November 9, 2025 7:04 PM

views 20

राज्याच्या काही भागात थंडीची चाहूल

राज्याच्या काही भागात थंडीची चाहूल लागली आहे. मुंबईत गेले दोन दिवस रात्रीच्या तापमानात घट दिसून आली. येत्या दोन दिवसांत संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे.

November 9, 2025 6:56 PM

views 37

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची अंगोलाच्या अध्यक्षांबरोबर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज अंगोलाचे अध्यक्ष जोआओ लॉरेन्सो यांच्याशी भारत आणि अंगोला यांच्यातल्या द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा केली. या चर्चेदरम्यान राष्ट्रपती मुर्मू यांनी दोन्ही देशांच्या सामाईक हिताच्या विविध क्षेत्रांमधलं सहकार्य वाढवण्यावर भर दिला. उत्तम संसदीय कार्यपद्धती,...

November 9, 2025 6:50 PM

views 22

नवोन्मेष हा लोकांचं जगणं वेगळ्या पातळीवर नेण्याचा मार्ग असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

नवोन्मेष हा केवळ बुद्धिमत्ता आणि संशोधनाचा उत्सव नसून लोकांचं जगणं वेगळ्या पातळीवर नेण्याचा मार्ग असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी  विद्यापीठातल्या इनोव्हेशन महाकुंभाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. नवनवीन कल्पना आणि नवीन संशोधनाल...

November 9, 2025 6:46 PM

views 46

नंदुरबारमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळून दोन विद्यार्थी ठार

नंदुरबारमध्ये अक्कलकुवा तालुक्यातल्या देवगुई घाटात शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळून दोन विद्यार्थी ठार झाले, तर ५०पेक्षा जास्त विद्यार्थी जखमी झाले. दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी गेलेले आदिवासी समुदायाचे विद्यार्थी या बसमधून आश्रमशाळेत परतत होते. मात्र चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस ख...

November 9, 2025 5:46 PM

views 104

राज्यातल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला उद्यापासून सुरुवात

राज्यातल्या २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला उद्यापासून सुरुवात होणार आहे. १७ नोव्हेंबरपर्यंत हे अर्ज भरता येतील. अर्जांची छाननी १८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. अर्ज मागे घ्यायची शेवटी मुदत २१ नोव्हेंबर ही असून उमेदवारांची अंतिम यादी २६ नोव्हेंबर रोजी जाहीर क...

November 9, 2025 5:22 PM

views 22

न्यूझीलंडच्या टोंगारिरो राष्ट्रीय उद्यानात लागलेल्या आगीत १६ शे  हेक्टर क्षेत्रावरची वनसंपदा जळून नष्ट

न्यूझीलंडच्या टोंगारिरो राष्ट्रीय उद्यानात कालपासून लागलेल्या आगीत आतापर्यंत १६ शे  हेक्टर क्षेत्रावरची वनसंपदा जळून नष्ट झाली आहे. या आगीत आतापर्यंत कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाल्याचं वृत्त नाही. विमानं, हेलिकॉप्टर आणि जमिनीवरून पाण्याचे फवारे मारून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचं...

November 9, 2025 3:25 PM

views 41

पुण्यातल्या कोरेगाव पार्क आणि बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे

पुण्यातल्या कोरेगाव पार्क आणि बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.  या व्यवहारातली कुलमुखत्यारपत्रधारक शीतल तेजवानी परदेशात पळून गेल्याची चर्चा असली तरी त्याला पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही. या प्रकरणांतली कागदपत्रं संबंधित शासकीय विभागाकडून मागवण्यात आली आहेत....

November 9, 2025 3:00 PM

views 23

कर्मचारी वेतन कायद्यात सुधारणा करण्याची जपानच्या प्रधानमंत्र्यांची योजना

जपानच्या नवनियुक्त प्रधानमंत्री सनाई ताकाइची यांनी स्वतःसह मंत्रिमंडळ सदस्यांचं वेतन कमी करण्यासाठी सरकारी कर्मचारी वेतन कायद्यात सुधारणा करण्याची योजना आखली आहे. जपान मधल्या प्रशासकीय आणि वित्तीय सुधारणांना प्रोत्साहन देण्याच्या धोरणाचा हा एक भाग आहे. या प्रस्तावावर संसदेमध्ये  संबंधित मंत्र्यांच्य...

November 9, 2025 2:08 PM

views 43

टेनिसपटू नोव्हाक जोकोविचनं एटीपी अंतिम फेरीतून घेतली माघार

सर्बियाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविच यानं एटीपी २५० अथेन्स गटाचं विजेतेपद पटकावल्यानंतर तासाभरातच खांद्याच्या दुखापतीमुळे एटीपी अंतिम फेरीतून माघार घेतली आहे. हंगामातली ही शेवटची फेरी असून ती चुकण्याचं त्याचं हे सलग दुसरं वर्ष आहे. जोकोविचनं अथेन्स स्पर्धेत लॉरेन्झो मुसेटी याच्यावर ४-६, ६-३, ७-५ अशी म...

November 9, 2025 2:03 PM

views 51

आयसीस दहशतवादी संघटनेशी संबंधित ३ संशयितांना गुजरातमधे अटक

आयसीस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून, गुजरात मधल्या दहशतवाद विरोधी पथकानं गांधीनगरमध्ये अदलाज इथून आज ३ जणांना अटक केली, आणि त्यांच्याकडून शस्त्र जप्त केली. ते देशाच्या विविध भागात हल्ला करण्याचा कट रचत होते, असा आरोप आहे. या प्रकरणी पुढला तपास सुरु आहे.