November 3, 2025 3:40 PM

views 56

उद्योजक अनिल अंबानी यांच्यावर ईडीची कारवाई

उद्योजक अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाशी संबधित तीन हजार कोटी रुपयांच्या चाळीसहून अधिक मालमत्ता सक्तवसुली संचलनालयाने जप्त केल्या आहेत. दिल्ली, नोएडा, गाजियाबाद, मुंबई, पुणे, ठाणे, हैदराबाद, चेन्नई, कांचीपुरम आणि पूर्व गोदावरी इथं या मालमत्ता आहेत. अनिल अंबानी यांच्यावरील कर्ज घोटाळा आणि मनि लाँ...

November 3, 2025 3:37 PM

views 80

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संत नामदेव महाराज सन्मान पुरस्कार प्रदान

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काल पंजाबमधल्या घुमान इथं संत नामदेव महाराज सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर शिंदे यांनी महाराष्ट्र सदनाचं भूमिपूजन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्राच्या आणि गुरु गोविंदसिंहांचा पंजाब संतांचा आणि शूरांचा आहे. राजगुरू आणि भगतसिंहांचा क्रा...

November 3, 2025 3:31 PM

views 41

वैद्यकीय महाविद्यालय आणि आवश्यक पायाभूत सुविधांसाठी सरकारचं प्राधान्य – उपमुख्यमंत्री अजित पवार

प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय आणि त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारणीला राज्य सरकारचं प्राधान्य आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगितलं. औंंध इथं बहुउद्देशीय दंंत रुग्णालय आणि संशोधन केंद्र स्थापन करण्याबाबत इंडियन डेंटल असोसिएशन, पुणे जिल्हा परिषद आणि औंधचं जिल्हा शासकीय रुग्...

November 4, 2025 8:36 AM

views 58

सर्वोच्च न्यायालयात भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात सुनावणी

भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालय ७ नोव्हेंबरला निर्णय देणार आहे. बहुसंख्य राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव सुनावणीला उपस्थित होते, असं न्यायमूर्ती विक्रम नाथ, संदीप मेहता आणि एन व्ही अंजारीया यांच्या विशेष पीठानं सांगितलं. त्याआधी न्याायलयाने पश्चिम बंगाल आणि तेलंगणाशिवाय ...

November 3, 2025 1:34 PM

views 21

बहारीनचे परराष्ट्र मंत्री अब्दुल लतिफ बिन रशीन अलजयानी भारत दौऱ्यावर

बहारीनचे परराष्ट्र मंत्री अब्दुल लतिफ बिन रशीन अलजयानी काल रात्री तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर नवी दिल्ली इथं पोहोचले. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी त्याचं स्वागत केलं. हे दोन्ही नेते पाचव्या भारत-बहारीन संयुक्त उच्च आयोगाच्या बैठकीचं सहअध्यक्ष पद भूषवणार आहेत, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने आप...

November 3, 2025 1:11 PM

views 21

उत्तराखंड विधानसभेच्या विशेष अधिवेशनात राष्ट्रपतींचं संबोधन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उत्तराखंड विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला आज संबोधित केलं. अनेक प्रयत्नांनंतर उत्तराखंडच्या मानवी विकास निर्देशांकात प्रगती झाल्याचं राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या. राज्याचा साक्षरता दर वाढल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. उत्तराखंडच्या पवित्र भूमीत आध्यात्म आणि शौर्या...

November 3, 2025 2:44 PM

views 54

भारत तंत्रज्ञानाचा केवळ ग्राहक नसून प्रगतीचा प्रणेता बनल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

भारत आता तंत्रज्ञानाचा केवळ ग्राहक नाही तर तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा प्रणेता बनला आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्लीमध्ये उदयोन्मुख विज्ञान आणि तंत्रज्ञान नवोन्मेष परिषद २०२५चं उद्घाटन केल्यानंतर ते आज बोलत होते. देशात नवोन्मेषाची परिसंस्था निर्माण व्हावी यासाठी स...

November 3, 2025 1:41 PM

views 30

तेलंगणात रस्ते अपघातात १९ जणांचा मृत्यू, २० जखमी

तेलंगणामध्ये रंगारेड्डी जिल्ह्यात चेवेल्लाजवळच्या मिर्जागुडा-खानापूर रस्त्यावर आज सकाळी झालेल्या अपघातात एकूण १९ जणांचा मृत्यू झाला. विकाराबाद-हैदराबाद मार्गावर सकाळी ८ वाजण्याच्या सुमाराला एका दुचाकीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करताना एका ट्रकनं आरटीसी बसला धडक दिल्यामुळे ही घटना घडली. विकाराबादच्य...

November 3, 2025 2:44 PM

views 47

अण्वस्त्र चाचण्या पुन्हा सुरू करणार असल्याचा अमेरिकेचा इशारा

रशिया, चीन, उत्तर कोरिया आणि पाकिस्तान अण्वस्त्र चाचण्या करत आहेत. त्यामुळे अमेरिकाही अण्वस्त्र चाचण्या पुन्हा सुरू करेल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. काल एका वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी सांगितलं. जेव्हा इतर देश चाचण्या करत असतात तेव्हा चाचणी थांबवणारा अमेरिका हा एकम...

November 3, 2025 12:42 PM

views 30

अफगाणिस्तानमधे भूकंपामुळे १० जणांचा मृत्यू

अफगाणिस्तानमधे काल रात्री झालेल्या भूकंपामुळे १० जणांचा मृत्यू झाला असून २६० जण जखमी झाले आहेत. या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर ६.३ एवढी नोंदवली गेली आहे. देशाच्यचा वायव्य, मध्य, पश्चिम, उत्तर भागात मध्यरात्रीच्या सुमारास हा भूकंप झाल्याचं अफगाणिस्तान आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणानं म्हटलं आहे. या...