October 31, 2025 3:12 PM

views 29

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजी गडगडली

 ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतला दुसरा सामना आज मेलबर्न इथं सुरू आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं. मात्र, भारतीय संघाची फलंदाजी चांगलीच गडगडली. 

October 31, 2025 2:51 PM

views 101

प्रिन्स अँड्र्यू यांची शाही सुविधा काढून घेण्याची औपचारिक प्रक्रिया सुरु

ब्रिटनचे राजे  किंग चार्ल्स तिसरे यांनी, त्यांचे धाकटे बंधू प्रिन्स अँड्र्यू यांना त्यांच्या शाही पदव्यांपासून दूर करण्याची तसंच विंडसरमधलं त्यांचं निवास आणि शाही सुविधा काढून घेण्याची औपचारिक प्रक्रिया सुरु केली आहे. ६५ वर्षांचे प्रिन्स अँड्र्यू यांच्यावर दिवंगत व्हर्जिनिया गिफ़्रे यांनी लैंगिक अत्य...

October 31, 2025 2:46 PM

views 37

मुंबईच्या पवई भागात १७ लहान मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य गोळीबारात ठार

मुंबईच्या पवई भागात १७ लहान मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य याला काल दोन तासांच्या वाटाघाटींनंतर पोलिसांच्या गोळीबारात ठार झाला. अभिनय चाचणीच्या नावाखाली त्यानं या मुलांना पवईतल्या एका स्टुडिओत बोलावून ओलीस ठेवलं होतं.   त्याच्याशी चर्चा अयशस्वी ठरल्यानंतर पोलिसांनी स्वच्छतागृहातून स्टुडिओत प्र...

October 31, 2025 2:29 PM

views 43

भारत आणि अमेरिका दरम्यान संरक्षण क्षेत्रातला पुढच्या १० वर्षांसाठी आराखडा करार

भारत आणि अमेरिका यांनी संरक्षण क्षेत्रातल्या सहकार्याबाबत पुढच्या १० वर्षांसाठी एक आराखडा करार केला आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांच्या बैठकीत यावर स्वाक्षऱ्या झाल्याची माहिती सिंह यांनी समाजमाध्यमावर दिली. दोन्ही देशांमधल्या बळकट संरक्षण भागीदारीचं नवं युग ...

October 31, 2025 2:19 PM

views 151

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय पुढच्या वर्षी ३० जूनपर्यंत घेण्यात येणार

महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय पुढच्या वर्षी ३० जूनपर्यंत घेण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री केली. सह्याद्री अतिथीगृहात यासंदर्भात आंदोलकांच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते. या अनुषंगाने एक समिती स्थापन करण्यात आली असून एप्रि...

October 31, 2025 1:16 PM

views 58

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतिनिमित्त त्यांना मान्यवरांची आदरांजली

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. सरदार पटेल हे महान देशभक्त आणि दूरदर्शी नेते आणि राष्ट्रनिर्माता होते. त्यांनी आपल्या अढळ संकल्प, अदम्य धैर्य आणि कुशल नेतृत्वादनं राष्ट्राला एकत्र आणण्याचं ऐतिहासिक कार्य केलं, अशाशब्दात राष्ट्रपती द्रौपदी म...

October 31, 2025 1:35 PM

views 58

माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरातून अभिवादन

भारताच्या माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची आज पुण्यतिथी आहे. यानिमित्त देशभरातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी आज इंदिरा गांधींच्या ‘शक्तिस्थळ’ या समाधीस्थळी जाऊन त्यांना श्रद्धा...

October 31, 2025 1:34 PM

views 23

केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदकं देशभरातल्या १ हजार ४६६ पोलिसांना जाहीर

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दिली जाणारी केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदकं देशभरातल्या १ हजार ४६६ पोलिसांना जाहीर झाली आहेत. विविध राज्यं, केंद्रशासित प्रदेश, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, केंद्रीय पोलीस यंत्रणांच्या कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. कारवाई, तपास, गुप्तचर यंत्रणा आणि न्यायवैद्यक श...

October 31, 2025 1:04 PM

views 71

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध

आगामी बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा भाजपा आणि जदयू प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं आज प्रसिद्ध केला. यात तरुण, रोजगार, कौशल्यविकास, शेतकरी, मागासवर्गीय, दलित आणि महिलांचं सक्षमीकरण यावर भर दिला असून येत्या पाच वर्षांत १ कोटी सरकारी नोकऱ्या आणि रोजगार निर्माण करायचं, तसंच एक कोटी महिलांना ...

October 31, 2025 12:24 PM

views 73

भारताच्या महिला संघाची आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक

भारताच्या महिला क्रिकेट संघानं आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. नवी मुंबईत काल झालेल्या थरारक उपांत्य सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर ५ फलंदाज राखून मात केली. ऑस्ट्रेलियानं दिलेलं ३३९ धावांचं लक्ष्य भारताच्या संघानं ५ फलंदाजांच्या मोबदल्यात ९ चेंडू राखून पूर्ण केलं.   नाणेफ...