October 21, 2025 3:07 PM

views 64

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ३ हेक्टरपर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठी मदत मिळणार

यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी पुरामुळे  नुकसानी  झालेल्या  शेतकऱ्यांना आता ३ हेक्टरपर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठी मदत मिळणार आहे. याकरता  विशेष बाब म्हणून ६४८ कोटी १५ लाख ४१ हजार रुपयांच्या निधीच्या वितरणाला मान्यता देण्यात आली असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली.या बा...

October 21, 2025 3:04 PM

views 72

दिवाळीनिमित्त प्रधानमंत्र्यांचं देशवासियांना शुभेच्छा पत्र

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दिवाळीनिमित्त देशवासियांना उद्देशून शुभेच्छा पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी, पहलगाम दहशतवादी हल्ल्याला निर्णायक प्रतिसाद दिल्याबद्दल ऑपरेशन सिंदूरची प्रशंसा केली आहे.    याशिवाय, यावर्षीची दिवाळी खास आहे कारण, पहिल्यांदाच, देशभरात अनेक जिल्ह्यांमध्ये, दुर्...

October 21, 2025 3:27 PM

views 72

देवगडच्या हापूस आंब्याची पहिली पेटी मुंबईत दाखल

दिवाळीच्या मुहूर्तावर देवगडच्या हापूस आंब्याची पहिली पेटी मुंबईत दाखल झाली आहे. वाशी इथल्या बाजारा सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड इथल्या पडवणे गावचे आंबा बागायतदार प्रकाश शिरसेकर यांच्या बागेतले हे आंबे आहेत. आज हे आंबे विक्रीसाठी उपलब्ध झाले असून त्याला विक्रमी भाव मिळण्याची शक्यता आहे.

October 21, 2025 3:26 PM

views 30

गुजरात आणि हरियाणाला १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत ७३० कोटी रुपयांचं अनुदान

१५ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्रसरकारने गुजरात आणि हरियाणाला ७३० कोटी रुपयांचं अनुदान जारी केलं.  ग्रामीण स्वराज्य संस्थांच्या सशक्तीकरणासाठी या दोन्ही राज्याना आर्थिक सहाय्य करण्याची गरज वित्त आयोगाने वर्तवली होती. यापैकी  ५२२ कोटी रुपयांचा दुसरा हप्ता आणि पहिल्या हप्त्यापैकी १३ कोटी रुप...

October 21, 2025 3:25 PM

views 100

पोलिस स्मृतिदिनानिमित्त शहीद पोलिसांना अभिवादन

आज पोलीस स्मृतिदिन आहे. १९५९ मध्ये याच दिवशी लडाखमधे  हॉट स्प्रिंग्ज इथं सशस्त्र चिनी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात दहा शूर पोलिसांना वीरमरण आलं. तेव्हापासून दरवर्षी २१ ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो.    उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज पोलीस स्मृतिदिनानिमित्त पोली...

October 21, 2025 3:21 PM

views 45

सर्वत्र दीपावलीचा उत्साह

दीपावलीचा सण सर्वत्र उत्साहाने साजरा होत आहे. आज घरोघरी तसंच व्यावसायिक आस्थापनांमध्ये लक्ष्मीपूजनाचा सोहळा पार पडेल. व्यापारी वर्गासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. गेल्या वर्षभराची खतावणी बंद करुन नवीन चोपडा सुरु केला जातो. लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं शेअर बाजारात आज मुहूर्ताच्या सौद्यांच...

October 21, 2025 12:54 PM

views 196

GST Reforms : देशाच्या वाहन क्षेत्राला बळकटी

वस्तू आणि सेवा करातल्या कपातीमुळे गेल्या महिन्यात २२ तारखेपासून जीएसटी बचत उत्सवाला सुरुवात झाली आहे. त्याचा फायदा समाजातल्या सर्व घटकांना होत आहे. जीएसटी बचत उत्सवाचा देशाच्या वाहन क्षेत्राला बळकटी देण्यात किती महत्त्वाचा वाटा आहे.   सरकारने वाहन क्षेत्रासाठी जारी केलेल्या नव्या जीएसटी दरांनुस...

October 21, 2025 3:22 PM

views 160

ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांचं निधन

प्रसिद्ध अभिनेता गोवर्धन असरानी यांचं काल मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. सहाय्यक अभिनेता आणि विनोदी अभिनेता म्हणून नाव कमावलेल्या असरानी यांनी पुण्याच्या चित्रपट प्रशिक्षण संस्थेत अभिनयाचे धडे गिरवले होते. अभिमान, गुड्डी, चुपके चुपके अशा अनेक चित्रपटांमधे त्यांनी मुख्य कलाकारां...

October 21, 2025 12:58 PM

views 114

Asian Youth Games 2025 : ‘कुरश’ कुस्ती प्रकारात भारताला दोन पदकं

बहरीनमधे मनामा इथं काल झालेल्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये कुरश या पारंपरिक कुस्ती प्रकारात भारतानं आणखी दोन पदकं जिंकली. त्यामुळं या स्पर्धेत पदकांची एकंदर संख्या ३ झाली आहे. महिलांच्या ५२ किलो गटात, कनिष्का बिधुरीला अंतिम फेरीत उझबेकिस्तानच्या मुबीनाबोनू करिमोवाकडून ३-० असा पराभव पत्करा...

October 21, 2025 9:38 AM

views 53

ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानला शरणागती पत्करावी लागली – प्रधानमंत्री

देशाच्या तिन्ही सैन्यदलांमधल्या अतुलनीय समन्वयामुळे ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानला शरणागती पत्करावी लागली, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. गोवा आणि कारवारच्या किनाऱ्यापासून जवळच नांगरलेल्या आयएनएस विक्रांत या युद्धनौकेवर नौदलाच्या जवानांसोबत प्रधानमंत्र्यांनी दिवाळी साजरी के...