअर अ‍ॅडमिरल शंतनू झा यांनी स्वीकारला आहे. आयएनएस कुंजली इथं काल झालेल्या समारंभात रिअर अ‍ॅडमिरल अनिल जग्गी यांच्याकडून झा यांनी पदभार स्वीकारला. राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे पदवीधर असलेले शंतनू झा यांची १ जुलै १९९३ रोजी भारतीय नौदलात नियुक्ती झाली. आय एन एस विक्रमादि...