November 7, 2025 2:55 PM

views 94

ज्येष्ठ अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

ज्येष्ठ अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं काल दीर्घ आजारानं निधन झालं. त्या ७१ वर्षांच्या होत्या. सुलक्षणा पंडित यांनी पार्श्वगायनातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.   त्यांनी आतापर्यंत हिंदी, मराठी, बंगाली, उडिया आणि गुजराती भाषांमध्ये गाणी...

November 7, 2025 2:28 PM

views 56

स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणाऱ्या वंदे मातरम् या गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणाऱ्या वंदे मातरम् या गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाची आज सुरुवात झाली. हे गीत बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी दीडशे वर्षांपूर्वी लिहिलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथं ‘वंदे मातरम्‌’ शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाचं उद्घाटन केलं. ‘वंदे मातरम्‌’ हा एक मंत्र ...

November 7, 2025 2:24 PM

views 27

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा वंदे मातरम् गीताला अभिवादन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रीय गीत वंदे मातरमच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्त अभिवादन केलं आहे. स्वातंत्र्यसमराच्या काळात ब्रिटिशांच्या विरोधात सन्यांशांनी पुकारलेल्या बंडाच्या वेळी बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी या अमर गीताची रचना केली होती, असं राष्ट्रपतींनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटल...

November 7, 2025 2:20 PM

views 27

भारतीय बँका आता अधिक प्रगल्भतेनं काम करत आहेत – रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा

भारतातल्या बँका एका दशकापूर्वीच्या तुलनेत आता खूप प्रगल्भतेनं काम करत आहेत,असं प्रतिपादन भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज दिली. भारतीय स्टेट बँकेच्या बँकिंग आणि आर्थिक विषयावरच्या परिषदेत ते मुंबईत बोलत होते. २०१८मध्ये तोट्यात असलेली बँक ते आज १०० कोटी अमेरिकी डॉलरची उलाढाल कर...

November 7, 2025 2:17 PM

views 154

शाळा-रुग्णालयांवर भटके कुत्रे येऊ नयेत, स्थानिक संस्था जबाबदार – सर्वोच्च न्यायालय

सर्व शैक्षणिक संस्था, रुग्णालयं, सार्वजनिक क्रीडा संकुलं, बसस्थानकं, रेल्वेस्थानकं इत्यादी ठिकाणी भटकी कुत्री येऊ नयेत, यासाठी व्यवस्थित कुंपण घालण्यात यावं, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. भटके कुत्रे चावण्याच्या घटनांमध्ये झालेली वाढ ही बाब काळजी करण्यासारखी असल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती वि...

November 7, 2025 2:13 PM

views 42

अटक केलेल्या प्रत्येक व्यक्तीला अटकेची कारणं लेखी स्वरूपात लवकरात लवकर देणं बंधनकारक

पोलीस आणि तपास यंत्रणांनी अटक करण्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला अटकेची कारणं लेखी स्वरूपात लवकरात लवकर देणं बंधनकारक आहे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयानं काल दिला. संबंधित व्यक्तीचा गुन्हा किंवा त्याच्या अटकेचे नियम किंवा कायदे कोणतेही असले, तरी अटक का केली, हे जाणून घेणं हा त्या व्यक्तीचा मूलभूत अध...

November 7, 2025 2:09 PM

views 54

कोरेगाव पार्क जमीन प्रकरणी तहसीलदार निलंबित, पार्थ पवार यांच्यावर आरोप

पुण्यातल्या कोरेगाव पार्क इथल्या कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी तहसीलदार आणि दुय्यम निबंधकाचं निलंबन करण्यात आलं आहे. तसंच, अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.   या कथ...

November 7, 2025 2:06 PM

views 26

भारत-अमेरिका भागीदारी दृढ करण्यासाठी राजदूत क्वात्रा आणि अमेरिकी मंत्री पॉल कपूर यांची बैठक

भारताचे अमेरिकेतले राजदूत विनय क्वात्रा यांनी काल वॉशिंग्टन इथं अमेरिकेचे दक्षिण आणि मध्य आशिया व्यवहार सहाय्यक परराष्ट्र मंत्री पॉल कपूर यांची भेट घेतली. या अधिकाऱ्यांनी दोन्ही देशातली भागीदारी आणखी दृढ करण्यासंबंधात तसंच सामायिक प्राधान्यक्रमांवर काम करण्याच्या मार्गांवर चर्चा केली.   कपूर या...

November 7, 2025 2:00 PM

views 31

एनएसडब्ल्यू खुल्या स्क्वॉश स्पर्धेत भारताच्या रतिका सुथंतिरा सीलन हिचा उपांत्य फेरीत प्रवेश

सिडनी इथं सुरू असलेल्या एनएसडब्ल्यु खुल्या स्क्वॉश स्पर्धेत भारताच्या रथिका सुथंतिरा सीलन हिने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तिने उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाच्या कॅरन ब्लूम हिच्यावर ११-८, ११-७, ११-४ असा सरळ गेम्समध्ये विजय मिळवला.

November 7, 2025 10:40 AM

views 46

भारताच्या गौरवशाली हॉकी खेळाचा शतकोत्सव; देशभरात १४शे सामन्यांचं आयोजन

भारतीय हॉकीच्या गौरवशाली शंभर वर्षांचा उत्सव आज देशभर साजरा करण्यात येणार आहे. शताब्दी समारंभाच्या निमित्तानं, ५५० जिल्ह्यांमध्ये १४०० हून अधिक सामने आयोजित करण्यात आले आहेत. मुख्य कार्यक्रम आज सकाळी साडे आठ वाजता नवी दिल्लीतल्या मेजर ध्यानचंद राष्ट्रीय मैदानावर होईल, यामध्ये भारतीय हॉकीचा गौरवशाली ...