डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

June 7, 2025 1:45 PM

printer

छत्तीसगडमधल्या कारवाईत 2 माओवादी ठार

छत्तीसगडमधल्या बिजापूर इथं आज सुरक्षा दलांच्या कारवाईत दोन माओवादी मारले गेले. गेल्या ३ दिवसांपासून ही कारवाई सुरू आहे. मृत माओवाद्यांची ओळख अद्याप पटली नसून त्यांच्याकडून स्वयंचलीत शस्त्रं जप्त करण्यात आली आहेत.  

 

मागच्या दोन दिवसांत संरक्षण दलांनी सुधाकर आणि भास्कर या दोन माओवाद्यांना ठार केलं. सुधाकर हा भाकप माओवादी या बंदी असलेल्या पक्षाचा केंद्रीय समिती सदस्य होता. त्याच्यावर एक कोटी रुपयांचं बक्षिस होतं. तर भास्कर हा स्पेशल झोनल कमिटीचा सदस्य असून त्याच्यावर ४५ लाख रुपयांचं बक्षिस होतं. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा