डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

२०२५ हे वर्ष संरक्षण क्षेत्रासाठी सुधारणा वर्ष असेल, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची घोषणा

संरक्षण क्षेत्रात सध्या सुरु असलेल्या आणि नव्यानं सुरु केल्या जाणाऱ्या सुधारणांना गती देण्याच्या उद्देशानं २०२५ हे वर्ष सुधारणांचं वर्ष असेल, असं संरक्षण मंत्रालयानं घोषित केलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल नववर्षाच्या पूर्वसंध्येला संरक्षण मंत्रालयातल्या सचिवांसोबत बैठक घेऊन विविध महत्वपूर्ण योजना, प्रकल्प आणि भविष्यातल्या उपक्रमांचा आढावा घेतला. देशाच्या सशस्त्र दलाच्या आधुनिकीकरणाच्या प्रवासात हे वर्ष ऐतिहासिक ठरेल, देशाच्या संरक्षण सज्जतेमध्ये यावर्षी अभूतपूर्व वाढ दिसून येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. सशस्त्र दलांना तत्रंज्ञानाच्या बाबतीत अधिक स्वयंपूर्ण करून अनेक पातळ्यांवर लढल्या जाणाऱ्या युद्धाला सामोरं जाण्यासाठी त्यांना सक्षम करणं हा यामागचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं.