डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

August 25, 2024 3:47 PM | Accident

printer

नागपूर-अमरावती महामार्गावर शिवशाही बसला झालेल्या अपघातात २ ठार, २४ जखमी

नागपूर – अमरावती महामार्गावर नांदगावपेठ जवळ राज्य परिवहन महामंडळ एसटीच्या शिवशाही बसला झालेल्या अपघातात दोन प्रवासी ठार तर २४ जण जखमी झाले आहेत. आज सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. नागपूरहून अकोल्याला जाणाऱ्या बससमोर अचानक आडव्या आलेल्या गायीला वाचवताना नियंत्रण सुटल्यानं ही बस उलटून हा अपघात झाला.