October 26, 2025 7:35 PM

views 29

पुढले दोन ते चार दिवस पश्चिम बंगालचा गंगेच्या खोऱ्यातला प्रदेशात मुसळधार पाऊस

बंगालच्या उपसागरात आग्नेयेकडे निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा उद्यापर्यंत आणखी वायव्य दिशेला सरकेल, आणि येत्या मंगळवारपर्यंत त्याचं तीव्र चक्रीवादळात रूपांतर होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. हे चक्रीवादळ मछलीपट्टणम आणि कलिंगपट्टणम दरम्यान काकीनाडा जवळ आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता...

October 26, 2025 7:32 PM

views 127

राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारांमधे जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्कार जाहीर

विज्ञान क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी दिले जाणारे राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार आज जाहीर झाले. प्राध्यापक जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्कार मिळाला आहे. यंदा विज्ञान श्री पुरस्कारासाठी ८ शास्त्रज्ञांची निवड झाली आहे.विज्ञान युवा श्रेणी अंतर्गत, विविध विषयांमध्ये १४ युवा शास्त्रज्ञां...

October 26, 2025 7:31 PM

views 14

छत्तीसगडमध्ये कांकेर जिल्ह्यात २१ नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण

छत्तीसगडमध्ये कांकेर जिल्ह्यात आज २१ नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. यामध्ये १३ महिलांचा समावेश आहे. या नक्षलवाद्यांनी आपल्याकडच्या तीन एके-४७ रायफल, चार एसएलआर, इतर शस्त्र आणि स्फोटकं पोलिसांच्या ताब्यात दिली.      आत्मसमर्पण करणारे नक्षलवादी बस्तर विभागात विविध ठिकाणी दीर्घ काळ सक्रिय ...

October 26, 2025 3:25 PM

views 51

राज्याच्या काही भागांत पावसामुळे पिकांना मोठा फटका, बहुतेक जिल्ह्यांमध्ये आज यलो अलर्ट

राज्याच्या काही भागात आलेल्या पावसानं अनेक ठिकाणी शेतीमालाचं मोठं नुकसान झालं.  राजधानी मुंबईत आज सकाळपासून अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत.  नाशिक शहरासह जिल्ह्याच्या काही भागांमध्ये काल संध्याकाळनंतर  मुसळधार पाऊस झाला तर शहर परिसरात हलका पाऊस पडला. बागलाण, दिंडोरी, कळवण, मनमाड, चांदवड या...

October 26, 2025 3:16 PM

views 58

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फलटण इथल्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण

नीरा देवधर प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या लोकार्पणासह फलटण इथल्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते आज झालं. या प्रकल्पामुळे फलटण आणि माळशिरसला पाणी मिळणार असून हरित माणदेश निर्माण करणं हे सरकारचं उद्दिष्ट आहे, असं प्रतिपादन फडनवीस यांनी यावेळी केल...

October 26, 2025 1:46 PM

views 15

कॅनडाकडून आयात होणाऱ्या मालावर अतिरिक्त १० टक्के कर लादायचा अमेरिकेचा निर्णय

अमेरिका आणि कॅनडा यांच्यातल्या वाढत्या तणवाच्या पार्श्वभूमीवर कॅनडाकडून आयात होणाऱ्या मालावर १० टक्के अतिरिक्त कर लादायचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल घेतला. या मालावर आधीपासून लागू असलेल्या करा व्यतिरिक्त हा कर वसूल केला जाईल, असंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलं. अमेरिका लादत...

October 26, 2025 1:29 PM

views 44

सणासुदीच्या काळात दीड कोटी प्रवाशांनी घेतला विशेष रेल्वेगाड्यांचा लाभ

सणासुदीच्या दिवसांमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी चालवण्यात आलेल्या विशेष रेल्वेगाड्यांचा लाभ आत्तापर्यंत दीड कोटीपेक्षा जास्त नागरिकांनी घेतला आहे. उत्सवांचा हा काळ संपेपर्यंत हा आकडा अडीच कोटीपेक्षा वर जाईल, अशी अपेक्षा असल्याचं रेल्वे मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. रेल्वेच्या पायाभूत सुवि...

October 26, 2025 1:09 PM

views 25

नवी दिल्ली इथं ७९व्या शौर्य दिनानिमित्त शौर्य रन २०२५ चं आयोजन

लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी आज नवी दिल्ली इथं ७९व्या शौर्य दिनानिमित्त आयोजित शौर्य रन २०२५ला हिरवा झेंडा दाखवला. लष्कराचे अधिकारी, जवान, धावपटू यांच्यासह १० हजारपेक्षा जास्त नागरिकांनी यात भाग घेतला आणि देशाच्या जवानांचं शौर्य, शिस्त आणि सर्वोच्च त्यागाला अभिवादन केलं.

October 26, 2025 12:55 PM

views 63

आयर्लंडच्या दहाव्या राष्ट्राध्यक्ष म्हणून कॅथरीन कॉनोली यांची निवड

आयर्लंडच्या दहाव्या राष्ट्राध्यक्ष म्हणून कॅथरीन कॉनोली यांची निवड झाली आहे. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी हीदर हम्फ्रे यांच्या विरोधात प्रचंड मतांनी विजय मिळवला.  एक अनुभवी राजकारणी असलेल्या कॉनोली, या २०१६ साला पासून संसदेत ‘गॅलवे वेस्ट’ मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. आयर्लंड संसदेच्या उपसभापती म्...

October 26, 2025 12:53 PM

views 38

राजधानी दिल्ली मधली हवेची गुणवत्ता खालावली

राजधानी दिल्ली मधली हवेची गुणवत्ता अत्यंत खालावली असून, आज सकाळी एक्यूआय, म्हणजेच हवेचा गुणवत्ता निर्देशांक 322  इतका नोंदवला गेला. शहराच्या अनेक भागांमध्ये तो ३५०  च्या पुढे गेल्याचं केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं म्हटलं आहे.  वातावरणात धुरकं भरल्यामुळे आज सकाळी राजधानीमध्ये ट्रकवर बसवलेल्या स्प...