October 20, 2025 3:08 PM

views 48

सर्वत्र दीपावलीचा उत्साह

दीपावलीचा सण सर्वत्र उत्साहाने साजरा होत आहे. राज्यात आज नरकचतुर्दशीनिमित्त घरोघरी चंद्रोदयापूर्वी अभ्यंगस्नान करुन, फटाके फोडून आणि दिवाळीचा फराळ करुन सर्वांनी सणाचा आनंद लुटला. सणानिमित्त सर्वजण एकमेकांना शुभेच्छा आणि भेटी देत आहेत. घरोघरी विविध आकारांचे आकाशकंदील आणि मनमोहक रांगोळ्या सर्वांचं लक्...

October 20, 2025 3:08 PM

views 70

GST Reforms : जाणून घ्या, घर खरेदी क्षेत्रातला बदल…

२२ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या जीएसटी बचत उत्सवाचा फायदा समाजाच्या सर्व घटकांना होत आहे. आज जाणून घेऊ या जीएसटी सुधारणांमुळे घर खरेदी क्षेत्रात झालेल्या बदलांबद्दल…   जीएसटी प्रणालीतल्या सुधारणांमुळे घर बांधणीसाठीची सामग्री आणि पर्यायाने एकंदर खर्च कमी होऊन या क्षेत्राला मोठी चालना मिळाली आहे. सिमें...

October 21, 2025 9:26 AM

views 27

राष्ट्रपती मुर्मू आजपासून ४ दिवसांच्या केरळ दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून केरळच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहे. राष्ट्रपती आज तिरुअनंतपुरम इथं पोहोचतील. त्या उद्या सबरीमला मंदिरात दर्शन घेणार आहेत. तिरुअनंतपुरम इथल्या राजभवन इथं गुरुवारी माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन पुतळ्याचं अनावरण त्या करतील. श्री नारायण गुरु समाधीच्या शताब्दी ...

October 19, 2025 8:24 PM

views 46

दिवाळीनिमित्त अयोध्येत शरयू तिरावर आज २६ लाखापेक्षा जास्त दीप उजळणार

भगवान श्री राम यांच्या आगमनाचा सोहळा साजरा करण्यासाठी उत्तरप्रदेशात शरयू नदीच्या किनाऱ्यावर आज संध्याकाळी भव्य दीपोत्सव साजरा होत असून, यासाठी अयोध्या नगरी सजली आहे. राम की पौडी इथल्या  ५६ घाटांवर आज २६ लाखांपेक्षा जास्त दिवे प्रज्वलित केले जातील. या दिव्यांच्या प्रकाशात अयोध्या नगरीची अध्यात्मिक आण...

October 19, 2025 8:24 PM

views 37

चांद्रयान-२ नं साध्य केलं विज्ञान क्षेत्रातलं ऐतिहासिक यश 

चांद्रयान-२ नं आपल्या वैज्ञानिक उपकरणांच्या साहाय्यानं सूर्याच्या पृष्ठभागावरून उत्सर्जित होणाऱ्या ‘कोरोनल मास इजेक्शन’ चा चंद्रावर पडणारा प्रभाव पहिल्यांदाच  टिपला असून, हे विज्ञान क्षेत्रातलं ऐतिहासिक यश असल्याचं इस्त्रो, अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं म्हटलं आहे.  चांद्रयान-२ नं टिपलेल्या न...

October 19, 2025 8:26 PM

views 18

मतदार यादीतल्या त्रुटी दूर करण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांचा मोर्चा

मतदार यादीतल्या त्रुटी दूर कराव्यात या मागणीसाठी येत्या एक नोव्हेंबर रोजी मुंबईत विरोधी पक्षांचा मोर्चा काढण्यात येणार  आहे. खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. मतदार यादीतल्या त्रुटीकडे विरोधी पक्ष निवडणूक आयोगाचं सातत्याने लक्ष वेधत आहे. मात्र निवडणूक आयोग विरोधकांच्य...

October 19, 2025 3:14 PM

views 61

मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातल्या पर्यावरणपूरक ई-बग्गी सेवेला प्रारंभ

मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातल्या पर्यावरणपूरक ई- बग्गी सेवेला आज प्रारंभ  झाला. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी दूरस्थ पद्धतीने याचं उद्घाटन केलं. या उपक्रमामुळे उद्यानात प्रदूषणमुक्त पर्यटनाचा आनंद मिळेल, आणि पर्यटनाला चालना मिळेल असं गोयल यावेळी म्हणाले. ही ई-बग्गी संजय गांधी राष्ट्री...

October 19, 2025 3:04 PM

views 38

इंडिया आघाडीतला जागावाटपाचा तिढा तेजस्वी यादव यांनी सोडवावा असं काँग्रेसचं आवाहन

बिहार विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीतला जागावाटपाचा तिढा तेजस्वी यादव यांनी सोडवावा असं आवाहन काँग्रेसनं केलं आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत शुक्रवारी संपली. मात्र इंडिया आघाडीचं जागावाटपाचं सूत्र जाहीर झालं नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यात अनेक मतदारसंघात काँ...

October 19, 2025 2:57 PM

views 57

दिवाळीच्या सणानिमित्त भारतीय रेल्वेची उत्तर भारतासाठी सतराशेपेक्षा जास्त विशेष गाड्यांची सुविधा

दिवाळीच्या सणानिमित्त प्रवाशांची गर्दी लक्षात घेता भारतीय रेल्वे उत्तर भारतासाठी सतराशेपेक्षा जास्त विशेष गाड्या चालवत आहे. चेन्नईमधून १८ लाखापेक्षा जास्त प्रवासी उत्तरप्रदेश आणि बिहारला जात आहेत, त्यामुळे तामिळनाडू परिवहन विभागानं वीस हजारापेक्षा जास्त बसगाड्याही सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ...

October 19, 2025 2:56 PM

views 42

GST सुधारणांमुळे सणासुदीच्या दिवसांमध्ये खरेदीच्या उत्साहात भर

नुकत्याच लागू झालेल्या जीएसटी सुधारणांमुळे सणासुदीच्या दिवसांमध्ये खरेदीच्या उत्साहात भर पडली असून, यंदा ग्राहकोपयोगी वस्तूंची विक्रमी विक्री होत आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी काल देशभरात १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त एकूण व्यापार झाल्याचा अंदाज असून, गेल्या काही वर्षांमधला हा सर्वात उत्साहाचा हंगाम ठरल...