पुणे जिल्ह्यात यवत इथे झालेल्या हिंसाचाराप्रकरणी आतापर्यंत १५ जणांना अटक झाली असून ५००हून अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या १५ आरोपींना ६ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात येणार आहे.
हिंसाचाराला कारणीभूत ठरलेली वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या तरुणालाही अटक करण्यात आली आहे. यवतमध्ये सध्या शांतता असून समाज माध्यमांवर पोलीस लक्ष ठेवून आहेत. या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीत कोणताही पूर्वनियोजित कट आढळला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.