November 6, 2025 1:00 PM

views 281

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उद्या मतदान

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १८ जिल्ह्यातल्या १२१ विधानसभा मतदारसंघांमध्ये उद्या मतदान होणार आहे. एकंदर एक हजार ३१४ उमेदवारांचे राजकीय भवितव्य तीन कोटी ७५ लाखांहून अधिक मतदार ठरवतील. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी, एनडीए आणि महाआघाडीच्या नेत्यांनी आपापल्या पक्षाच्या उमेदवारांच्या समर्थना...

November 5, 2025 8:00 PM

views 37

बिहार विधानसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार शिगेला

बिहार विधानसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. रालोआ तसंच महायुतीच्या स्टार प्रचारक आणि ज्येष्ठ नेत्यांनी सीमांचल, चंपारण आणि मेगध क्षेत्रासह विविध भागात प्रचारसभा घेतल्या.    भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी पूर्व आणि पश्चिम चंपारण, मधुबन इथं सभा घेतल्या.  ...

November 5, 2025 8:01 PM

views 93

स्टारलिंक आणि महाराष्ट्र शासन यांच्यात सामंजस्य करार

स्टारलिंक सॅटेलाईट कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड आणि महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभाग यांच्यात आज सामंजस्य करार झाला. या करारामुळे राज्यातल्या दुर्गम भागापर्यंत इंटरनेट सेवा पोहोचवणं सुलभ होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. स्टारलिंक महाराष्ट्राशी भागीदारी ...

November 5, 2025 8:29 PM

views 22

डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहिमेच्या चौथ्या टप्प्याला सुरुवात

२५ लाखांहून अधिक निवृत्तीवेतनधारकांनी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहिमेअंतर्गत चेहरेपट्टी प्रमाणीकरण तंत्रज्ञानाचा वापर केला असून यात सातत्यानं वाढ होत असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहिमेचा चौथा टप्पा आज सिंह यांच्या उपस्थितीत सुरु करण्यात आला ...

November 5, 2025 3:49 PM

views 35

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदार महायुतीलाच कौल, मुख्यमंत्र्यांना विश्वास

राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुतीतले तिन्ही पक्ष आपापल्या स्तरावर युतीसंदर्भातला निर्णय घेतील, मात्र तरीही या निवडणुका आपण एकत्रितपणेच लढवणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज कोल्हापुरात बातमीदारांशी बोलत होते. या निवडणुकीत जनता महायुतीलाच कौल...

November 5, 2025 4:02 PM

views 23

भाजपा नेते किरेन रिजीजू यांची राहुल गांधीवर टीका

बिहारच्या निवडणुकीत यश मिळणार नाही हे लक्षात आल्यावर काँग्रेस नेता राहुल गांधींनी हरियाणातला बनावट मतदारांचा मुद्दा उपस्थित केल्याची टीका केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते किरेन रिजीजू यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत केली. हरियाणात काँग्रेसचा पराभव झाल्याबद्दल राहुल गांधी भाजपाला दोष देत आहेत. मात्र...

November 5, 2025 3:48 PM

views 36

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ६ तास बंद!

देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरचं कामकाज सहा तास थांबवण्यात येणार आहे. सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत दोन्ही धावपट्ट्या तात्पुरत्या बंद राहतील. या दरम्यान धावपट्ट्यांची तपशीलवार तपासणी, पृष्ठभागांची दुरुस्ती, प्रकाशयोजना, चिन्हं तसंच सांड...

November 5, 2025 3:18 PM

views 25

राज्यात केंद्रीय पथकानं केली अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी

राज्याच्या विविध भागात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केंद्रीय पथकानं आज केली.   सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्यात बडकबाळ आणि हत्तूर आणि उत्तर सोलापूरच्या तिऱ्हे आणि शिवणी या गावांना भेट देऊन शेती, पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीचा आढावा केंद्रीय पथका...

November 5, 2025 2:39 PM

views 27

उत्तर प्रदेशच्या ट्रेनखाली येऊन ६ जण ठार

उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर जिल्ह्यात चुनार रेल्वेस्थानकाजवळ आज ट्रेनखाली येऊन सहा जण ठार झाले. ट्रेनमध्ये असलेल्या काही महिलांनी फलाटाच्याविरुद्ध बाजूनं उतरायचा प्रयत्न केला, त्यामुळे अपघात झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे. या दुर्घटनेत कुणीही गंभीर जखमी झालेलं नाही.

November 5, 2025 1:40 PM

views 23

छत्तीसगडमध्ये प्रवासी रेल्वेगाडी अपघातात ११ जणांचा मृत्यू

छत्तीसगडमध्ये बिलासपूर रेल्वे स्थानकाजवळ प्रवासी गाडी आणि मालगाडीच्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ११वर गेली आहे. काल झालेल्या या दुर्घटनेत २० जण जखमी झाले आहेत. दरम्यान, दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना ५ लाख रुपये, तर जखमींना ५० लाख रुपये नुकसानभरपाई द्यायची घोषणा मुख्यमंत्री विष्णू देव...