November 9, 2025 1:54 PM

views 45

प्रधानमंत्री मंगळवार पासून दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर जाणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या मंगळवार पासून दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, मोदी आणि भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक, एक हजार वीस मेगावॅट क्षमतेच्या पुनात्सांगचु-२ या जलविद्युत प्रकल्पाचं उद्घाटन करतील. भारत आणि भूतान यांनी संयुक्तपणे हा प्रकल्प विकसित केला आ...

November 9, 2025 1:49 PM

views 32

उत्तराखंड राज्याच्या रौप्यमहोत्सवी स्थापना दिवस कार्यक्रमाला प्रधानमंत्र्यांची उपस्थिती

उत्तराखंड राज्याचा आज २५ वा स्थापना दिवस आहे. स्थापना दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देहरादून इथं विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात प्रधानमंत्री मोदी विशेष टपाल तिकीटाचं प्रकाशन, उत्तराखंडमधल्या आठ हजार कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमीपूजन आणि उद्घघाटन...

November 9, 2025 1:28 PM

views 20

वर्षभरात अमली पदार्थांच्या तस्करीची १०३ प्रकरणं उघडकीस

एनसीबी, अर्थात अमली पदार्थ नियंत्रण मंडळानं या वर्षात अमली पदार्थांच्या तस्करीची १०३ प्रकरणं उघडकीला आणली असून, २१९ जणांविरोधात कायदेशीर कारवाई केली. २०२१ साली भारत-पाकिस्तान सीमा भागातून अमली पदार्थ जप्त केल्या प्रकरणी एनसीबी चंदीगडनं  नुकतंच एका तस्कराला  १२ वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा दिली, आणि...

November 9, 2025 1:17 PM

views 18

भारताच्या काही भागात पुढले ५ ते ६ दिवस रात्रीच्या तापमानात होणार २ ते ५ अंश सेल्सिअस घट

देशाचा वायव्य प्रांत आणि मध्य भारताच्या काही भागात पुढले ५ ते ६ दिवस रात्रीच्या तापमानात २ ते ५ अंश सेल्सिअस घट होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. विदर्भ आणि छत्तीसगडच्या अनेक भागांत किमान तापमानात जवळजवळ २ अंश सेल्सिअस घट होईल, तर  राजस्थान आणि मध्यप्रदेशाच्या काही भागात उद्यापर्यंत थंडीची लाट राह...

November 9, 2025 1:08 PM

views 35

फिलिपिन्स मध्ये फंग-वोंग चक्रीवादळाचा जोर तीव्र

फिलिपिन्स मध्ये फंग-वोंग या चक्रीवादळानं तीव्र स्वरूप घेतलं असून, त्याच्या प्रभावामुळे मुसळधार पाऊस, विनाशकारी वारे आणि समुद्रात उंच लाटा उसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. देशाच्या मोठ्या भागात वादळाचा इशारा देण्यात आला आला असून, पूर्व आणि उत्तरेकडच्या भागातल्या १ लाखापेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षित...

November 9, 2025 1:35 PM

views 51

भारताचे राजदूत आणि इंटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यात व्हिडीओ कॅालद्वारे चर्चा

केंद्रसरकारच्या ‘इंडिया सेमीकंडक्टर मिशन’ आणि ‘इंडिया ए-आय’ मिशनला अनुसरून,  भारतात सेमीकंडक्टर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता परिचालनाचा विस्तार करण्याच्या ‘इंटेल’ या  कंपनीच्या  योजनांवर चर्चा करण्यासाठी, अमेरिकेतले भारताचे राजदूत विनय मोहन क्वात्रा यांनी काल इंटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी लिप बु टॅन या...

November 9, 2025 12:40 PM

views 21

न्याय, समता आणि कायदा सक्षमीकरणाची भावना साजरी करण्याचं नितीन गडकरी यांचं आवाहन

जागतिक कायदे सेवा दिनानिमित्त, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकांना न्याय, समता आणि कायदा सक्षमीकरणाची भावना साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. हा दिवस आपल्याला या गोष्टीची जाणीव करून देतो की, कायद्याची उपलब्धता हा आपला हक्क असून, तो विशेषाधिकार नाही, असं त्यांनी समाज माध्...

November 9, 2025 9:58 AM

views 34

भारतानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-ट्वेंटी मालिका २-१ नं जिंकली

ऑस्ट्रेलियाविरुद्ध वीस षटकांच्या सामन्यांची क्रिकेट मालिका भारतानं 2-1 अशी जिंकली आहे. मालिकेतला निर्णायक पाचवा सामना काल पावसामुळं रद्द करावा लागला. त्यामुळं चौथा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेतलेल्या भारतीय संघानं मालिका जिंकल्याचं घोषित करण्यात आलं. भारतीय फलंदाज अभिषेक शर्मा मालिकावीर ठरला. या वि...

November 9, 2025 9:45 AM

views 36

ग्लोबल पुलोत्सवाचा पुण्यात समारोप

शास्त्र आणि कला या दोन्ही गोष्टी आपल्याला शांततेच्या सुरात नेऊन ठेवतात. पुण्यात आयोजित पुल स्मृती सन्मान सोहळ्यात पंडित अजय चक्रवर्ती यांचे सूर आणि पु. ल. देशपांडे यांच्या शब्दांनी भाव आणि बुद्धी, रस आणि तर्क, गाणं आणि ज्ञान या साऱ्यांचा सुंदर संगम घडविला आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्ट...

November 9, 2025 9:11 AM

views 78

भटक्या श्वानांना आळा घालण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

देशभरात भटक्या श्वानांचा उपद्रव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना अशा श्वानांची तत्काळ व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. ते लागू करण्यासाठी आठ आठवड्यांची मुदतही दिली आहे. भटके श्वान लोकांना चावण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली असल्यामुळं...