October 7, 2024 1:56 PM

printer

पाकिस्तानमधे विमानतळाबाहेर झालेल्या स्फोटात २ जण ठार

पाकिस्तानात काल रात्री कराची विमानतळाबाहेर झालेल्या स्फोटात दोन जण ठार तर अनेक जण जखमी झाले. बलुच लिबरेशन आर्मी या फुटीरतावादी दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून त्यांनी चीनच्या गुंतवणुकदारांच्या ताफ्याला लक्ष्य केल्याचं संघटनेनं म्हटलं आहे. जखमींना जिना वैद्यकीय महाविद्यालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.