डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

भारत आणि दक्षिण अफ्रिकेदरम्यानचा पहिला टी 20 क्रिकेट सामना आज डर्बनमध्ये

भारत आणि दक्षिण अफ्रिकेदरम्यानच्या चार टी-20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज रात्री डर्बनमध्ये होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री साडेआठ वाजता सामन्याला सुरूवात होईल.

 

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली दक्षिण अफ्रिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला परदेशी भूमीवर उत्तम कामगिरी दाखवण्याची संधी आहे. या संघानं घरच्या मैदनावर बांग्लादेश विरूद्धची टी-20 मालिका 3-0 नं जिंकली होती. सध्या भारतीय संघ टी-20 संघ क्रमवारीत अव्वल स्थानावर तर दक्षिण अफ्रिका सहाव्या स्थानावर आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.