दक्षिण सुदानमध्ये आलेल्या पुरामुळे जवळजवळ ८ लाख ९० हजार नागरिकांना पुराचा फटका बसला असून, आतापर्यंत १९ जण मृत्युमुखी पडले आहेत. मुसळधार पाऊस आणि नाईल नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे देशभरात पूरस्थिती निर्माण झाली आहे.
जोंगलेई आणि युनिटी या राज्यांमधल्या नागरिकांना पुराचा सर्वात जास्त फटका बसला आहे. घरं, शेती, शाळा, आरोग्य सेवा, रस्ते आणि इतर महत्वाच्या पायाभूत सुविधांचं मोठं नुकसान झालं असून, मदत कार्य गुंतागुंतीचं झाल्याचं संयुक्त राष्ट्रांच्या प्रवक्त्यानं सांगितलं.