छत्तीसगडमध्ये आज दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एकूण १४ माओवादी मारले गेले. सुरक्षा दलांच्या नक्षलवाद विरोधी मोहिमेला वर्षाच्या सुरुवातीलाच आलेलं हे मोठं यश मानलं जात आहे. यापैकी बस्तर भागात बिजापूर जिल्ह्यात दोन आणि सुकमा जिल्ह्यात १२ माओवादी मारले गेले. बिजापूर मध्ये बासुगुडा भागात माओवादी असल्याची माहिती मिळताच पोलिसांचं पथक तिथं तातडीनं रवाना झालं. त्यानंतर गगनपल्ली गावाजवळ दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबारात दोन माओवादी मारले गेले. त्याचप्रमाणे सुकमा जिल्ह्यातही पोलिसांच्या कारवाईत १२ जण मारले गेले. सुरक्षा दलांनी चकमकीच्या ठिकाणाहून सर्व माओवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. याशिवाय, घटनास्थळावरून एक एके-४७ रायफल, एक एसएलआर रायफल आणि इतर शस्त्रंही जप्त करण्यात आली आहेत.
Site Admin | January 3, 2026 1:46 PM | Chhattisgarh | Maoists Killed
छत्तीसगडमध्ये १४ माओवादी ठार