डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

दहशतवादी संघटनांशी संबध असल्याच्या आरोपावरुन २ जणांना अटक

दहशतवादी संघटनांशी संबध असल्याच्या आरोपावरुन पंजाब पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. ‘वारिस दे पंजाब टीम’ या नावाच्या व्हॉटसअप समूहावरचं त्यांचं संभाषण व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

 

राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटकेत असलेल्या खासदार अमरितपाल सिंग यांच्या अटकेला विरोध आणि केंद्र सरकारातल्या काही नेत्यांवर हल्ले करुन अशांतता माजवण्यासंदर्भात या दोघांनी व्हॉटसअप समूहावर काही विधानं केली होती अशी माहिती पंजाब पोलिसांनी दिली आहे. 

 

समूहातल्या इतर तीस ते पस्तीस जणांचा शोध पोलिस घेत आहेत असंही फरिदकोट विभागाच्या पोलिस उपयुक्तांनी नमूद केलं. रेल्वे आणि खाद्यान्न प्रक्रिया राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनी दोन दिवशी आपल्या हत्येचा कट रचला जात असल्याचा आरोप करुन त्यासंदर्भात या गटातील चर्चेचा उल्लेख केला होता.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा