देशाचे १५वे उपराष्ट्रपती म्हणून सी. पी. राधाकृष्णन यांनी आज पदाची शपथ घेतली. नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राधाकृष्णन यांना शपथ दिली.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, जगदीप धनखड, हमीद अन्सारी, एम वेंकय्या नायडू हे माजी उपराष्ट्रपती, तसंच अमित शहा, नितीन गडकरी, राजनाथ सिंग, जे.पी.नड्डा, पीयुष गोयल हे केंद्रीय मंत्री आणि इतर मान्यवर शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.
उपराष्ट्रपतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत सीपी राधाकृष्णन यांनी प्रतिस्पर्धी इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांचा १५२ मतांनी पराभव केला. उपराष्ट्रपतींनी आज राज्यसभेच्या अध्यक्षपदाचा कार्यभारही स्वीकारला.