पंडित मदनमोहन मालवीय यांची १६३ वी जयंती देशभरात सर्वत्र साजरी

पंडित मदनमोहन मालवीय यांची १६३ वी जयंती आज देशभरात सर्वत्र साजरी करण्यात येत आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात उल्लेखनीय योगदानासोबतच प्राचीन भारतीय संस्कृतीचे अभ्यासक म्हणून त्यांची ख्याती होती. समाजकार्य, पत्रकारिता, वकिली अशा क्षेत्रातही ते कार्यरत होते. भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं होतं.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंडित मालवीय यांना आदरांजली वाहिली आहे. स्वातंत्र्य संग्रामात त्याचप्रमणे शिक्षणक्षेत्रात पंडित मालवीय यांचं अमूल्य योगदान होतं, आणि त्यांचं कार्य नेहमीच प्रेरणादायी राहील असं मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.