डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

अमेरिकेत लॉस एंजेलिस जवळच्या जंगलांमध्ये ४ मोठ्या वणव्यांपैकी २ वणवे आटोक्यात

अमेरिकेत लॉस एंजेलिस जवळच्या जंगलांमध्ये लागलेल्या ४ मोठ्या वणव्यांपैकी २ वणवे आटोक्यात आले आहेत. ईटन, हर्स्ट, केनेथ आणि पॅलिसेड या भागातल्या सुमारे ३८ हजार एकरमध्ये ही आग पसरली आहे. या वणव्यामुळे आतापर्यंत किमान ११ जणांचा मृत्यू झाला असून १३ जण बेपत्ता आहेत.

 

१२ हजारांहून अधिक घरं आणि इमारती नष्ट झाल्या आहेत. ही आग पूर्वेकडे सरकत असल्यानं ब्रेंटवुड आणि एन्सिनोला ही स्थलांतराचे आदेश दिले आहेत. या भागात बुधवारपर्यंत जोरदार वारे वाहण्याची शक्यता असल्यानं आग आणखी वाढण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.