November 12, 2025 1:20 PM

views 38

भूतानचा दौरा आटोपून प्रधानमंत्री मोदी मायदेशी रवाना

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भूतान नरेश  जिग्मे खेसार नामग्येल वांगचुक यांनी आज थिंपू इथं कालचक्र उत्सवाचं संयुक्तपणे उद्घाटन केलं.  हा जागतिक शांततेसाठी प्रार्थना करण्याचा बौद्ध पारंपरिक उत्सव बौद्ध धर्मगुरु, ‘जे खेनपो’ यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली....

November 12, 2025 1:21 PM

views 57

मलबार २०२५ या इंडो – पॅसिफीक नौदल सरावात ऑस्ट्रेलिया सहभागी

मलबार २०२५ या इंडो – पॅसिफीक नौदल सरावात भारत,  जपान आणि अमेरिकेसह, ऑस्ट्रेलिया सहभागी झाला आहे. क्वाड देशांमधे समन्वय आणि कार्यक्षमता वाढवणं हे याचं उद्दिष्ट आहे. सुरक्षेपुढल्या आव्हानांचा पार्श्वभूमीवर प्रादेशिक भागीदारी वाढवणं गरजेचं आहे हे या सरावामुळे अधोरेखित झालं आहे, असं ऑस्ट्रेलियाचे संयुक्...

November 12, 2025 1:23 PM

views 57

सोनं तस्करी प्रकरणी ११ जणांना अटक

सोन्याची तस्करी केल्या प्रकरणी डीआरआय, अर्थात महसूल गुप्तचर संचालनालयानं काल मुंबईत ११ जणांना अटक केली. या कारवाईत  ११ किलो ८८ ग्रॅम  सोनं आणि ८ किलो ७७ ग्रॅम चांदी जप्त करण्यात आली. तस्करी केलेलं सोनं मुंबईत काळबादेवी आणि माझगाव परिसरात वितळवून स्थानिक बाजारात त्याची विक्री केली जात होती, अशी माहित...

November 12, 2025 1:23 PM

views 33

आज ‘सार्वजनिक प्रसारण सेवा’ दिवस

आज सार्वजनिक प्रसारण सेवा दिवस आहे. १९४७ मधे फाळणीनंतर भारतात आलेल्या विस्थापितांना याच दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी  ऑल इंडिया रेडियोवरुन संबोधित केलं होतं. या ऐतिहासिक भाषणाची आठवण म्हणून १२ नोव्हेंबर हा दिवस सार्वजनिक प्रसारण सेवा दिन म्हणून घोषित करण्यात आला.

November 12, 2025 1:24 PM

views 31

Jamaica: ‘मेलिसा’ चक्रीवादळामुळे ४५ जणांचा मृत्यू, १५ बेपत्ता

जमैकामध्ये ‘मेलिसा’ चक्रीवादळामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ४५ वर पोहोचली आहे, तर १५ जण अद्याप बेपत्ता आहेत. गेल्या महिन्याच्या २८ तारखेला पश्चिम जमैका मध्ये हे वादळ धडकलं होतं. त्यानंतर अजूनही दोन शहरांचा संपर्क तुटला आहे. या ठिकाणी हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरु आहे....

November 12, 2025 1:22 PM

views 924

बिहार विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यात ६९ टक्क्यापेक्षा जास्त मतदान

बिहार विधानसभेच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी काल मतदान झालं. या टप्प्यात ६९ टक्क्यापेक्षा जास्त मतदान झाल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं. पहिल्या टप्प्यात ६५ टक्के मतदान झालं होतं, त्यामुळे दोन्ही टप्पे मिळून बिहार विधानसभा निवडणुकीत एकूण ६६ पूर्णांक ९१ शतांश टक्के इतकं मतदान झालं आहे.  बिहारम...

November 11, 2025 8:34 PM

views 33

सिंधुदुर्गात मुलगी जन्माला येताच आधार कार्डासह विविध प्रमाणपत्र देऊन स्वागत

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुलगी जन्माला येताच आधार कार्डासह विविध प्रमाणपत्र देऊन स्वागत करण्याचा उपक्रम महिला आणि बालकल्याण विभागानं हाती घेतला आहे.   (जन्माला येणाऱ्या मुलींच स्वागत करताना त्या मुलींचं आधार कार्ड, आभाकार्ड, वय  अधिवास आणि राष्ट्रीयत्वाच प्रमाणपत्र तसंच जात प्रमाणपत्र सुद्धा देण्या...

November 11, 2025 8:13 PM

views 19

वायू प्रदूषण रोखण्यासाठी केलेल्या ठोस कारवाईचे अहवाल सादर करण्याचे केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांचे निर्देश

वायू प्रदूषण रोखण्यासाठी केलेल्या ठोस कारवाईचे अहवाल सादर करण्याचे निर्देश केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान परिवर्तन मंत्री भूपेंदर यादव यांनी आज काही राज्यांना तसंच केंद्रशासित प्रदेशांना दिले. ते वाढत्या वायू प्रदूषणाबाबत चर्चा करण्यासाठी दिल्ली इथं झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत बोलत होते. वायू प्रदू...

November 11, 2025 8:07 PM

views 25

आरोग्यसेवा परवडणारी करणे हे सरकारचे प्राधान्य- पियुष गोयल

वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की आरोग्यसेवा परवडणारी करणे हे सरकारचे प्राधान्य आहे. नवी दिल्लीतील सीआयआय च्या 22 व्या वार्षिक आरोग्य शिखर परिषदेत ते बोलत होते. त्यांनी आरोग्य आणि जीवनविम्यावरचा जीएसटी 18 टक्क्यांवरून शून्य टक्क्यांवर आणल्याने नागरिकांना दिलासा मिळाल्याचे सांगितल...

November 11, 2025 7:58 PM

views 30

राष्ट्रपती बोत्स्वानाच्या दौर्‍यासाठी रवाना

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अँगोलाचा दौरा यशस्वीपणे पूर्ण केला असून त्या आता बोत्स्वानाच्या दौर्‍यासाठी रवाना होत आहेत. हा भारताच्या राष्ट्रप्रमुखांचा अँगोलाला झालेला पहिलाच दौरा आहे.सागरी मत्स्यव्यवसाय क्षेत्रात सहकार्यासाठी आणि राजकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना रोजगाराची परवानगी देण्यासाठी द...