October 27, 2025 7:49 PM

views 31

जगानं दहशतवादाप्रती शून्य सहिष्णुता धोरण अवलंबवायला हवं-एस जयशंकर

जागतिक स्थैर्य आणि शांततेला सर्वात जास्त धोका दहशतवादापासून आहे, त्यामुळे जगानं दहशतवादाप्रती शून्य सहिष्णुता धोरण अवलंबवायला हवं असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे.  मलेशियातील क्वालालंपूर इथं २०  व्या पूर्व आशिया शिखर परिषदेला ते आज संबोधित करत होते. दहशतवादाशी अजिबात तडजोड के...

October 27, 2025 7:29 PM

views 38

अर्जेंटिनात ला लिब्रेटाड एवेंजा पक्षानं निर्णायक बहूमत मिळवलं

अर्जेंटिनात झालेल्या मध्यावधी निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष जेविअर मिलेई यांच्या नेतृत्वाखालील ला लिब्रेटाड एवेंजा पक्षानं निर्णायक बहूमत मिळवलं आहे. त्यांच्या पक्षाला ४१ टक्के मत मिळाली असून त्यांनी कायदेमंडळातल्या २४ पैकी १३ तर खालच्या सभागृहातील १२७ पैकी ६४ जागा जिंकल्या आहेत. अर्जेंटिनाच्या नागरिकांन...

October 27, 2025 7:27 PM

views 51

आयसीएआर मधली सर्व रिक्त पद लवकरात लवकर भरावीत- कृषीमंत्री

भारतीय कृषी संशोधन परिषद अर्थात आयसीएआर मधली सर्व रिक्त पद लवकरात लवकर भरावीत असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत राष्ट्रीय कृषी विद्यार्थी संमेलनात बोलत होते. आपण सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असून  त्यांना राज्याच्या कृषी मंत्र्यांशी बोलून ही पदं ता...

October 27, 2025 7:25 PM

views 23

इस्रोनं एलव्हीएम ३ हे प्रक्षेपक वाहन सतीश धवन अंतराळ केंद्रातल्या लाँच पॅडवर पोहचवलं

भारतीय अंतराळ संशोधन संस्था, इस्रो नं एलव्हीएम -३ हे प्रक्षेपक वाहन श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातल्या लाँच पॅडवर पोहचवलं आहे. या प्रक्षेपक वाहनाची जुळवणी पूर्ण झाली असून ते २ नोव्हेंबरला  अवकाशात प्रक्षेपित केल्या जाणाऱ्या CMS 03 या दूरसंचार उपग्रहाशी जोडलेले आहे. हा उपग्रह भारताच्या म...

October 27, 2025 7:23 PM

views 16

इलेक्ट्रॉनिक घटक उत्पादन योजनेअंतर्गत ७ अर्जांच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं आज इलेक्ट्रॉनिक घटक उत्पादन योजनेअंतर्गत ७ अर्जांच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी दिली, अशी   माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत प्रसार माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. या  अर्जांमध्ये एकूण ५ हजा...

October 27, 2025 8:48 PM

views 60

सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्य कांत यांच्या नावाची शिफारस

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी पुढील सरन्यायाधीश पदासाठी न्यायमूर्ती सुर्यकांत यांच्या नावाची शिफारस केली आहे. सरन्यायाधीश गवई येत्या २३ नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत असून त्यानंतर न्यायमूर्ती सुर्यकांत हे सरन्यायाधीशपदाची सूत्रं स्वीकारतील. या शिफारशीनंतर केंद्र सरकार ...

October 27, 2025 7:09 PM

views 98

आंतरराष्ट्रीय सौर आघाडी सभेच्या आठव्या अधिवेशनाला आजपासून नवी दिल्लीत सुरुवात

आंतरराष्ट्रीय सौर आघाडी सभेचं आठवं अधिवेशन आज नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं सुरू होत आहे. या चार दिवसीय कार्यक्रमात १२४ देश सहभागी होत असून जगभरातील ४० हून अधिक मंत्री उपस्थित राहतील. जागतिक समुदायाने उज्ज्वल आणि शाश्वत भविष्यासाठी सौर ऊर्जा स्वीकारण्यासाठी हा कार्यक्रम महत्वाची भूमिका बजावेल. भारत...

October 26, 2025 8:35 PM

views 46

जीएसटी बचत महोत्सवामुळे नागरिकांमध्ये खूप उत्साह असल्याचं प्रधानमंत्र्यांचं ‘मन की बात’ मध्ये प्रतिपादन

देशभरात सध्या जीएसटी बचत महोत्सव सुरू असून यामुळे नागरिकांमध्ये खूप उत्साह आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या 'मन की बात' या कार्यक्रमातून त्यांनी आज देशवासीयांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा १२७वा भाग होता. यंदाच्या सणासुदीच्या काळात स्वदेशी वस्तूंची खरेदी प्रचंड...

October 26, 2025 8:32 PM

views 25

२१वं शतक हे भारताचं आणि आसियानचं शतक-प्रधानमंत्री

२१वं शतक हे भारताचं आणि आसियानचं शतक आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. आसियान-भारत शिखर परिषदेला त्यांनी दूरस्थ पद्धतीनं संबोधित केलं. भारत आणि आसियान, हे संयुक्तरीत्या जगाच्या जवळपास एक चतुर्थांश लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करतात, असं त्यांनी सांगितलं. या दोघांमधले संबंध फक्त...

October 26, 2025 8:32 PM

views 88

केंद्रीय गृहमंत्री मुंबईत इंडिया मॅरिटाईम वीक परिषदेचं उद्घाटन करणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या मुंबईत इंडिया मॅरिटाईम वीक या पाच दिवसीय परिषदेचं उद्घाटन करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यावेळी उपस्थित असतील.    याशिवाय, गृहमंत्री अमित श...