डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

१९ व्या ‘मोहम्मद रफी’ पुरस्काराचं राज्यपालांच्या हस्ते वितरण

१९ व्या ‘मोहम्मद रफी’ पुरस्काराचं वितरण काल मुंबईत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते झालं. हिंदी चित्रपट सृष्टीतले लोकप्रिय गीतकार मजरुह सुलतानपुरी यांना यंदाचा ‘मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्कार’ मरणोत्तर देण्यात आला. हिंदीसह बंगाली, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, तामिळ, तेलगू, उर्दू अशा विविध प्रादेशिक भाषांमध्ये पार्श्वगायन करणारे जावेद अली यांना ‘मोहम्मद रफी पुरस्कार २०२४’नं राज्यपालांनी सन्मानित केलं . एक लाख रुपये आणि स्मृतीचिन्ह असं जीवनगौरव पुरस्काराचं स्वरूप असून, ५१ हजार रुपये आणि स्मृतीचिन्ह असं ‘मोहम्मद रफी पुरस्कारा’चं स्वरूप आहे.